आयपीएलच्या पंधराव्या हंगामात काल सातव्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा पराभव झाला. तर लखनऊ सुपर जायंट्सने चेन्नईवर सहा गडी राखून मात केली. चेन्नईने उभे केलेले २११ धावांचे लक्ष्य लखनऊ सुपर जायंट्ससे पूर्ण करत चेन्नईला पराभूत केले. या सामन्यांतर चेन्नईचा हा सलग दुसरा पराभव आहे. दरम्यान, आतापर्यंत दोन्ही सामन्यांत अपयश आले असली तरी चेन्नईचा अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्हो चांगलाच तळपत आहे. ब्राव्हो श्रीलंकेचा गोलंदाज लसिथ मलिंगा मागे टाकत आयपीएलमध्ये सर्वात जास्त बळी घेणारा गोलंदाज ठरला आहे.

कालच्या सामन्यात ड्वेन ब्राव्होने अनोखा विक्रम रचला. लखनऊ सुपर जायंट्सचा खेळाडू दीपक हुडा याला बाद करून ब्राव्हो आयपीएलमध्ये सर्वात जास्त बळी घेणारा गोलंदाज ठऱला आहे. त्याने १५३ सामन्यांमध्ये १७१ बळी घेतले आहेत. याआधी हा विक्रम मुंबई इंडियन्सचा माजी गोलंदाज लसिथ मलिंगाच्या नावावर होता. मलिंगाने १२२ सामन्यांमध्ये १७० बळी घेतलेले आहेत. तर आता मलिंगापेक्षा एक बळी जास्त घेत ब्राव्हो पहिल्या क्रमांचा गोलंदाज ठरला आहे.

आयपीएलमध्ये सर्वात जास्त बळी घेणाऱ्या पहिल्या पाच गोलंदाजांमध्ये प्रथम क्रमांकावर ब्राव्हो, तर दुसऱ्या क्रमांकावर मलिंग आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर अमित मिश्रा असून त्याने १६६ बळी घेतलेले आहे. तर चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर पियुष चावला आणि हरभजन सिंग आहेत. त्यांनी अनुक्रमे १५७ आणि १५० बळी घेतलेले आहेत.