MI vs DC Live Update : आयपीएलचा पंधरावा हंगाम आता शेवटच्या टप्प्यात आहे. आज दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स या दोन संघांमध्ये लढत होणार आहे. प्लेऑफमध्ये पोहोचायचे असेल तर दिल्लीला आजचा सामना जिंकणे अनिवार्य आहे. तर दुसरीकडे आज दिल्लीचा पराभव झाला तर प्लेऑफमध्ये बंगळुरु संघाचा प्लेऑफमध्ये समावेश होईल. त्यामुळे आजचा सामना चांगलाच अटीतटीचा होणार आहे.

Live Updates

IPL 2022, MI vs DC Live Updates : मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामन्याचे लाईव्ह अपडेट्स एका क्लीकवर

23:38 (IST) 21 May 2022
मुंबईचा पाच गडी राखून विजय

मुंबई इंडियन्स संघाने दिल्लीवर पाच गडी राखून विजय मिळवला आहे. मुंबईच्या या विजयामुळे दिल्ली संघाचे आव्हान संपुष्टात आले आहे. तर दुसरीकडे बंगळुरु संघाचे प्लेऑफमधील स्थान निश्चित झाले आहे.

23:23 (IST) 21 May 2022
मुंबईला सहा चेंडूंमध्ये पाच धावांची गरज

हा सामना चांगलाच अटीतटीचा होत असून मुंबई इंडियन्सला विजयासाठी सहा चेंडूंमध्ये पाच धावांजी गरज आहे.

23:14 (IST) 21 May 2022
मुंबई इंडियन्सला चौथा मोठा झटका, टीम डेव्हिड झेलबाद

मुंबई इंडियन्सला टीम डेव्हिडच्या रुपात चौथा मोठा झटका बसला आहे. संघ अडचणीत असताना टीम डेव्हिडने धडाकेबाज फलंदाजी करत ११ चेंडूंमध्ये ३४ धावा केल्या.

22:57 (IST) 21 May 2022
मुंबई इंडियन्सला तिसरा मोठा झटका

मुंबई इंडियन्सला तिसरा मोठा झटका बसला आहे. देवाल्ड ब्रेविस ३७ धावांवर त्रिफळाचित झाला आहे.

22:36 (IST) 21 May 2022
मुंबई इंडियन्सला दुसरा मोठा झटका, इशान किशन झेलबाद

मुंबई इंडियन्सला दुसरा मोठा झटका बसला आहे. इशान किशन ४८ धावांवर झेलबाद झाला आहे. सध्या मुंबई इंडियन्सच्या ७२ धावा झाल्या आहेत.

22:17 (IST) 21 May 2022
मुंबई इंडयन्सच्या ४० धावा, दिल्लीला दुसऱ्या विकेटचा शोध

मुंबई इंडियन्सच संघाच्या सध्या चाळीस धावा झाल्य आहेत. सध्या दिल्ली संघाला दुसऱ्या विकेटचा शोध आहे.

22:05 (IST) 21 May 2022
मुंबईला पहिला मोठा झटका, रोहित शर्मा झेलबाद

मुंबई इंडियन्सला रोहित शर्माच्या रुपात पहिला मोठा झटका बसला आहे. रोहित शर्मा फक्त दोन धावा करु शकला. सध्या मुंबईच्या २५ धावा झाल्या आहेत.

21:56 (IST) 21 May 2022
मुंबईकडून इशान किशन, रोहित शर्मा सलामीला

१६० धावांचा पाठलाग करण्यासाठी मुंबई इंडियन्सकडून इशान किशन आणि रोहित शर्मा सलामीला आले आहेत. सध्या मुंबईच्या १६ धावा झाल्या आहेत.

21:28 (IST) 21 May 2022
मुंबईसमोर विजयासाठी १६० धावांचे लक्ष्य

दिल्ली कॅपिटल्सच्या २० षटकांत १५९ धावा झाल्या. विजयासाठी मुंबईला १६० धावा कराव्या लागणार आहेत.

21:19 (IST) 21 May 2022
दिल्ली संघाला सातवा मोठा झटका, शार्दुल टाकुर झेलबाद

दिल्ली कॅपिटल्सला सातवा मोठा झटका बसला आहे. मोठा फटका मारताना शार्दुल ठाकुर झेलबाद झाला आहे. सध्या दिल्ली संघाच्या १५१ धावा झाल्या आहेत.

