scorecardresearch

IPL 2022 : चाहत्याचे पत्र मिळाल्यावर एमएस धोनी झाला खुश; चेन्नईने फोटो शेअर करत म्हटले, “यलो लव्ह…”

कट्टर प्रतिस्पर्धी मुंबई इंडियन्सकडून पराभूत झाल्याने चेन्नई सुपर किंग्स संघ आयपीएल २०२२ मधून बाहेर पडला आहे

MS Dhoni was happy after receiving the CSK fan letter
(फोटो सौजन्य – @ChennaiIPL)

चेन्नई सुपर किंग्ज आयपीएल २०२२ मधून भलेही बाहेर पडली असली तरी त्यांच्या आवडत्या स्टार्सवरील चाहत्यांचे प्रेम कमी झालेले नाही. चेन्नई आणि मुंबई सारखे संघ स्पर्धेतून बाहेर पडले आहेत आणि पुढील हंगामाच्या तयारीसाठी ते आपल्या नवीन खेळाडूंना उर्वरित सामन्यांमध्ये संधी देत ​​आहेत. चेन्नई सुपर किंग्जने चालू हंगामात १३ सामने खेळले आहेत, त्यापैकी चार जिंकले आहेत आणि ९ गमावले आहेत. ८ गुणांसह संघ गुणतालिकेत नवव्या स्थानावर आहे.

संघाच्या निराशाजनक कामगिरीनंतरही चाहत्यांनी फ्रँचायझी आणि त्यांच्या आवडत्या खेळाडूंना पाठिंबा देणे थांबवले नाही. संघाच्या वाईट काळातही चाहेत त्यांना प्रोत्साहन देताना दिसत आहेत. इतर संघांप्रमाणे, चेन्नई सुपर किंग्जचा या हंगामात खराब फॉर्म असूनही, चाहत्यांनी चेन्नईला पाठिंबा दिला आहे. जडेजानंतर पुन्हा एकदा संघाची धुरा आपल्या हाती घेतलेल्या धोनीसाठी चेन्नई सुपर किंग्जच्या एका चाहत्याने एक पत्र लिहिले आहे. हे पत्र एमएस धोनीलाही खूप आवडले आहे.

“ओ कॅप्टन, आमचा कॅप्टन, तुझ्यासारखा कोणी होणार नाही,” अशी एक ओळ या पत्रात आहे. या पत्राला उत्तर देताना धोनीने त्यावर स्वाक्षरी केली आणि लिहिले, “चांगले लिहिले आहे. शुभेच्छा.” चेन्नई सुपर किंग्सने पत्राचे फोटो ट्विटरवर शेअर करत त्याला “यलो लव्ह फ्रेमड फॉर लाइफ और साइन विद लव्ह!,” कॅप्शन दिले आहे.

कट्टर प्रतिस्पर्धी मुंबई इंडियन्सकडून पराभूत झाल्याने चेन्नई सुपर किंग्स संघ आयपीएल २०२२ मधून बाहेर पडला आहे. पुढील मोसमात दमदार पुनरागमन करण्याचे त्याचे लक्ष्य असेल, मात्र धोनी संघाचा कर्णधार म्हणून कायम राहील की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

मराठीतील सर्व आयपीएल २०२२ ( Ipl ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ipl 2022 ms dhoni was happy after receiving the csk fan letter abn

ताज्या बातम्या