आयपीएल २०२२ च्या ५७ व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सचा गुजरात टायटन्सने पराभव केला आहे. गुजरातने हा सामना ६२ धावांनी जिंकला आणि आयपीएलच्या या हंगामातील प्लेऑफसाठी पात्र ठरले. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना गुजरातने ४ गडी गमावून १४४ धावा केल्या. आता लखनऊला विजयासाठी १४५ धावांचे लक्ष्य मिळाले आहे. प्रत्युत्तरात लखनऊचा संघ १३.५ षटकांत ८२ धावांत गारद झाला.

लखनऊची सुरुवात चांगली झाली नाही. चौथ्या षटकातच संघाला मोठा धक्का बसला. यश दयालने क्विंटन डी कॉकला माघारी पाठवले. पाचव्या षटकात केएल राहुल बाद झाला. सहाव्या षटकात यश दयालने करण शर्माला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. पॉवरप्लेमध्ये ३७ धावा झाल्या आणि ३ विकेट पडल्या. कृणाल पांड्याला आठव्या षटकात राशिद खानने पॅव्हेलियनमध्ये पाठवले. साई किशोरने ११व्या षटकात आयुष बडोनीला बाद केले. मार्क्स स्टॉइनिस १२व्या षटकात बाद झाला. १२व्या षटकात जेसन होल्डरला राशिद खानने बाद केले. साई किशोरने मोहसीन खानला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. रशीदने १४व्या षटकात दीपक हुडाला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. राशिद खानने आवेश खानला १२ धावांवर बाद करत लखनऊचा डाव संपवला.

तर गुजरातकडून शुभमन गिलने अर्धशतक झळकावले. संघाची सुरुवात चांगली झाली नाही. तिसऱ्या षटकातच संघाला मोठा धक्का बसला. मोहसीन खानने वृद्धमान साहाला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. ५व्या षटकात आवेश खानने मॅथ्यू वेडला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. पॉवरप्लेमध्ये ३५ धावा झाल्या आणि दोन विकेट पडल्या. आवेश खानने १०व्या षटकात हार्दिक पांड्याला पायचीत केले. डेव्हिड मिलरला १६व्या षटकात जेसन होल्डरने बाद केले. राहुल तेवतिया २२ आणि शुभमन गिलने ६३ धावा करून नाबाद राहिले.