IPL 2022, GT vs RR Qualifier 1 Highlights : आयपीएलच्या पंधराव्या हंगाम सध्या शेवटच्या टप्यात असून प्लेऑफच्या पहिल्या सामन्यात आज गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स या दोन संघांमध्ये लढत होत आहे. या सामन्यात ज्या संघाचा विजय होईल तो थेट फायनलमध्ये पोहोचेल. तर पराभूत संघाला फायनलमध्ये पोहोचण्यासाठी आणखी एक संधी दिली जाईल. कोलकाता येथील इडन गार्डन या स्टेडियमवर हा सामना खेळवला जात आहे.

Live Updates

IPL 2022, GT vs RR Live Updates : गुजरात विरुद्ध राजस्थान सामन्याचे लाईव्ह अपडेट्स फक्त एका क्लीकवर

23:33 (IST) 24 May 2022
गुजरात टायटन्स फायनलमध्ये, राजस्थानचा पराभव

गुजरात टायटन्सने राजस्थानवर सात गडी राखून राजस्थानवर विजय मिळवला आहे. या विजयासह गुजरात टायटन्स फायनलमध्ये पोहोचला आहे.

23:25 (IST) 24 May 2022
डेव्हिड मिलरचे अर्धशतक, गुजरातला सहा चेंडूंमध्ये १६ धावांची गरज

गुजरात टायटन्सच्या डेव्हिड मिलरने धमाकेदार केळी केली आहे. त्याने आपले अर्धशतक पूर्ण केले आहे. ३५ चेंडूंमध्ये त्याने ५० धावा केल्या आहेत. सध्या गुजरात टायटन्सला सहा चेंडूमध्ये १६ धावा हव्या आहेत.

23:05 (IST) 24 May 2022
हार्दिक पांड्या- डेव्हिड मिलर यांची संयमपूर्ण खेळी

गुजरात टायटन्स संघाचे हार्दिक पांड्या आणि डेव्हिड मिलर ही जोडी बचावात्मक पवित्रा घेत फलंदाजी करताना दिसत आहेत. सध्या गुजरातच्या १४१ धावा झालेल्या आहेत.

22:33 (IST) 24 May 2022
गुजरातला तिसरा मोठा झटका, मॅथ्यू वेड झेलबाद

गुजरात टायटन्सला मॅथ्यू वेडच्या रुपात तिसरा मोठा झटका बसला आहे. मॅथ्यू वेड ओबेड मॅक्कॉयच्या चेंडूवर ३५ धावांवर झेलबाद झाला.

22:03 (IST) 24 May 2022
गुजरात टायटन्सला पहिला झटका, वृद्धीमान साहा बाद

गुजरात टायटन्सला वृद्धीमान साहाच्या रुपात पहिला झटका बसला आहे. साहा खातंदेखील खोलू शकला नाही. सध्या गुजरातच्या ३० धावा झाल्या आहेत.

21:25 (IST) 24 May 2022
राजस्थान रॉयल्सच्या १८८ धावा

राजस्थान रॉयल्सने वीस षटकांत १८८ धावा केल्या आहेत. तर विजयासाठी गुजरातला १८९ धावा कराव्या लागणार आहेत.

21:11 (IST) 24 May 2022
राजस्थानला चौथा मोठा झटका, हेटमायर झेलबाद

राजस्थान रॉयल्सला शिमरॉन हेटमायरच्या रुपात चौथा झटका बसला आहे. सध्या राजस्थानच्या १६० धावा झाल्या आहेत.

21:10 (IST) 24 May 2022
राजस्थान रॉयल्सच्या १६० धावा पूर्ण

राजस्थान रॉयल्सच्या सध्या १६० धावा झालेल्या असून जोस बटलर आणि शिमरॉन हेटमायर हे दोन फलंदाज मैदानावर आहेत. अजूनही गुजरातला चौथ्या विकेटचा शोध सुरु आहे.

21:00 (IST) 24 May 2022
जोस बटलरचे अर्धशतक पूर्ण, राजस्थानच्या १४४ धावा

राजस्थानचा फलंदाज जोस बटलर धमाकेदार खेळी करताना दिसत आहे. त्याने ४२ चेंडूमध्ये ५१ धावा केल्या आहेत. अजूनही तो मैदानावर फलंदाजी करत आहे.

20:50 (IST) 24 May 2022
राजस्थान रॉयल्सला तिसरा मोठा झटका, देवदत्त पडिक्कल त्रिफळाचित

राजस्थान रॉयल्सला तिसरा मोठा झटका बसला आहे. २८ धावांवर असताना देवदत्त पडिक्कल त्रिफळाचित झाला आहे. सध्या राजस्थान रॉयल्सच्या १२१ धावा झाल्या आहेत.

20:45 (IST) 24 May 2022
गुजरातला तिसऱ्या विकेटचा शोध

राजस्थान रॉयल्सच्या सध्या ११५ धावा झालेल्या आहेत. तर देवदत्त पडिक्कल आणि जोस बटलर हे दोन खेळाडू फलंदाजी करत आहेत. दुसरीकडे गुजरात टायटन्स संघाकडून तिसऱ्या विकेटचा शोध सुरु आहे.

20:28 (IST) 24 May 2022
राजस्थानला दुसरा मोठा झटका, संजू सॅमसन झेलबाद

राजस्थानला संजू सॅमसनच्या रुपात दुसरा मोठा झटका बसला आहे. संजू सॅमसनने २६ चेंडूंमध्ये ४७ धावा केल्या. सध्या राजस्थानच्या ८३ धावा झाल्या आहेत.

20:10 (IST) 24 May 2022
राजस्थान रॉयल्स संघाच्या ६१ धावा

संजू सॅमसन आणि जोस बटलर हो दोन्ही फलंदाज मोठे फटके मारताना दिसत आहेत. सध्या राजस्थान रॉयल्स संघाच्या ६१ धावा झाल्या आहेत.

19:53 (IST) 24 May 2022
राजस्थानकडून जोस बटलर-संजू सॅमसन मैदानात

राजस्थान रॉयल्सचा संध्या एक फलंदाज बाद झाला आहे. सध्या जोस बटलर आणि संजू सॅमसन हे दोन गडी फलंदाजी करत आहेत. सध्या राजस्थानच्या २८ धावा झाल्या आहेत.

19:41 (IST) 24 May 2022
राजस्थानला पहिला झटका, यशस्वी जैस्वाल झेलबाद

फलंदाजीसाठी आलेल्या राजस्थान रॉयल्सला पहिला मोठा झटका बसला आहे. सलामीला आलेला यशस्वी जैस्वाल अवघ्या तीन धावांवर झेलबाद झाला आहे.

19:09 (IST) 24 May 2022
गुजरात संघाने नाणेफेक जिंकली, सुरुवातीला गोलंदाजी करण्याचा निर्णय

गुजरात टायटन्स संघाने नाणेफेक जिंकली असून सुरुवातीला गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर आता राजस्थान संघ सुरुवातीला फलंदाजी करेल.

18:32 (IST) 24 May 2022
दोन्ही संघांची तयारी पूर्ण

आज क्वॉलिफायर-१ सामन्यामध्ये गुजरात आणि राजस्थान यांच्यात लढत होणार आहे. दोन्ही संघांनी विजयासाठी पूर्ण तयारी केली आहे. आजच्या सामन्याला ठीक ७.३० वाजता सुरुवात होईल. कोलकाता येथे इडन गार्डन स्टेडियमवर हा सामना खेळवला जातोय.

IPL 2022, GT VS RR Live Updates