आयपीएलच्या पंधराव्या हंगामात आज कोलकाता आणि बंगळुरु यांच्यात सातवा सामना खेळवला गेला. दोन्ही संघातील खेळाडूंनी पूर्ण ताकतीशी लढा दिल्यामुळे आजचा सामना चांगलाच अटीतटीचा झाला. मात्र या सामन्यात केएल राहुल फलंदाजी करत असताना सर्वांनाच पुष्पा चित्रपटाची आठवण झाली आहे. नेमकं काय घडलं ? चेन्नईने प्रथम फलंदाजी करत लखनऊसमोर २१० धावांचे आव्हान उभे केले. या आव्हानाचा पाठलाग करताना कर्णधार केएल राहुल, क्विंटन डी कॉक यांनी चांगलाच खेळ केला. के एल राहुलने २६ चेंडूंमध्ये दोन चौकार आणि तीन षटकार यांच्या मदतीने ४० धावा केल्या. मात्र राहुल फलंदाजी करत असताना एक वेगळाच किस्सा घडला. राहुलने फटका मारल्यांतर तो धाव चोरण्यासाठी धावपट्टीवर पूर्ण ताकतीने धावला. राहुलचा बूट पाहून पुष्पाची आठवण मात्र धाव घेत असताना केएल राहुलच्या पायातील बूट निसटला. परिणामी राहुलला विनाबुटाची एक धाव घ्यावी लागली. पायातील बूट जमिनीवर पडतानाचा क्षण कॅमेरामॅनने आपल्या कॅमेऱ्यात टीपला. दरम्यान कॉमेंटेटर हर्षा भोगले यांनी राहुलच्या पायातील बूट निसटल्याचे सांगताना पुष्पा चित्रपटाचा उल्लेख केला. या चित्रपटात अभिनेता अल्लू अजूर्न पायातील चप्पल निसटलेली असताना गाणं गाण्यात मग्न असतो. अगदी तशाच प्रकारे राहुलनेही पायातील बुट निसटलेला असताना धाव घेतली. दरम्यान, के एल राहुलने तीन षटकार आणि दोन चौकार यांच्या मदतीने ४० धावा केल्या. तर दुसरीकडे क्विटंन डी कॉकनेही ४५ चेंडूंमध्ये ९ चौकारांच्या मदतीने ६१ धावा केल्या.