scorecardresearch

IPL 2022, DC vs LSG : रोमहर्षक सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा सहा धावांनी पराभव; लखनऊचा सातवा विजय

DC vs LSG Match Updates : कर्णधार केएल राहुल ५१ चेंडूत ७७ धावा करून बाद झाला

DC vs LSG

IPL 2022, DC vs LSG Match Updates : आयपीएल २०२२ चा ४५ वा सामना लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला गेला. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सने ६ धावांनी विजय मिळवला. लखनऊचा या स्पर्धेतील हा सातवा विजय असून, संघ आता गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.

लखनौने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना केएल राहुलच्या नेतृत्वाखालील लखनौ सुपर जायंट्स संघाने २० षटकांत ३ गडी गमावून १९५ धावा केल्या. प्रत्युत्तरात दिल्लीचा संघ १८९ धावा करू शकला आणि सहा धावांनी सामना गमावला. शेवटच्या तीन चेंडूंवर १३ धावांची गरज होती, पण अक्षर पटेलने धाव घेतली आणि नंतर शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकला.

दिल्ली कॅपिटल्सला पहिला धक्का पृथ्वी शॉच्या रूपाने बसला, तर दुसरी विकेट डेव्हिड वॉर्नरच्या रूपाने गेली. मिचेल मार्श ३७ धावा करून बाद झाला. ललित यादवच्या रूपाने दिल्लीला चौथा धक्का बसला. ऋषभ पंत ४४ धावा करून बाद झाला. रोव्हमन पॉवेल सहाव्या विकेटसाठी परतला, तर शार्दुल ठाकूर सातव्या विकेटसाठी बाद झाला.

नाणेफेक जिंकून फलंदाजी करताना लखनऊच्या सलामीच्या जोडीने पहिल्या विकेटसाठी ४२ धावांची भागीदारी केली. डिकॅक १३ चेंडूत २३ धावा काढून बाद झाला. दीपक हुडाने ३४ चेंडूत ५२ धावांची उत्कृष्ट खेळी खेळली. कर्णधार केएल राहुल ५१ चेंडूत ७७ धावा करून बाद झाला. दिल्ली कॅपिटल्सकडून शार्दुल ठाकूरने तीन बळी घेतले.

मराठीतील सर्व आयपीएल २०२२ ( Ipl ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ipl 2022 dc vs lsg match updates cricket score today 01 may 2022 abn