scorecardresearch

हार्दिक पांड्याच्या आयुष्यातील महत्त्वाचा होता क्षण, पण मध्येच कॅमेऱ्यात तरुणी दिसली, अन्…

दिल्लीचा दुसरा गडी बाद झाल्यामुळे तरुणी नाराज झाली होती.

hardik pandya
हार्दिक पांड्याने या सामन्यात पहिला बळी घेतला (फोटो- iplt20.com)

आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील सर्वच सामने रोहमर्षक होत आहेत. सामना जिंकण्यासाठी प्रत्येक संघ आपापल्या परीने प्रयत्न करतोय. शनिवारी दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात अटीतटीची लढत झाली. या सामन्यात गुजरात टायटन्सचा १४ धावांनी विजय झाला. या सामन्यादरम्यान गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्यासोबत एक महत्त्वाची गोष्ट घडली. मात्र यावेळी कॅमेऱ्यामध्ये हार्दिक दिसण्याऐवजी दिल्ली संघाची चाहती असलेली एक तरुणी दिसली.

मैदानामध्ये नेमकं काय घडलं ?

शनिवारी दिल्ली आणि गुजरात यांच्यात अटीतटीची लढत झाली. या सामन्यात गुजरातने दिल्लीसमोर १७२ धावांचे लक्ष्य दिले होते. हे लक्ष्य गाठत असताना दिल्ली कॅपिटल्सला सुरुवातीच्या षटकातच मोठा फटका बसला. दिल्लीचा सलामीवीर पृथ्वी शॉ दहा धावांवर बाद झाल्यानंतर गुजरातचा आत्मविश्वास वाढला होता. त्यामुळे दुसरे षटक टाकण्यासाठी गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्याने चेंडू हातात घेतला. हार्दिक पांड्याला या हंगामात आतापर्यंत एकही बळी मिळालेला नव्हता. मात्र या सामन्यात पांड्याच्या पहिल्याच षटकात दिल्लीचा शेफर्ट बाद झाला आणि हार्दिक पांड्याच्या खात्यात या हंगामातील पहिल्या बळीची नोंद झाली.

आयपीएलच्या पंधराव्या हंगामामध्ये हार्दिक पांड्याची ही पहिलीच विकेट होती. त्यामुळे पांड्यासाठी हा क्षण खास होता. पांड्या पहिला बळी मिळाल्यानंतर आनंद साजरा करत होता. सर्वांचे लक्ष्य त्याच्याकडेच होते. मात्र यावेळी कॅमेरामॅनने स्क्रीनवर दिल्ली संघाची चाहती असलेल्या एका तरुणीला दाखवले. त्यामुळे हार्दिकने आयपीएल १५ मध्ये पहिली विकट घेऊन यश संपादन कलेले असतानाही सर्वांचे लक्ष कॅमेऱ्यामधील तरुणीकडे गेले.

दिल्लीचा दुसरा खेळाडू बाद झाल्यामुळे ही तरुणी चांगलीच निराश झाली. तर पांड्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. हा प्रकार संध्या चांगलाच व्हायरल होत आहे. एकीकडी दिल्लीचा दुसरा गडी बाद झाल्यामुळे तरुणी नाराज झाली होती. तर दुसरीकडे हार्दिक पांड्याला आनंद गगनात मावेनासा झाला होता. हा विरोधाभास ऍमेरामॅनने चांगल्या प्रकारे टिपला. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

मराठीतील सर्व आयपीएल २०२२ ( Ipl ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ipl 2022 dc vs gt hardik pandya first wicket young girl reaction went viral prd

ताज्या बातम्या