IPL 2022, GT vs KKR Match Updates : इंडियन प्रीमियर लीग २०२२ च्या १५ व्या हंगामातील ३५ वा सामना कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि गुजरात टायटन्स (GT) या दोन संघांमध्ये झाला. यात गुजरातने ८ धावांनी कोलकातावर विजय मिळवला. हा सामना मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर खेळला गेला. गुजरातने नाणेफक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि २० षटकात ९ बाद १५६ धावा केल्या. मात्र, कोलकाताला २० षटकात ८ बाद १४८ धावाच करता आल्या.

गुजरातने या सामन्यासाठी आपल्या प्लेईंग इलेव्हनमध्ये एक बदल केला आहे. दुसरीकडे कोलकाता नाईट रायडर्सने या सामन्यासाठी संघात ३ बदल केले आहेत. केकेआरच्या संघात साऊदी, सॅम बिलिंग्स आणि रिंकू सिंहला स्थान देण्यात आलंय.

Gujarat Titans vs Punjab Kings Match Highlights in Marathi
PBKS vs GT : गुजरात टायटन्सचा पंजाब किंग्जवर ३ विकेट्सनी विजय, राहुल तेवतिया-साई किशोरचे शानदार प्रदर्शन
Rajasthan Royals Vs Gujarat Titans Match Highlights in Marathi
RR vs GT : गुजरातने राजस्थानचा विजयरथ रोखला, राशिद खानच्या खेळीच्या जोरावर ३ विकेट्सनी नोंदवला शानदार विजय
riyan parag
वेदनाशामक औषधे घेऊन रियान परागची निर्णायक खेळी!
Shubman Gill fined 12 lakhs
IPL 2024 : गुजरात टायटन्सला पराभवानंतर आणखी एक धक्का, कर्णधार शुबमन गिलला ‘या’ कारणासाठी ठोठावला दंड

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वातील केकेआरला आतापर्यंत ७ पैकी केवळ ३ सामन्यांमध्ये विजय मिळवता आलेला आहे. दुसरीकडे हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील गुजरात टायटन्सने आतापर्यंत ६ पैकी ५ सामने जिंकलेत. आयपीएल २०२२ च्या गुणतालिकेत गुजरात दुसऱ्या क्रमांकावर, तर केकेआर सातव्या क्रमांकावर आहे.

गुजरात टाइटन्स इनिंग

गुजरातकडून कर्णधार हार्दिक पांड्याने ४९ चेंडूत ६७ धावांची दमदार खेळी केली. यात त्याने ४ चौकार आणि २ षटकारही लगावले. याशिवाय ऋद्धिमान साहाने २५ चेंडूत २५ धावा केल्या. यात त्याच्या २ चौकार आणि १ षटकाराचा समावेश आहे. डेविड मिलरने देखील २० चेंडूत २७ धावा केल्या. त्याने १ चौकार आणि २ षटकार लगावले. राहुल तेवलियाने १२ चेंडूत १७ धावा केल्या. त्याने २ चौकार मारले.

दुसरीकडे गोलंदाजांमध्ये गुजरातच्या मोहम्मद शमी, राशिद खान आणि यश दयालने प्रत्येकी २ विकेट घेतल्या.

कोलकाता नाईट रायडर्स इनिंग

कोलकाताकडून आंद्रे रसेलने दमदार खेळी केली. त्याने १ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने २५ चेंडूत ४८ धावा केल्या. रिंकू सिंहने ४ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ३५ धावा केल्या. व्यंकटेश अय्यरने १७ चेंडूत १७ धावा केल्या. यात त्याच्या २ चौकारांचा समावेश आहे.

दुसरीकडे गोलंदाजांमध्ये कोलकाताच्या आंद्रे रसेलने ४ विकेट, टिम साऊदीने ३ विकेट आणि उमेश यादवे १ विकेट घेतली.

गुजरात टाइटन्स प्लेईंग इलेव्हन

ऋद्धिमान साहा (यष्टीरक्षक), शुभमन गिल, हार्दिक पांड्या (कर्णधार), अभिनव मनोहर, डेविड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, अल्जारी जोसेफ, लॉकी फर्ग्यूसन, यश दयाल, मोहम्मद शमी

कोलकाता नाईट रायडर्स प्लेईंग इलेव्हन

व्यंकटेश अय्यर, सुनील नरेन, श्रेयस अय्यर (कप्तान), नितीश राणा, सॅम बिलिंग्स (विकेटकीपर), रिंकू सिंह, आंद्रे रसेल, टिम साऊदी, शिवम मावी, उमेश यादव, वरुण चक्रवर्ती।