आयपीएल २०२२ च्या ४५ व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सने दिल्ली कॅपिटल्सचा सहा धावांनी पराभव केला. दोन्ही संघांमध्ये रंगलेला सामना खूपच रोमांचक झाला. विजयानंतर लखनऊच्या संघाने आनंदोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली. दरम्यान, संघाचा मेंटॉर आणि भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने आपला संयम गमावला. गंभीरने अशी प्रतिक्रिया दिली की त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विजयानंतर गंभीरला आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवता आले नाही आणि थेट सामन्यादरम्यानच त्याने मोठी चूक केली. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये गंभीर खूप चिडलेला दिसत आहे. तो इतका संतापला होता की मॅचदरम्यानच त्याच्या तोंडून शिव्या निघाल्या. ही प्रतिक्रिया गंभीरच्या बाजूने पाहायला मिळाली कारण लखनऊ आणि दिल्ली यांच्यात खेळला गेलेला सामना शेवटच्या षटकापर्यंत गेला आणि अतिशय रोमांचक होता. दिल्लीचा पराभव होताच गंभीरला आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवता आले नाही आणि त्याच्या तोंडून अपशब्द निघाले.

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सने दिल्ली कॅपिटल्सचा  सहा धावांनी पराभव केला. लखनऊचा या स्पर्धेतील हा सातवा विजय असून, संघ आता गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. लखनऊने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना केएल राहुलच्या नेतृत्वाखालील लखनऊ सुपर जायंट्स संघाने २० षटकांत ३ गडी गमावून १९५ धावा केल्या. प्रत्युत्तरात दिल्लीचा संघ १८९ धावा करू शकला आणि सहा धावांनी सामना गमावला. शेवटच्या तीन चेंडूंवर १३ धावांची गरज होती, पण अक्षर पटेलने धाव घेतली आणि नंतर शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकला.

दरम्यान, रविवारी केएल राहुलने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध शानदार खेळी केली. यादरम्यान, त्याने पहिला षटकार मारताच, तो आयपीएलमध्ये भारतासाठी सर्वात वेगवान १५० षटकार मारणारा फलंदाज बनला. आयपीएलच्या या मोसमात केएल राहुल लयीत दिसत आहे. काही सामने वगळता त्याने सातत्याने धावा केल्या आहेत.

केएल राहुलने ३५ चेंडूत तीन चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने अर्धशतक पूर्ण केले. त्याचे आयपीएल कारकिर्दीतील हे २९ वे अर्धशतक आहे. केएल राहुलचे आयपीएल २०२२ मधील हे तिसरे अर्धशतक आहे. या मोसमात त्याने दोन शतकेही झळकावली आहेत. कर्णधार केएल राहुलने आयपीएल २०२२ मध्ये ४०० हून अधिक धावा केल्या आहेत. केएल राहुल या मोसमात दोनदा खातेही न उघडता बाद झाला आहे.

मराठीतील सर्व आयपीएल २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2022 lsg vs dc gautam gambhir abused in live match angry video of lucknow super giants viral abn
First published on: 02-05-2022 at 15:55 IST