आयपीएलचे पंधरावे पर्व आता शेटच्या टप्प्यात आहे. प्लेऑफर्यंत पोहोचण्यासाठी संघांमधील चुरस वाढली आहे. असे असताना आज लखनऊ सुपर जायंट्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात या पर्वातील ६३ वा सामना ब्रेबॉर्न स्टेडिंयमवर संध्याकाळी ७.३० वाजता खेळवला जाणार आहे.

हेही वाचा >>> अॅन्ड्र्यू सायमंड्सच्या निधनानंतर सचिन तेंडुलकरने व्यक्त केले दु:ख, म्हणाला “आमच्या दोघांच्या…”

दोन्ही संघ गुणतालिकेत टॉप फोरमध्ये आहेत. त्यामुळे या दोन्ही संघांमध्ये आज अटीतटीची लढत होणार आहे. सध्या लखनऊ संघाने १२ पैकी ८ सामने जिंकले असून चार सामने गमावले आहेत. तर राजस्थान रॉयल्सने १२ पैकी सात सामने जिंकले असून पाच सामन्यांत पराभव पत्करला आहे. त्यामुळे आजचा सामना जिंकून प्लेऑफमधील स्थान निश्चित करण्यासाठी लखनऊ संघ प्रयत्न करताना दिसेल. तर राजस्थान रॉयल्सचाही तोच प्रयत्न असणार आहे.

हेही वाचा >>> शिखर धवन, हार्दिक पांड्या यांच्याकडे मोठी जबाबदारी, भारतीय संघाचे कर्णधारपद सोपवले जाण्याची शक्यता

आजच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सला फलंदाजी विभागात जास्त लक्ष देणे गरजेचे आहे. संघाची पूर्ण मदार जोस बटरलवर असेल. बटरलने चांगला खेळ केला नाही तर संजू सॅमसन, देवदत्त पडिक्कल तसेच शिमरॉन हेटमायर या फलंदाजांना आपली जबाबदारी पार पाडावी लागेल. या संघाकडे गोलंदाजांची चांगली फळी आहे. फिरकीपटू युझवेंद्र चहल आणि आर अश्विन चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. या दोन गोलंदाजांच्या जोरावर हा संघ लखनऊला खिंडीत गाठू शकतो. तर प्रसिध कृष्णा आणि ट्रेंट बोल्ट हे वेगवान गोलंदाजही राजस्थनसाठी मोठा आधार ठरणार आहेत.

हेही वाचा >>> अंबाती रायडू खरंच निवृत्त होणार? चेन्नईच्या सीईओंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले…

दुसरीकडे लखनऊ संघाकडे अनुभवी फलंदाजांची मोठी फौज आहे. केएल राहुल, क्विंटन डीकॉक, दीपक हुडा यांच्यावर संघ अवलंबून असेल. तर दुसरीकडे या संघाकडे चांगल्या गोलंदाजांची कमतरता भासतेय. असे असले तरी आवेश खान जेसन होल्डर, मोहसीन खान हे गोलंदाज संघाला सावरण्यास सक्षम आहेत. त्यामुळे आजचा सामना चांगलाच अटीतटीचा होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा >>> आयपीएल मॅच फिक्सिंग-सट्टेबाजी प्रकरणी CBIची मोठी कारवाई, सात जणांविरोधात गुन्हा दाखल

लखनऊ सुपर जायंट्स संघाचे संभाव्य प्लेइंग इलेव्हन : केएल राहुल (कर्णधार), क्विंटन डी कॉक, मार्कस स्टॉइनिस, दीपक हुडा, आयुष बदोनी, कृणाल पांड्या, जेसन होल्डर, दुषमंथा छमिरा, आवेश खान, मोहसिन खान, रवी बिश्नोई

राजस्थान रॉयल्स संघाचे संभाव्य प्लेइंग इलेव्हन: जोस बटलर, यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन (कर्णधार), देवदत्त पडिक्कल, रॅसी व्हीडी डुसेन, रियान पराग, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, प्रसिध कृष्णा, युझवेंद्र चहल, कुलदीप सेन