21:12 (IST) 21 May 2022
दिल्ली कॅपिटल्सला सहवा मोठा झटका, रोवमन पॉवेल त्रिफळाचित

दिल्ली कॅपिटल्सला रोवमन पॉवलेच्या रुपात सहावा मोठा झटका बसला आहे. रोवमन पॉवेलने ४३ धावा केल्या. सध्या दिल्लीच्या १४३ धावा झाल्या आहेत.

21:00 (IST) 21 May 2022
दिल्ली कॅपिट्लस संघारा पाचवा मोठा झटका, ऋषभ पंत झेलबाद

दिल्ली कॅपिटल्सला ऋषभ पंतच्या रुपात पाचवा मोठा झटका बसला आहे. ऋषभ पंत ३९ धावांवर झेलबाद झाला आहे. सध्या दिल्ली कॅपिटल्स संघाच्या १२५ धावा झाल्या आहेत.

20:54 (IST) 21 May 2022
दिल्ली कॅपिटल्स संघाच्या ११२ धावा; ऋषभ पंत, रोवमन पॉवले यांची तुफान फटकेबाजी

दिल्ली कॅपिट्लस संघाकडून ऋषभ पंत आणि रोवमन पॉवले ही जोडी मैदानावर टीकून मोठे फटके मारताना दिसत आहे. ऋषभ पंतच्या २९ तर रोमवन पॉवलेच्या ३५ धावा झाल्या आहेत. सध्या दिल्ली संघाच्या ११२ धावा झालेल्या आहेत.

20:13 (IST) 21 May 2022
मुंबई इंडियन्सला चौथा मोठा झटका, सरफराज खान झेलबाद

दिल्ली कॅपिटल्सला सरफराज खानच्या रुपात चौथा मोठा झटका बसला आहे. सध्या दिल्लीच्या ५० धावा झालेल्या आहेत. सरफराज खानने दहा धावा केल्या.

19:59 (IST) 21 May 2022
दिल्ली कॅपिटल्सला तिसरा मोठा झटका, पृथ्वी शॉ झेलबाद

मुंबई इंडियन्सला पृथ्वी शॉच्या रुपात तिसरा मोठा झटका बसला आहे. जसप्रतित बुमराहच्या चेंडूवर शॉ झेलबाद झाला. शॉने २३ चेंडूंमध्ये २४ धावा केल्या.

19:48 (IST) 21 May 2022
दिल्लीला दुसरा मोठा झटका, मिचेल मार्श झेलबाद

दिल्ली कॅपिटल्सला दुसरा मोठा झटका बसला आहे. जसप्रित बुमराहच्या चेंडूवर मिचेल मार्श झेलबाद झाला आहे.

19:46 (IST) 21 May 2022
दिल्ली कॅपिटल्सला पहिला झटका, डेविड वॉर्नर झेलबाद

दिल्ली कॅपिटल्सला डेविड वॉर्नरच्या रुपात पहिला झटका बसला आहे. वॉर्नर फक्त पाच धावा करु शकला.

19:38 (IST) 21 May 2022
डेविड वॉर्नर, पृथ्वी शॉ दिल्लीकडून आले सलामीला

मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे दिल्ली कॅपिटल्स संघाकडून पृथ्वी शॉ आणि डेविड वॉर्नर हे फलंदाज सलामीला आले आहेत.

19:30 (IST) 21 May 2022
मुंबईचा गोलंदाजी करण्याचा निर्णय

मुंबई इंडियन्स संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

18:52 (IST) 21 May 2022
प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी दिल्लीला विजय अनिवार्य

प्लेऑफमध्ये पोहोचायचे असेल तर दिल्ली कॅपिटल्स संघाला आज विजय मिळवने अनिवार्य आहे. आज मुंबईकडून पराभव झाला तर दिल्लीचे आव्हान संपुष्टात येईल.

18:51 (IST) 21 May 2022
मुंबई इंडियन्स संघ वानखेडे स्टेडियमकडे रवाना

मुंबई इंडियन्स संघ वानखेडे स्टेडियमकडे रवाना झाला आहे.

आज मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात लढत होत आहे.

 

रोहित शर्मा आणि ऋषभ पंत