गुजरात आणि राजस्थान यांच्यातील प्लेऑफचा पहिला सामना अर्थात क्वॉलिपायर-१ चांगलाच रोमहर्षक ठरला. अखेरच्या षटकापंर्यंत चाललेल्या या सामन्यात गुजरात टायटन्सने राजस्थानवर सात गडी राखून दणदणीत विजय मिळवला. या विजयासह गुजरातने आता फायनलमधील आपले स्थान निश्चित केले आहे. तर पराभव झालेल्या राजस्थानला आणखी एक संधी असून हा संघ क्वॉलिफायर-२ मध्ये २७ मे रोजी एलिमिनेटर सामन्यामधील विजेत्याशी दोन हात करेल. राजस्थानने गुजरातसमोर विजयासाठी १८९ धावांचे लक्ष्य ठेवले होते. गुजरातने ही धावसंख्या सात गडी राखून गाठली.

हेही वाचा >>> IPL 2022, GT vs RR : राजस्थानचा सापळा यशस्वी! चोरटी धाव घेताना शुभमन गिल झाला खास पद्धतीने धावबाद

राजस्थानने विजयासाठी दिलेल्या १८९ धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या गुजरातची खराब सुरुवात झाली. गुजरातचा सलामीवर वृद्धीमान साहा पहिल्याच षटकात एकही धाव न करता झेलबाद झाला. त्यानंतर सलामीला आलेल्या शुभमन गिल आणि मॅथ्यू वेड या जोडीने चांगली खेळी केली. या जोडीने ७२ धावांची भागिदारी केली ज्यामुळे गुजरातचा डाव सावरला. मात्र संघाच्या ७२ धावा झालेल्या असताना शुभमन गिल धावबाद झाला. तसेच नंतर संघाच्या ८५ धावा झालेल्या असताना मॅथ्यू वेडदेखील झेलबाद झाला. आघाडीचे हे दोन्ही फलंदाज तंबुत परतल्यामुळे गुजरात संघावर दबाव वाढला.

हेही वाचा >>> IPL 2022, GT vs RR : क्वॉलिफायर-१ मध्ये संजू सॅमसनच्या नावावर नवा विक्रम, धोनीला टाकलं मागे

त्यानंतर मात्र हार्दिक पांड्या आणि डेव्हिड मिलर या जोडीने सावध पवित्रा घेत फलंदाजी केली. दोघांनीही अनुक्रमे नाबाद ५० आणि ५६ धावा केल्या. डेव्हिड मिलरची खेळी राजस्थानसाठी संजिवनी ठरली. संघ दबावामध्ये असताना त्याने ३६ चेंडूंमध्ये तीन चौकार आणि तीन षटकार लगावत ५६ धावांची नाबाद अर्धशतकी खेळी केली. ज्यामुळे गुजरातला विजयापर्यंत पोहोचता आलं.

हेही वाचा >>> खुशखबर! २०२३च्या आयपीएल पर्वात बंगळुरुचं बळ वाढणार; एबी डिव्हिलियर्स पुन्हा येणार

यापूर्वी गुजरात टायटन्स संघाने नाणेफेक जिंकून सुरुवातीला गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या राजस्थानची खराब सुरुवात झाली. संघाच्या ११ धावा झालेल्या असताना राजस्थानचा यशस्वी जैस्वाल अघव्या तीन धावा करुन झेलबाद झाला. त्यानंतर मात्र दुसऱ्या विकेटसाठी आलेला संजू सॅमसन आणि जोस बटरल या जोडीने चांगली खेळी केली. जोस बटलरने ५६ चेंडूंमध्ये १२ चौकार आणि २ षटकार लगावत ८९ धावांची खेळी केली.

हेही वाचा >>> DRS का घेतला नाही? खुद्द ऋषभ पंतने सांगितलं कारण; दुसऱ्यांवर फोडलं अपयशाचं खापर

बटलरच्या या खेळीमुळेच राजस्थान संघ चांगली धावसंख्या उभी करु शकला. बटलरला संजू सॅमसनने साथ दिली. त्याने धडाकेबाज फलंदाजी करत २६ चेंडूंमध्ये पाच चौकार आणि दोन षटकार लगावत ४७ धावा केल्या. बटलर आणि संजू सॅमसन या जोडीला देवदत्त पडिक्कलने २० चेंडूंमध्ये २८ धावा केल्या. हे तीन फलंदाज वगळता राजस्थानचा एकही खेळाडू चांगली फलंदाजी करु शकला नाही. राजस्थानने वीस षटके संपेपर्यंत १८८ धावा केल्या.

हेही वाचा >>> महिला टी-२० चॅलेंज : महाराष्ट्राची माया सोनवणे तळपली, गोलंदाजी ठरतेय चर्चेचा विषय; पाहा व्हिडीओ

गोलंदाजी विभागात दोन्ही संघातील गोलंदाज खास कामगिरी करु शकले नाही. गुजरातच्या मोहम्मद शमी, यश दयाल, साई किशोर, हार्दिक पांड्या या गोलंदाजांनी प्रत्येक एक बळी घेतला. तर राजस्थानच्या गोलंदाजांना गुजरातच्या फलंदाजांना रोखता आले नाही. राजस्थानचे गोलंदाज गुजरातचे फक्त तीन गडी बाद करु शकले.