IPL 2022 , GT vs LSG Highlights : आयपीएलचा पंधराव्या हंगामातील चौथा सामना सुरु झाला आहे. आजच्या सामन्यात गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात लढत होत आहे. दोन्ही संघामध्ये दिग्गज आणि सामना कोणत्याही क्षणी फिरवण्याची क्षमता असलेले खेळाडू आहेत. आजच्या सामन्यात गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्या आणि लखनऊचा कर्णधार केएल राहुल यांच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे. या हंगामातील पहिला सामना जिंकून विजयी सुरुवात करण्यासाठी हे दोन्ही संघ प्रयत्नरत आहेत. आजचा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळला जातोय.

Rohit Sharma Is My Captain Not Other Guy Hardik Pandya
“रोहित शर्माच्या सल्ल्यावरच MI च्या खेळाडूंचा..”, इरफान पठाणने सांगितला ‘त्या’ Video चा अर्थ; म्हणाला, “हार्दिकपेक्षा..”
ms dhoni thala joined hands being thankful to fan in ekana cricket stadium lsg vs csk ipl 2024 live match
थालाच्या भरमैदानातील ‘त्या’ कृतीने जिंकली चाहत्यांची मने; VIDEO पाहून म्हणाले, “वॉव…”
IPL 2024 RR vs PBKS Match Updates in marathi
PBKS vs RR : युजवेंद्र चहलला इतिहास रचण्याची सुवर्णसंधी! IPL मध्ये ‘ही’ कामगिरी करणारा ठरणार पहिलाच गोलंदाज
Glenn Maxwell makes bizarre comment on Virat Kohli
T20 World Cup : ‘मला आशा आहे की विराट कोहलीची निवड होणार नाही’, आरसीबीच्या ‘या’ खेळाडूचे चकित करणारे वक्तव्य
Live Updates
23:29 (IST) 28 Mar 2022
गुजरात टायटन्सचा दणदणीत विजय, तेवतीयाची धडाकेबाज फलंदाजी

गुजरात टायटन्सचा दणदणीत विजय झाला असून लखऊने उभं केलेलं १५८ धावांचं आव्हान गुजरातने लिलया पेललं आहे. विजय तेवतीयाने मैदानावर पाय रोवून सामना फिरवल्यामुळे गुजरातला विजयाची गोडी चाखता आली.

22:44 (IST) 28 Mar 2022
गुजरातला मॅथ्यू वेडच्या रुपात चौथा धक्का

गुतरातला मॅथ्यू वेडच्या रुपात चौथा धक्का बसला आहे. मॅथ्यू वेडने तीस धावा केल्या.

22:33 (IST) 28 Mar 2022
हार्दिक पांड्या ३३ धावांवर झेलबाद

हार्दिक पांड्या ३३ धावांवर झेलबाद झाला आहे. सध्या गुजरातच्या ७३ धावा झाल्या आहेत.

21:59 (IST) 28 Mar 2022
गुजरातचे दोन गडी बाद

गुजरात टायटन्सचे दोन गडी बात झाले असून आतापर्यंत गुजरातच्या २५ धावा झाल्या आहेत.

21:28 (IST) 28 Mar 2022

लखनऊने सामन्याच्या शेवटच्या टप्प्यात जोरदार कमबॅक करत गुजरातसमोर १५९ धावांचं लक्ष्य उभं केलं.

21:18 (IST) 28 Mar 2022
लखनऊच्या १४८ धावा, पाच गडी बाद

दीपक हुडा आणि आयुष बदोनी यांनी लखनऊला सावरलं आहे. आतापर्यंत लखनऊच्या १४८ धावा झाल्या असून पाच गडी बाद झाले आहेत.

20:02 (IST) 28 Mar 2022
मनिष पांडेच्या रुपात लखनऊला चौथा झटका

लखनऊला चौथा झटका बसला असून मनिष पांडे फक्त सहा धावांवर बाद झाला आहे.

19:48 (IST) 28 Mar 2022
लखनऊला दुसरा मोठा झटका, डिकॉक सात धावांवर बाद

लखनऊला दुसरा मोठा झटका बसला आहे. लखनऊचा फलंदाज क्विंटन डिकॉकने सात धावा केल्या आहेत.

19:39 (IST) 28 Mar 2022
पहिल्याच चेंडूवर केएल राहुल बाद

पहिल्याच चेंडूत लखनऊला मोठा झटका बसला आहे. लखनऊचा कर्णधार केएल राहुल पहिल्याच चेंडूवर बाद झालाय.

19:29 (IST) 28 Mar 2022
गुजरात टायटन्सचे नाणेफेक जिंकली, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय

गुजरात टायटन्सचे नाणेफेक जिंकली असून गुजरातने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे.

19:26 (IST) 28 Mar 2022
दोन्ही संघांनी कसली कंबर, काही क्षणांत सामन्याला सुरुवात

दोन्ही संघ तयार झाले असून काही क्षणांत सामन्याला सुरुवात होणार आहे.

18:33 (IST) 28 Mar 2022
सामना कोठे पाहता येईल ?

आजचा सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्क आणि Disney plus Hotstar वर पाहता येईल. तसेच या सामन्याचे सर्व अपडेट्स loksatta.com या लोकसत्ताच्या ऑफिशियल वेबसाईटवरदेखील मिळतील.

18:33 (IST) 28 Mar 2022
लखनऊ सुपर जायंट्सचे संभाव्य प्लेइंग इलेव्हन

केएल राहुल (कर्णधार ), क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), एविन लुईस, मनीष पांडे, दीपक हुडा, क्रुणाल पांड्या, कृष्णप्पा गौथम, रवी बिश्नोई, अँड्र्यू टाय, अंकित राजपूत, आवेश खान

18:33 (IST) 28 Mar 2022
गुजरात टायटन्सचे संभाव्य प्लेइंग इलेव्हन

शुभमन गिल, रिद्धिमान साहा (यष्टीरक्षक), मॅथ्यू वेड, विजय शंकर, डेव्हिड मिलर, हार्दिक पंड्या (कर्णधार), राहुल तेवतिया, रशीद खान, मोहम्मद शमी, लॉकी फर्ग्युसन, आर साई किशोर