आयपीएल २०२२च्या हंगामात, मुंबई इंडियन्स संघाने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली पहिला विजय नोंदवला आहे. शनिवारी झालेल्या सामन्यात मुंबई संघाने राजस्थान रॉयल्सचा पाच गडी राखून पराभव केला. मात्र, या विजयासह मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये पोहोचण्याची शक्यता नाही. मात्र या विजयामुळे या मोसमासाठी आणि आगामी हंगामासाठी संघाचे मनोबल नक्कीच उंचावेल. या विजयानंतर मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा म्हणाला की, सुरुवातीला या संघासोबतच खेळायला हवे होते आणि आम्ही असे आहोत आणि असेच खेळू.

मुंबई संघाने आतापर्यंत नऊ सामन्यांपैकी पहिले आठ सामने गमावले आहेत. मुंबई संघाला त्यांच्या नवव्या सामन्यात विजयाची चव चाखायला मिळाली. मात्र, मुंबई संघाच्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशाही नगण्य आहेत.

“आम्ही असेच खेळतो. आमच्या खेळाडूंमध्येही अशीच क्षमता आहे. आम्हाला माहित होते की येथे फलंदाजी करणे सोपे नाही पण आमच्या संघात ज्या प्रकारचे फलंदाज आहेत ते आमच्या बाजूने सामना फिरवू शकतात. आम्ही याच संघापासून सुरुवात केली असती, तर गोलंदाजीत काही बदल झाले असते. आम्ही ज्या संघासोबत खेळत होतो तो अशा खेळपट्टीवर खूप चांगला ठरला आहे. आमचे दोन्ही युवा फिरकीपटू खूप चांगले आहेत. ते धोका पत्करण्यास घाबरत नाही. जेव्हा मी शोकीनला बटलरला गोलंदाजी करण्यास सांगितले तेव्हा तो त्यासाठी पूर्णपणे तयार होता. जरी त्याला त्या षटकात काही षटकार मिळाले पण त्याने बटलरला बाद केले, त्यामुळे राजस्थान १५ ते २० धावा कमी करू शकला,” असे रोहित शर्माने सामन्यानंतर म्हटले.

MI vs RR : रोहित शर्मा बाद झाल्यानंतर रितिका सजदेहला अश्विनच्या पत्नीने मारली मिठी; पहा VIDEO

हृतिक आणि कार्तिक कुणालाही घाबरत नाहीत

“ही खेळपट्टी बाकीच्या तुलनेत थोडी सपाट आहे, इथे चेंडू थोडा थांबतो. आम्ही खूप प्रयत्न केले आणि सर्व सामने सर्वोत्कृष्ट कॉम्बिनेशने खेळले. पण पहिल्या आठ सामन्यांमध्ये ते कामी आले नाही. पण मला एक गोष्ट नक्की सांगायची आहे की, मागील सामन्यांमध्ये विरोधी संघांनी आम्हाला पराभूत केले नाही, पण आम्ही अगदी जवळ जावून पराभूत झालो आहोत. ते सामना आम्ही जिंकला असता तर परिस्थिती वेगळी असती. हृतिक आणि कार्तिक दोन्ही फिरकीपटू अप्रतिम आहेत. ते कोणासमोर घाबरत नाहीत. दोघांनाही काहीतरी खास करायचं आहे. त्यांनी मला कोणत्याही परिस्थितीत त्यांच्याकडे गोलंदाजी देण्याचा आत्मविश्वास दिला आहे,” असे रोहित शर्मा म्हणाला.

दरम्यान, मुंबई इंडियन्सचा कर्णधार आणि वाढदिवसाचा बॉय रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबई इंडियन्सने राजस्थान रॉयल्सला १५८ धावांत रोखले. जोस बटलरने ६७ धावा केल्या. १५९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सला चांगली सुरुवात करता आली नाही. मात्र तिसऱ्या क्रमांकावर खेळण्यासाठी आलेल्या सूर्यकुमार यादवने शानदार फलंदाजी केली. मुंबईने हा सामना पाच विकेटने जिंकला.