scorecardresearch

IPL 2022 CSK vs MI : आज मुंबई-चेन्नई आमनेसामने, सीएसकेसमोर आज ‘करो या मरो’

Chennai Super Kings vs Mumbai Indians : गुणतालिकेचा विचार करायचा झालं तर मुंबई इंडियन्स संघ गुणतालिकेत सर्वात शेवटी आहे.

CSK vs MI Playing XI
CSK vs MI Playing XI

IPL 2022 CSK vs MI Playing XI : आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील ५९ व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स या दोन संघांमध्ये मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर लढत होणार आहे. चेन्नईसाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. प्लेऑफच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी चेन्नईला हा सामना जिंकणे गरजेचे आहे. तर दुसरीकडे हा सामना जिंकून या हंगामात चांगली कामगिरी करण्यासाठी मुंबई संघ प्रयत्न करणार आहे.

हेही वाचा >>> आफ्रिकेविरुद्ध मालिकेसाठी कोहली, जडेजाला विश्रांती?

गुणतालिकेचा विचार करायचा झालं तर मुंबई इंडियन्स संघ गुणतालिकेत सर्वात शेवटी आहे. या संघाने आतापर्यंत ११ सामने खेळले असून फक्त दोन सामन्यांमध्ये विजय प्राप्त केला आहे. तर एकूण ९ सामन्यांमध्ये मुंबईला पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर दुसरीकडे चेन्नई संघाने चार वेळा विजय नोंदवलेला असून सात वेळा या संघाचा पराभव झाला आहे.

हेही वाचा >>> उबर चषक बॅडिमटन स्पर्धा : कोरियाविरुद्ध महिला संघाची पाटी कोरी

आजचा सामना कोठे पाहता येईल ?

आजचा सामना स्टार स्पोर्ट्स 3, स्टार स्पोर्ट्स 3 एचडी, स्टार स्पोर्ट्स 1 आणि स्टार स्पोर्ट्स 1 एचडी या चॅनेल्सवर पाहता येईल. तसेच हा सामना डिस्ने प्लस हॉटस्टारवही पाहता येईल.

चेन्नई सुपर किंग्ज संघाचे संभाव्य प्लेइंग इलेव्हन :

हेही वाचा >>> ऑलिम्पिक पदक जिंकून देण्याचा रुद्रांक्षचा निर्धार ;रुद्रांक्षची १७ राष्ट्रीय स्पर्धेत आणि १२ आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पदक कमाई

डेव्हॉन कॉन्वे, ऋतुराज गायकवाड, शिवम दुबे, अंबाती रायुडू, एमएस धोनी (कर्णधार आणि यष्टिरक्षक), रॉबिन उथप्पा, मोईन अली, ड्वेन ब्राव्हो, सिमरजीत सिंग, महिश तिक्षाणा, मुकेश चौधरी

हेही वाचा >>> IPL 2022 : रविंद्र जडेजा पाठोपाठ दिल्लीचा सलामीवर पृथ्वी शॉ आयपीएल बाहेर; मुख्य प्रशिक्षकांनी दिली माहिती

मुंबई इंडियन्स संघाचा संभाव्य प्लेइंग इलेव्हन :

इशान किशन, रोहित शर्मा (कर्णधार), अनमोलप्रीत सिंग, तिलक वर्मा, टीम डेव्हिड, किरॉन पोलार्ड, डॅनियल सॅम्स, मयंक मार्कंडेय, कुमार कार्तिकेय, जसप्रीत बुमराह, रिले मेरेडिथ

मराठीतील सर्व आयपीएल २०२२ ( Ipl ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ipl 2022 csk vs mi match 59 playing 11 match prediction know who will win prd

ताज्या बातम्या