स्टार फलंदाज इशान किशनला आयपीएल २०२२ च्या लिलावात मुंबई इंडियन्सने १५,२५ कोटी रुपयांची भरघोस रक्कम देऊन पुन्हा संघात घेतले. मुंबईचा स्टार फलंदाज असणाऱ्या इशान किशनने हंगामाच्या सुरुवातीला काही सामन्यांमध्ये वेगवान फलंदाजी केली. पण त्याला आपला फॉर्म कायम ठेवता आला नाही आणि त्यामुळे त्याला आपल्या फलंदाजीने मोठी धावसंख्या उभारता आली नाही. लिलावात मिळालेल्या मोठ्या रकमेमुळे त्याच्या खेळावर परिणाम झाल्याचा खुलासा आता या डावखुऱ्या फलंदाजाने केला आहे. मात्र, लिलावानंतर काही दिवसांपर्यंत प्राईज टॅगचा दबाव राहील. पण संघाला विजय मिळवून देण्यासाठी आणि खेळ सुधारण्यावर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे आहे, असे त्याने म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ड्रेसिंग रुममध्ये अनुभवी खेळाडूंची उपस्थिती आणि विराट कोहली आणि हार्दिक पांड्यासारख्या खेळाडूंशी बोलणे यामुळे त्याला प्राईज टॅगच्या दबावावर मात करण्यास मदत झाल्याचे इशान किशनने सांगितले. “प्राईज टॅगचा दबाव तुमच्यावर जास्तीत जास्त १-२ दिवस राहतो. परंतु या टप्प्यावर तुम्हाला हे समजले पाहिजे की तुम्ही अशा गोष्टी लक्षात ठेवू शकत नाही आणि मला फक्त माझ्या संघाला जिंकण्यास कशी मदत करता येईल यावर लक्ष केंद्रित करायचे आहे. प्राईज टॅगचा दबाव निश्चितपणे काही दिवस टिकेल, पण जेव्हा तुमच्या आजूबाजूला असे चांगले वरिष्ठ असतील, जेव्हा तुम्ही त्यांच्याशी बोलत राहता तेव्हा त्याचा फायदा होतो,” असे इशान किशन म्हणाला.

मराठीतील सर्व आयपीएल २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2022 mi opener ishan kishan has advised virat kohli and rohit sharma abn
First published on: 11-05-2022 at 18:17 IST