scorecardresearch

IPL 2022  KKR vs LSG : कोलकाताला लखनऊविरुद्ध मोठा विजय आवश्यक; जाणून घ्या दोन्ही संघांची प्लेइंग ११

Kolkata Knight Riders vs Lucknow Super Giants : लखनऊचा संघ प्ले-ऑफमध्ये स्थान मिळवण्यापासून एक पाऊल दूर आहे

KKR vs LSG Playing XI
KKR vs LSG Playing XI

IPL 2022 KKR vs LSG Playing XI : कोलकाता नाईट रायडर्सला बुधवारी शेवटच्या साखळी सामन्यात आयपीएल २०२२ च्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या त्यांच्या आशा जिवंत ठेवण्यासाठी मोठ्या विजयाची गरज आहे. दुसरीकडे, लखनऊ सुपर जायंट्स हा सामना जिंकून गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवण्याचा प्रयत्न करेल. कोलकाता १३ सामन्यांतून सहा विजयांसह १२ गुणांसह गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहे आणि मोठ्या फरकाने सामना जिंकला तरीही प्लेऑफसाठी पात्र होण्यासाठी त्यांना इतर सामन्यांच्या निकालांवर अवलंबून राहावे लागेल.

तर, लखनऊचा संघ प्ले-ऑफमध्ये स्थान मिळवण्यापासून एक पाऊल दूर आहे. संघाचे १३ सामन्यांतून १६ गुण आहेत. या सामन्यातील विजयामुळे त्यांचे प्लेऑफचे तिकीट निश्चित होईल. नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर दोन्ही संघांमधील सामना रंगणार आहे.

दोन वेळच्या चॅम्पियन केकेआरचा संघ गेल्या वर्षी फायनलमध्ये पोहोचला होता पण या मोसमात त्यांना गती राखता आली नाही. मात्र, गेल्या दोन सामन्यांत मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबादविरुद्ध विजय नोंदवून संघाने आपल्या आशा जिवंत ठेवल्या. आंद्रे रसेलच्या अष्टपैलू खेळामुळे आणि गोलंदाजांच्या दमदार कामगिरीमुळे श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील संघाने शेवटच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा ५४ धावांनी पराभव केला. रसेल आणि सॅम बिलिंग्सने या सामन्यात आघाडीची फळी ढासळल्यानंतर संघाला ६ बाद १७७ धावांपर्यंत नेले आणि त्यानंतर गोलंदाजांनी आपले काम चोख बजावले.

या सामन्यात लखनऊच्या संघाला सलग दोन पराभवांची साखळी तोडायची आहे. दोन्ही सामन्यात संघाच्या फलंदाजांनी निराशा केली होती. लखनऊचा संघ कर्णधार लोकेश राहुलवर जास्त अवलंबून आहे. केएल राहुलने या मोसमात दोन शतके झळकावली आहेत, मात्र गेल्या तीन सामन्यांमध्ये मोठी धावसंख्या करण्यात तो अपयशी ठरला आहे. लखनला या सामन्यात विजयाची नोंद करायची असेल, तर आवेश खान, मोहसीन खान, जेसन होल्डर आणि रवी बिश्नोई यांना चांगली गोलंदाजी करावी लागेल.

कोलकाता आणि लखनऊची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

कोलकाता नाईट रायडर्स: व्यंकटेश अय्यर, सुनील नरेन, नितीश राणा, श्रेयस अय्यर (क), शेल्डन जॅक्सन, सॅम बिलिंग्ज (विकेटकीपर), रिंकू सिंग, आंद्रे रसेल, उमेश यादव, टीम साऊदी, वरुण चक्रवर्ती.

लखनऊ सुपर जायंट्स: क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), केएल राहुल (क), दीपक हुडा, क्रुणाल पांड्या, आयुष बडोनी/मनीष पांडे, मार्कस स्टॉइनिस/एव्हिन लुईस, जेसन होल्डर, मोहसिन खान, रवी बिश्नोई, दुष्मंथा चमिरा, आवेश खान.

मराठीतील सर्व आयपीएल २०२२ ( Ipl ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ipl 2022 kkr vs lsg kolkata knight riders predicted playing xi against lucknow super giants match 66 abn

ताज्या बातम्या