हार्दिक पांड्याकडून अर्धशतकांची हॅट्रिक, आंद्रे रसेलने अखेरच्या षटकात घेतल्या ४ विकेट | Loksatta

हार्दिक पांड्याकडून अर्धशतकांची हॅट्रिक, आंद्रे रसेलने अखेरच्या षटकात घेतल्या ४ विकेट

गुजरात टाइटन्सने २० षटकात ९ बाद १५६ धावा केल्या. यात गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्याच्या अर्धशतकी खेळीचा मोलाचा वाटा आहे.

हार्दिक पांड्याकडून अर्धशतकांची हॅट्रिक, आंद्रे रसेलने अखेरच्या षटकात घेतल्या ४ विकेट

आयपीएल २०० च्या (IPL 2022) ३५ व्या सामन्यात प्रथम फलंदाजी करायला मैदानात उतरलेल्या गुजरात टाइटन्सने २० षटकात ९ बाद १५६ धावा केल्या. यात गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्याच्या अर्धशतकी खेळीचा मोलाचा वाटा आहे. विशेष म्हणजे पांड्याने या अर्धशतकासह अर्धशतकांची हॅट्रिक केलीय. आता कोलकाता नाईट रायडर्सला विजयासाठी १५७ धावांची गरज असेल.

गुजरात टायटन्सची सुरुवात खराब झाली. त्यांना दुसऱ्याच षटकात सलामीवीर शुभमन गिलच्या रुपात पहिला झटका लागला. यानंतर कर्णधार हार्दिक पांड्याने बाजू सांभाळली. पांड्याचा शानदार फॉर्म कायम राहिला. त्यामुळेच सुरुवातीलाच विकेट जाऊनही गुजरातच्या धावांवर परिणाम झाला नाही.

हार्दिक पांड्याकडून ३६ चेंडूत अर्धशतक

ऋद्धिमान साहाने पांड्याची सोबत दिली. मात्र, वेगाने धावा करण्याच्या प्रयत्नात साहा बाद झाला. त्याने २५ चेंडूत २५ धावा केल्या. तो ११ व्या षटकात बाद झाला. यावेळी गुजरातची धावसंख्या ८३ होती. दरम्यान, हार्दिक पांड्याने ३६ चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. हे पांड्याचं सलग तिसरं अर्धशतक आहे.

डेविड मिलरने देखील हार्दिकला चांगली साथ दिली. दोघांनी मिळून अर्धशतकी भागिदारी केली. मात्र, १७ व्या षटकात मावीने ही भागिदारी तोडली. मिलरने २० चेंडूत २ षटकार आणि १ चौकाराच्या मदतीने २७ धावा केल्या. यानंतर पुढच्याच षटकात टिम साऊदीने आधी हार्दिक पांड्या (४९ चेंडूत ६७ धावा, ४ चौकार आणि २ षटकार) आणि राशिद खान (०) अशा दोन विकेट घेतल्या.

आंद्रे रसेलने अखेरच्या षटकात घेतल्या ४ विकेट

हेही वाचा : IPL 2022, GT vs KKR Match Updates: गुजरातच्या २० षटकात ९ बाद १५६ धावा, कोलकाताला विजयासाठी १५७ धावांचं आव्हान

अखेरच्या ५ षटकात गुजरातच्या संघाने केवळ २९ धावा केल्या आणि ७ विकेट गमावल्या. विशेष म्हणजे अखेरच्या षटकात आंद्रे रसेलने गुजरात टाइटन्सच्या ४ खेळाडूंना तंबूत पाठवलं. त्यामुळेच गुजरातला २० षटकात ९ बाद केवळ १५६ धावाच करता आल्या. केकेआरकडून आंद्रे रसेलने सर्वाधिक ४ विकेट, टिम साऊदीने ३, उमेश यादव आणि शिवम मावीने प्रत्येकी एक विकेट घेतली.

मराठीतील सर्व आयपीएल २०२३ ( Ipl ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
VIDEO: कोणाचं काय तर कोणाचं काय… मैदानात ‘नो बॉल’चा वाद सुरु असताना चहल, कुलदीप काय करत होते पाहिलं का?

संबंधित बातम्या

IND vs BAN: न्यूझीलंडहून परतणारे टीम इंडियाचे खेळाडू खराब व्यवस्थेचे बळी; दीपक चहरने केली तक्रार, जाणून घ्या प्रकरण
IND vs BAN: ‘त्यांच्याविरुद्ध जिंकण्यासाठी आम्हाला…’; सामन्याआधी रोहित शर्माचे संघासाठी सूचक वक्तव्य
IND vs NZ : “माझ्या तोंडात गुटखा नव्हता, तर…”, VIRAL झालेल्या ‘त्या’ व्यक्तीची ओळख पटली; सोबत बसलेली महिला…
FIFA World Cup 2022: स्टार फुटबॉलपटूने जल्लोषात केले असे काही; रेफ्रींनी काढले मैदानाबाहेर, जाणून घ्या कारण
कपिल देव यांनी शेअर केला ‘83’ चित्रपटाचा ट्रेलर; भावूक होत म्हणाले, ‘‘माझ्या संघाची कहाणी”!

व्हिडिओ

ताज्या बातम्या
गुजरातमध्ये उद्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान; प्रचाराची धामधूम संपली
‘तृणमूल’च्या सभास्थळाजवळ स्फोट, तीन जण ठार
मोदींबाबत अपशब्द ही काँग्रेससाठी नित्याची बाब !
भारतीय हद्दीत चीनचे निवारे; मोदी सरकार गप्प का? काँग्रेसचा सवाल
‘साथ सोबत’ पोस्टर प्रकाशित