पीटीआय, मुंबई : इंडियन प्रीमियर लीग ( आयपीएल) क्रिकेटच्या १२ हंगामांमध्ये चार जेतेपदे आणि पाच उपविजेतेपदे जिंकून देण्याची किमया साधणाऱ्या महेंद्रसिंह धोनीने चेन्नई सुपर किंग्जचे कर्णधारपद गुरुवारी रवींद्र जडेजाकडे सुपूर्द केले. शनिवारपासून ‘आयपीएल’च्या १५व्या हंगामाला प्रारंभ होत असून, जडेजाच्या नेतृत्वाखालील चेन्नईचा संघ कोलकाता नाइट रायडर्सशी सामना करणार आहे.

४० वर्षीय धोनी चेन्नईचे प्रतिनिधित्व करीत राहणार आहे, असे चेन्नई संघाकडून सांगण्यात आले. २००८मध्ये ‘आयपीएल’च्या पर्वाला प्रारंभ झाल्यापासून सर्वात सातत्यपूर्ण आणि यशस्वी संघ म्हणून चेन्नई संघाची ख्याती आहे. निकाल निश्चितीमुळे या संघाला २०१६ आणि २०१७ अशी दोन वर्षे निलंबित करण्यात आले होते. या दोन वर्षांत धोनीने पुणे सुपरजायंट संघाचे प्रतिनिधित्व केले होते. ‘‘धोनीने चेन्नईच्या नेतृत्वासाठी जडेजाची निवड केली आहे. जडेजा २०१२पासून चेन्नई संघाचा महत्त्वाचा भाग आहे. चेन्नईचे नेतृत्व सांभाळणारा तो केवळ तिसरा खेळाडू असणार आहे,’’ असे चेन्नई संघाने म्हटले आहे.

Indian Premier League Cricket Mumbai vs Chennai ipl 2024 match sport news
इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट: मुंबई-चेन्नई आमनेसामने! पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांत आज वानखेडेवर होणाऱ्या द्वंद्वात धोनीवर लक्ष
rohit sharma virat kohli
ipl 2024, MI vs RCB: इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट: सलग दुसऱ्या विजयाचे लक्ष्य! मुंबई इंडियन्ससमोर आज वानखेडेवर रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुचे आव्हान
riyan parag
वेदनाशामक औषधे घेऊन रियान परागची निर्णायक खेळी!
ipl 2024 rajasthan royals vs delhi capitals
IPL 2024 : पंतच्या नेतृत्वाचा कस! दिल्ली कॅपिटल्ससमोर आज राजस्थान रॉयल्सचे आव्हान; फलंदाजांकडून अपेक्षा

१५ ऑगस्ट २०२० या दिवशी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारणाऱ्या धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईने गेल्या वर्षी आपले चौथे जेतेपद मिळवले होते. २०१४मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या मध्यावर धोनीने कसोटी कर्णधारपद सोडले होते. मग विराट कोहली नेतृत्वक्षम असल्याची खात्री झाल्यावर २०१७मध्ये मर्यादित षटकांच्या क्रिकेटचे कर्णधारपद सोडले. चेन्नई संघाच्या कर्णधारपदाच्या शर्यतीत जडेजासमवेत अष्टपैलू मोईन अली आणि धडाकेबाज सलामीवीर ऋतुराज गायकवाडसुद्धा होते. परंतु अखेरीस धोनीच्या विश्वासातील ३३ वर्षीय जडेजाने बाजी मारली.

मोईनचा व्हिसा मंजूर

चेन्नईचा अष्टपैलू खेळाडू मोईन अलीला भारताचा व्हिसा मिळाला आहे आणि आयपीएलमध्ये संघाच्या दुसऱ्या लढतीसाठी तो उपलब्ध असेल. इंग्लंडचा हा खेळाडू गुरुवारी मुंबईत दाखल होईल; पण संघासोबत येण्यापूर्वी त्याला तीन दिवस विलगीकरणात राहावे लागेल आणि त्यामुळे कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध होणाऱ्या पहिल्या लढतीसाठी तो उपलब्ध नसेल.

धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईची कामगिरी

‘आयपीएल’ जेतेपद : २०१०, २०११, २०१८, २०२१

उपविजेतेपद : २००८, २०१२, २०१३, २०१५, २०१९

चॅम्पियन्स लीग जेतेपद : २०१०, २०१४

१२१ धोनीच्या नेतृत्वाखाली २०४ सामने खेळणाऱ्या चेन्नईने यापैकी विक्रमी १२१ सामने जिंकले आहेत.

धोनीने निर्णय घेतला असेल तर, तो संघाच्या हिताचाच असेल. त्यामुळे आम्हाला काळजी करण्याचे कारण नाही. त्याच्या निर्णयाचा आम्हाला आदर आहे. तो नेहमी मार्गदर्शक म्हणून आम्हासोबत आहे. हा त्याचा शेवटचा हंगाम असेल असे मला वाटत नाही. तो जोपर्यंत तंदुरुस्त आहे, तोपर्यंत त्याने खेळावे असे आम्हाला वाटते. गेली १० वर्षे जडेजा संघासमवेत आहे. त्यामुळे त्याला संघाच्या संस्कृतीची उत्तम जाणीव आहे.

– काशी विश्वनाथन, चेन्नई सुपर किंग्जचे मुख्य कार्यकारी अधिकारी