scorecardresearch

Premium

IPL 2022 : सलमान खानला ओळखतो का? रबाडाने दिले मजेशीर उत्तर; म्हणाला, “मी फक्त…”

आयपीएल लिलावात पंजाब किंग्जने कागिसो रबाडाला ९.२५ कोटी रुपयांना आपल्या संघात सामील केले होते

Kagiso Rabada

इंडियन प्रीमियर लीगच्या चालू हंगामातील पंजाब किंग्जची कामगिरी चढ-उतारांनी भरलेली आहे. मयंक अग्रवालच्या नेतृत्वाखालील संघाने आतापर्यंत ११ पैकी ६ सामने गमावले आहेत. अशा परिस्थितीत पंजाबच्या संघाला प्लेऑफमध्ये जाण्याची शक्यता कायम राखण्यासाठी उर्वरित तीन सामने जिंकावे लागतील. पंजाब किंग्ज आता १३ मे रोजी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध त्यांच्या पुढील सामना खेळणार आहे. तर पुढील दोन सामने दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्याविरुद्ध आहेत.

सलमान खानला ओळखतो का?

Sudipti Hajela: Bought a horse by taking loan won gold after training in France Now ready to fight for the rest of my life
Sudipti Hajela: कर्ज काढून घोडा घेतला, फ्रान्समध्ये प्रशिक्षण घेऊन जिंकले सुवर्णपदक; म्हणाली, “आता आयुष्यभर लढायला तयार…”
militery nursing services
महिलांना सियाचीनमध्ये तैनात करतात, मग पुरुषांना नर्स म्हणून का नियुक्त करू नये? HC चा सवाल
Ishan challenged all teams in World Cup Said If anyone scores two runs against me I will run out
Ishan Kishan: इशानने वर्ल्डकपमधील सर्व संघांना दिले आव्हान; म्हणाला, “माझ्याविरुद्ध कोणी दोन धावा काढल्या तर मी…”
IND vs SL Match updates
IND vs SL: दुनिथ वेल्लालगेने आपल्या शानदार गोलंदाजीने सर्वांना केले चकित, पाच विकेट्स घेत रचला इतिहास

मैदानाबाहेर पंजाबचे खेळाडू उत्साहात दिसत आहेत. पंजाब किंग्सने जारी केलेल्या व्हिडिओमध्ये, अनेक परदेशी खेळाडू दिग्गज बॉलीवूड डायलॉग म्हणण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. पंजाब किंग्जच्या काही खेळाडूंनी एका मनोरंजक खेळात भाग घेतला, जिथे संघाच्या खेळाडूंच्या बॉलीवूडबदद्ल असलेल्या माहितीची चाचणी घेण्यात आली. वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाला विचारण्यात आले की, तो बॉलिवूड अभिनेता सलमानला ओळखतो का? यावर रबाडाने मजेशीर उत्तर देताना सांगितले की, ‘नाही, मी राशिद खानला ओळखतो. मात्र, दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजाने सलमान खानच्या ‘वॉन्टेड’ चित्रपटातील डायलॉग ‘एक बार जो मैंने कमिटमेंट कर दी फिर मैं अपने बाप की भी नहीं सुनता’ म्हणण्याचा प्रयत्न केला.

स्मिथ-एलिसही सहभागी

यामध्ये कागिसो रबाडा व्यतिरिक्त ऑस्ट्रेलियाचा ओडियन स्मिथ आणि नॅथन एलिस सहभागी झाले होते. यावेळी ओडियन स्मिथने ‘दामिनी’ चित्रपटातील सनी देओलचा ‘तारीख पे तारीख, तारीख पर तारीख’ हा डायलॉग म्हणण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी एलिस बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानच्या ओम शांती ओम या चित्रपटातील ‘पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त’ हा डायलॉग बोलताना दिसला.

९.२५ कोटींमध्ये रबाडा पंजाबकडे

आयपीएल लिलावात पंजाब किंग्जने कागिसो रबाडाला ९.२५ कोटी रुपयांना आपल्या संघात सामील केले होते. आयपीएलच्या गेल्या मोसमात रबाडा दिल्ली कॅपिटल्सचा भाग होता. आयपीएल २०२२ मध्ये रबाडाने आतापर्यंत १० सामन्यात १७.८४ च्या सरासरीने १८ विकेट घेतल्या आहेत. रबाडाने २०१७ मध्ये पहिल्यांदा आयपीएलमध्ये भाग घेतला होता. ६० आयपीएल सामन्यांमध्ये रबाडाने २०.०३ च्या सरासरीने ९४ विकेट घेतल्या आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व आयपीएल २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ipl 2022 know salman khan question asked from kagiso rabada then gave this funny answer abn

First published on: 10-05-2022 at 16:11 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×