scorecardresearch

Delhi Capitals Playing 11 | धडाकेबाज फलंदाज, दिग्गज गोलंदाज; जाणून घ्या दिल्ली कॅपिट्लस संघाचा संभाव्य प्लेइंग इलेव्हन

दिल्ली कॅपिटल्स २७ मार्च रोजी आतापर्यंत पाच वेळा जेतेपद पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्सशी भिडणार आहे.

delhi capitals
दिल्ली कॅपिटल्सचा संघ (फाईल फोटो)

आयपीएल १५ वा हंगाम दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. २६ मार्चपासून हा थरार रंगणार असून यावेळी ट्रॉफी जिंकण्यासाठी सर्वच संघांनी कसून तयारी केली आहे. एकदाही जेतेपद पटकावता न आलेला मात्र यावेळी तगडे खेळाडू आपल्या ताफ्यात असलेला दिल्ली कॅपिटल्स हा संघदेखील यावेळी मोठ्या तयारीनिशी मैदानात उतरणार आहे.

दिल्ली कॅपिटल्स हा संघ २७ मार्च रोजी आतापर्यंत पाच वेळा जेतेपद पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्सशी भिडणार आहे. याआधी दिल्लीने एकदाही जेतेपद पटकावले नसले तरी त्यांचा खेळ पाहता यावेळी ते ट्रॉफी घेऊन जाणाऱ्या संघांपैकी एक असतील असे म्हटले जात आहे. यापूर्वी दिल्ली कॅपटल्स हा संघ २०२० मध्ये अंतिम लढतीपर्यंत पोहोचला होता. या संघाने तीन वेळा प्ले-ऑफपर्यंत मजल मारलेली आहे. त्यामुळे हा इतिहास बघता या संघाकडे मोठा अनुभव असून ऋषभ पंत कर्णधार म्हणून संघाला योग्य दिशा देणार आहे. दिल्लीने लिलावात पंतला साथ देण्यासाठी दिग्गज असे खेळाडू खरेदी केले आहेत.

संघाकडे तगडे फलंदाज

यावेळी संघाने फलंदाजांची मोठी फौज उभी केली आहे. मागील हंगामात शिखर धवन आणि पृथ्वी शॉ या जोडीने संघासाठी चांगली भागिदारी केलेली आहे. मात्र यावेळी धवन दिल्लीच्या ताफ्यात नसेल. मात्र मिचेल मार्श, रोव्हमन पॉवेल असे तगडे फलंदाज दिल्लीकडे आहेत.

गोलंदाजीबद्दल बोलायचं झालं तर दिल्लीकडे शार्दुल ठाकूरसारखा हुकुमी गोलंदाज आहे. या गोलंदाजाच्या जोरावर दिल्लीला विरोधी संघाला थोपवणे सोपे जाणार आहे. त्याचबरोबर गोलंदाज म्हणून अॅनरिक नॉर्टजे, अक्षर पटेलचाही ऑप्शन दिल्लीकडे असणार आहेत.

गोलंदाजांची कमी भासणार ?

हा संघ फलंदाजीमध्ये सरस ठरत असला तरी, दिल्लीला गोलंदाजांची कमी भासू शकते. रिकी पॉंटिंग प्रशिक्षक असलेल्या या संघाकडे फिरकीपटूंची कमतरता आहे. दिल्लीने यावेळी आर. अश्विन आणि अमित मिश्रा यांना वगळले. त्यामुळे याचा फटका या संघाला बसू शकतो. मात्र गोलंदाजीमध्ये ऋषभ पंतसोबत कुलदीप यादव हा नवा खेळाडू मिळाल्यामुळे गोलंदाजांची कमतरता भरून काढता येऊ शकते.

दिल्ली कॅपिटल्सचा पूर्ण संघ

पृथ्वी शॉ, ऋषभ पंत, अक्षर पटेल, एनरिक नॉर्टजे, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, सरफराज खान, केएस भरत, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, कमलेश नागरकोटी, मुस्ताफीजूर रहमान, अश्विन हेब्बर, श्रीकर भारत, मनदीप सिंग, खलील अहमद, चेतन सकरीया, ललित यादव, रिपल पटेल, यश धुल, रोवमन पॉवेल, प्रवीण दुबे, लुंगीसानी एनगिडी, टिम सेफर्ट आणि विकी ओस्तवाल

दिल्ली कॅपिटल्सचे संभाव्य प्लेइंग इलेव्हन

पृथ्वी शॉ, डेव्हिड वॉर्नर, ऋषभ पंत (कर्णधार), अॅनरिक नॉर्टजे, मिचेल मार्श, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, रोवमन पॉवेल, कुलदीप यादव, सरफराज खान, खलील अहमद

मराठीतील सर्व आयपीएल २०२२ ( Ipl ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ipl 2022 know all about delhi capitals team squad and playing 11 prd

ताज्या बातम्या