IPL 2022 MI vs SRH Playing XI : आयपीएलचा पंधरावा हंगाम आता शेवटच्या टप्प्यात आहे. प्लेऑफर्यंत पोहोचण्यासाठी सर्वच संघांची चुरस लागली आहे. असे असताना आज सायंकाळी ७.३० वाजता मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदरबाद यांच्यात वानखेडे स्टेडियमवर लढत होणार आहे. मुंबई संघ अगोदरच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडलेला आहे. मात्र हैदराबादची आशा अजूनही कायम असून प्लेऑफच्या शर्यतीत कायम राहायचे असेल तर या संघाला आजचा सामना जिंकणे गरजेचे आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >> ‘कुंबळेंना हटवा, संघ वाचवा’; पंजाब किंग्जच्या पराभवामुळे संतापलेल्या चाहत्यांची ट्विटरवरुन टीका

गुणतालिकेचा विचार कारयचा झाल्यास सनरायझर्स हैदराबाद हा संघ आठव्या स्थानी आहे. या संघाच्या वर पंजाब किंग्ज, केकेआर आणि बंगळुरु संघ आहेत. हैदराबादला प्लेऑफच्या शर्यतीत कायम राहायचे असेल तर कोणत्याही परिस्थिती आजचा सामना जिंकावा लागेल. तर दुसरीकडे गुणतालिकेत सर्वात शेवटी असलेल्या मुंबई संघाचे आव्हान याआधीच संपुष्टात आलेले आहे. त्यामुळे हा संघ हैदराबादसाठी अडचणीचा ठरु शकतो. आज मुंबई संघाचा विजय झाला तर हैदराबाद संघाचेही आव्हान औपचारिकरित्या संपुष्टात येणार आहे. आजच्या सामन्याबरोबरच हैदराबादला आणखी एक सामना जिंकावा लागणार आहे.

हेही वाचा >> दिल्ली कॅपिटल्सची पंजाब किंग्जवर १७ धावांनी मात, विजयानंतर घेतली थेट चौथ्या क्रमांकावर उडी

हैदराबाद संघाचा कर्णधार केन विल्यम्सन या हंगामात खास कामगिरी करु शकलेला नाही.त्याने आतापर्यंत फक्त २०८ धावा केल्या आहेत. त्यामुळे आजच्या सामन्यात त्याच्याकडून अपेक्षा केल्या जात आहेत. एडन मर्कराम आणि अभिषेक शर्मा यांच्याकडूनही आज चांगल्या खेळीची अपेक्षा आहे. हैदराबाद संघाकडे उमरान मलिक, टी. नटराजन यांच्यासारख्या दिग्गज गोलंदाजांची फळी आहे.

हेही वाचा >> मुंबई इंडियन्सचे बळ वाढणार, सूर्यकुमार यादवच्या जागेवर ‘हा’ दिग्गज खेळाडू ताफ्यात दाखल

तर दुसरीकडे मुंबई संघ हैदराबादला रोखण्याचा पूर्ण ताकतीने प्रयत्न करणार आहे. या हंगामात रोहित शर्मा चांगली कामगिरी करु शकलेला नाही. त्यामुळे संघाची भिस्त तिलक वर्मा, किरॉन पोलार्ड यांच्यावर आहे. तर गोलंदाजी विभागात डॅनियल सॅम्स आणि जसप्रित बुमहारसारखे तगडे खेळाडू मुंबईकडे आहेत. त्यामुळे आजच्या सामन्यात या दोन्ही संघांमध्ये अटीतटीची लढत होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा >> लियामला पाहून मुद्दाम स्ट्राईकवर आला, पण गोल्डन डकवर झाला बाद; दिल्लीच्या डेविड वॉर्नरला मोठा झटका

मुंबई इंडियन्स संघाचे संभाव्य प्लेइंग इलेव्हन: रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (यष्टिरक्षक), तिलक वर्मा, टीम डेव्हिड, हृतिक शौकीन, रमणदीप सिंग, डॅनियल सॅम्स, मुरुगन अश्विन, रिले मेरेडिथ, जसप्रीत बुमराह, कुमार कार्तिकेय</p>

हेही वाचा >> ‘महिला टी-२० चॅलेंज’साठी BCCIकडून तीन संघांची घोषणा; मिताली राज, झुलन गोस्वामी बाहेर

नरायझर्स हैदराबाद संघाचे संभाव्य प्लेइंग इलेव्हन: अभिषेक शर्मा, केन विल्यमसन (कर्णधार), राहुल त्रिपाठी, एडन मर्कराम, निकोलस पूरन, शशांक सिंग, जे सुचिथ, भुवनेश्वर कुमार, मार्को जानसेन, उमरान मलिक, टी नटराजन

मराठीतील सर्व आयपीएल २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2022 mi vs srh today match playing 11 match prediction and know who will win prd
First published on: 17-05-2022 at 14:58 IST