scorecardresearch

IPL 2022 CSK vs MI Highlights : मुंबईच्या विजयामुळे चेन्नईच्या आशा संपुष्टात; सीएसके प्ले ऑफच्या बाहेर

CSK vs MI Highlights : गुणतालिकेत चेन्नई संघ नवव्या स्थानावर तर मुंबई संघ दहाव्या स्थानावर आहे.

CSK vs MI Live match 59
CSK vs MI Live match 59

IPL 2022 CSK vs MI Live Match Highlights : आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील ५९ वी लढत चेन्नई आणि मुंबई यांच्यात झालाय. चेन्नई संघसाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा होता. गुणतालिकेत चेन्नई संघ नवव्या स्थानावर तर मुंबई संघ दहाव्या स्थानावर आहे. चेन्नईने एकूण चार सान्यांममध्ये तर मुंबईने फक्त दोन सामन्यांत विजय नोंदवलेला आहे. या सामन्यात चेन्नईचा पराभव तर मुंबईचा पाच गडी राखून विजय झाला आहे.

Live Updates

 CSK vs MI Live Match Live Updates : वाचा चेन्नई विरुद्ध मुंबई सामन्यातील सर्व अपडेट्स एका क्लिकवर

22:44 (IST) 12 May 2022
मुंबईचा विजय, चेन्नई प्लेऑफ शर्यतीच्या बाहेर

मुंबई इंडियन्स संघाचा पाच गडी राखून विजय झाला आहे. तर दुसरीकडे आजच्या पराभवानंतर चेन्नई संघाच्या आशा मावळल्या असून हा संग प्ले ऑफपर्यंत पोहोचण्याच्या शर्यतीमधून बाहेर पडला आहे.

22:32 (IST) 12 May 2022
मुंबई इंडियन्स संघाला पाचवा मोठा धटका, ऋतिक शौकीन यष्टिचित

मुंबई इंडियन्सला ऋतिक शौकीनच्या रुपात मोठा झटका बसला आहे. ऋतिक यष्टीचित झाला असून सध्यामुंबईच्या ८१ धावा झाल्या आहेत.

22:19 (IST) 12 May 2022
मुंबई इंडियन्सच्या ६६ धावा

मुंबई इंडियन्सच्या सध्या ६६ धावा झाल्या असून चार फलंदाज बाद झाले आहेत. मुंबई संघाला ६० चेंडूंमध्ये ३२ धावांची गरज आहे.

21:51 (IST) 12 May 2022
मुंबई इंडियन्सला चौथा मोठा झटका, ट्रिस्टन स्टब्स पायचित

मुंबई इंडियन्सला ट्रिस्टन स्टब्सच्या रुपात चौथा मोठा झटका बसला आहे. स्टब्स खातंदेखील खोलू शकला नाही. मुकेश चौधरीच्या चेंडूवर तो पायचित झाला आहे.

21:06 (IST) 12 May 2022
चेन्नईचा पूर्ण संघ ९७ धावांवर बाद, मुंबईसमोर ९८ धावांचे लक्ष्य

चेन्नई संघाची पुरती दुर्दशा झाली आहे. चेन्नई संघ फक्त ९७ धावा करु शकला असून मुंबईला विजयासाठी ९८ धावा कराव्या लागणार आहेत.

20:52 (IST) 12 May 2022
चेन्नईला नववा मोठा झटका, माहिश तिक्षाणा झेलबाद

चेन्नई संघाची पुरती दुर्दशा झाली आहे. चेन्नई संघ १०० धावांपर्यंत पोहोचणार का ? असा प्रश्न उपस्थित राहत आहे. सध्या माहिश तिक्षाणा झेलबाद झाला आहे. त्याला एकही धाव करता आली नाही.

20:45 (IST) 12 May 2022
चेन्नईला आठवा मोठा झटका, सिमरजित सिंह दोन धावांवर बाद

चेन्नई संघाला सिमरजित सिंहच्या रुपात आठवा मोठा झटका बसला आहे. अवघ्या दोन धावांवर असताना तो पायचित झाला आहे. सध्या चेन्नईच्या ८० धावा झाल्या आहेत.

20:43 (IST) 12 May 2022
चेन्नई संघाला सातवा मोठा झटका, ड्वेन ब्राव्हो झेलबाद

चेन्नई सुपर किंग्जला ड्वेन ब्राव्होच्या रुपात सातवा मोठा झटका बसला आहे. ड्वेन ब्राव्हो १२ धावांवर बाद झाला आहे. सध्या चेन्नईच्या ७८ धावा झाल्या आहेत.

20:19 (IST) 12 May 2022
चेन्नईला सहावा मोठा झटका, शिवम दुबे झेलबाद

चेन्नई संघ चांगलाच अडचणीत सापडत आहेत. सध्या चेन्नईचा सहावा फलंदाजा शिवम दुबेच्या रुपात बाद झाला आहे. शिवम दुबेने १० धावा केल्या.

20:07 (IST) 12 May 2022
चेन्नईला पाचवा मोठा झाटक, अंबाती रायडू झेलबाद

चेन्नई सुपर किंग्जला अंबाती रायडूच्या रुपात पाचवा झटका बसला आहे. रायडूने दहा धावा केल्या. सध्या चेन्नईच्या अवघ्या २९ धावा झाल्या आहेत. असे असताना पाच विकेट्स गेल्यामुळे चेन्नई संघ चांगलाच अडचणीत सापडला आहे.

19:57 (IST) 12 May 2022
चेन्नईला चौथा मोठा झटका, ऋतुराज गायकवाड झेलबाद

चेन्नई संघाला ऋतुराज गायकवाडच्या रुपात चौथा मोठा झटका बसला आहे. सध्या चेन्नईची चांगलीच दुरावस्था झाली आहे. चेन्नईच्या अवघ्या १७ धावा झाल्या असून एकूण चार गडी बाद झाले आहेत. ऋतुराज गायकवाड सात धावा करुन तंबुत परतलाय.

19:39 (IST) 12 May 2022
मुंबईची दमदार सुरुवात, चेन्नईचे पहिल्याच षटकात दोन गडी बाद

सुरुवातीला गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊन मुंबई संघाने दमदरा सुरुवात केली आहे. मुंबई संघाने पहिल्याच षटकात दोन बळी घेतले आहेत. डेवॉन कॉन्वे आणि मोई अली शून्यावर बाद झाले आहेत.

19:11 (IST) 12 May 2022
मुंबई इंडियन्सचा गोलंदाजी करण्याचा निर्णय

मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकली असून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

19:05 (IST) 12 May 2022
चेन्नई संघ स्टेडियमकडे रवाना

चेन्नईचा संघ वानखेडे स्टेडियमकडे रवाना झाला असून काही क्षणात सामन्याला सुरुवात होणार आहे.

ROHIT SHARMA AND MAHENDRA SINGH DHONI

ROHIT SHARMA AND MAHENDRA SINGH DHONI

गुणतालिकेत चेन्नई संघ नवव्या स्थानावर तर मुंबई संघ दहाव्या स्थानावर आहे. चेन्नईने एकूण चार सान्यांममध्ये तर मुंबईने फक्त दोन सामन्यांत विजय नोंदवलेला आहे. या दोन्ही तगड्या संघांमध्ये आज सामना होत आहे.

Web Title: Ipl 2022 csk vs mi live match updates cricket score today 12 may 2022 prd