IPL 2022, GT vs MI Match Highlights : आयपीएलच्या पंधराव्या हंगामात आज मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स या दोन संघांमध्ये लढत होत आहे. गुणतालिकेत अव्वल स्थानावर असलेल्या गुजरात टायटन्सला आजचा सामना जिंकून प्लेऑफमध्ये स्थान निश्चित करण्याची चांगली संधी आहे. तर दुसरीकडे मुंबई इंडियन्सच्या यापूर्वीच प्लेऑफपर्यंत पोहोचण्याच्या आशा मावळल्या असून मुंबईकडे गमावण्यासारखे काहीही नाही. त्यामुळे आजचा हा सामना चांगलाच अटीतटीचा होत आहे.
मुंबई इंडियन्सचा पाच धावांनी विजय झाला आहे. शेवटच्या षटकात मुंबईने थराकक पद्धतीने गुजरातच्या हातातून विजय खेचून आणला.
मुंबई इंडियन्सला दुसरा मोठा झटका बसला आहे.मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न करताना वृद्धीमान साहा ५५ धावांवर झेलबाद झाला आहे.
गुजरात टायटन्सला पहिला मोठा झटका बासला आहे. शुभमन गिल ५२ धावांवर झेलबाद झाला आहे. मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न करताना तो झेलबाद झालाय.
गुजरात टायटन्स संघाकडून वृद्धीमान साहा आणि शुभमन गिल ही जोडी धकाडेबाज फलंदाजी करताना दिसत आहे. सध्या गुजरातच्या १०० धावा झाल्या आहेत. तसेच वृद्धीमान साहाचेही अर्धशतक झाले आहे.
गुजरात टायटन्सच्या सध्या ५४ धावा झाल्या आहेत. मुंबई इंडियन्सला अद्याप एकही गडी बाद करता आलेला नाही.
मुंबई इंडियन्सने वीस षटकांत १७७ धावा केल्या आहेत. त्यामुळे गुजरातला विजयासाठी १७८ धावा कराव्या लागणार आहेत. सध्या गुजरातकडून वृद्धीमान साहा आणि शुभमन गिल सलामीला आले आहेत.
मुंबई इंडियन्सला डॅनियल सॅम्सच्या रुपात सहावा मोठा झटका बासला आहे. सॅम्सला खातदेखील खोलता आलेलं नाही. सध्या मुंबईच्या १६४ धावा झाल्या आहेत.
मुंबई इंडियन्सला किरॉन पोलार्डच्या रुपात चौथा झटका बसला आहे. राशिद खानच्या चेंडूवर त्याचा त्रिफळा उडाला आहे. किरॉन पोलार्ड अवघ्या चार धावा करु शकला.
मुंबई इंडियन्सला किरॉन पोलार्डच्या रुपात चौथा मोठा झटका बसला आहे. किरॉन पोलार्ड त्रिफळाचित झाला आहे. राशिद खानने टाकलेल्या चेंडूवर तो बाद झालाय.
सध्या पहिल्या डावाचे १५ षटके संपले आहेत. मुंबईचे आतापर्यंत तीन गडी बाद झाले असून मुंबईच्या ११९ धावा झाल्या आहेत. तर दुसरीकडे गुजरात टायटन्स चौथ्या विकेटच्या शोधात आहे.
मुंबई इंडियन्स संघाला तिसरा मोठा झटका बसला आहे. इशान कशिन ४५ धावांवर झेलबाद झाला आहे.
मुंबई इंडियन्सच्या १०० धावा पूर्ण झाल्या आहेत. अकराव्या षटकात मुंबई इंडियन्सने ही धावसंख्या गाठली आहे.
मुंबई इंडियन्सला सूर्यकुमार यादवच्या रुपात दुसरा धक्का बसला आहे. सूर्यकुमार यादव १३ धावांवर असताना झेलबाद झाला आहे.
रोहित शर्मा बाद झाल्यानंतर दुसऱ्या विकेटसाठी सूर्यकुमार यादव फलंदाजीसाठी आला आहे. तर दुसलीकडे सलामीला आलेला इशान किशन गुजरातच्या गोलंदाजांची धुलाई करत असून त्याच्या ३९ झाल्या आहेत.
मुंबई इंडियन्सला रोहित शर्माच्या रुपात पहिला धक्का बसला आहे. राशिद खानच्या चेंडूवर शर्मा पायचित झाला आहे. ४३ धावांवर तो बाद झाला आहे.
मुंबई इंडियन्सने धमाकेदार सुरुवात केली आहे. संघाने ५० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. सध्या मुंबईच्या ६३ धावा झालेल्या असून एकही गडी बाद झालेला नाही. गुजरात टायटन्सला अजूनही पहिल्या विकेटची प्रतीक्षा आहे.
मुंबई इंडियन्सने सध्ये दमदार सुरुवात केली असून रोहित शर्मा आणि इशान किशन ही जोडी मोठे फटके मारताना दिसत आहे. सध्या मुंबईच्या एकही गडी बाद न होता ४० धावा झाल्या आहेत.
गुजरात टायटन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर मुंबईकडून आता इशान किशन आणि रोहित शर्मा फलंदाजासाठी सलामीला आले आहेत.
रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टीम डेव्हिड, किरॉन पोलार्ड, डॅनियल सॅम्स, मुरुगन अश्विन, कुमार कार्तिकेय, जसप्रीत बुमराह, रिले मेरेडिथ
वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), शुभमन गिल, साई सुदर्शन, हार्दिक पांड्या (कर्णधार), डेव्हिड मिलर, राहुल तेवातिया, राशिद खान, प्रदीप संगवान, लॉकी फर्ग्युसन, अल्झारी जोसेफ, मोहम्मद शमी