IPL 2022, PBKS vs LSG Match Updates : इंडियन प्रीमियर लीग २०२२ चा (IPL 2022) ४२ व्या सामना लखनऊ सुपरजायंट्स (LSG) आणि पंजाब किंग्जमध्ये (PBKS) पुण्यातील एमसीए स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात पंजाबने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. यानंतर प्रथम फलंदाजीला मैदानात उतरलेल्या लखनऊने २० षटकात ८ बाद १५३ धावा केल्या. मात्र, विजयासाठी १५४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या पंजाबला २० षटकात ८ बाद १३३ धावाच करता आल्या. यासह लखनऊने पंजाबवर २० धावांनी विजय मिळवला.

मयंक अग्रवालच्या नेतृत्वातील पंजाबने आपल्या संघाच्या प्लेईंग ११ मध्ये कोणताही बदल केलेला नव्हता. दुसरीकडे लखनऊच्या संघात एक बदल करण्यात आला होता. मनीष पांडेच्या जागेवर आवेश खानला पुन्हा संधी देण्यात आली होती.

Mumbai Indians vs Delhi Capitals match highlights in marathi
MI vs DC : मुंबई इंडियन्सने उघडले विजयाचे खाते, दिल्ली कॅपिटल्सचा २९ धावांनी उडवला धुव्वा
riyan parag
वेदनाशामक औषधे घेऊन रियान परागची निर्णायक खेळी!
IPL 2024 Mumbai Indians Tradition Of Losing First Match From 11 Years Continues
IPL 2024 Mumbai Indians: सलामीचा सामना हरण्याची मुंबईची परंपरा मोडेना, काय आहे एक दशकाचा इतिहास
IPL 2024 Gujarat Titans vs Mumbai Indians Match Updates in Marathi
IPL 2024: मुंबई इंडियन्स वि गुजरात टायटन्सच्या सामन्यात चाहते एकमेकांशी भिडले, नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये तुफान हाणामारी; व्हिडिओ व्हायरल

लखनऊ सुपर जायंट्सची इनिंग

लखनऊकडून क्विंटन डी कॉकने ३७ चेंडूत ४६ धावांची दमदार खेळी केली. यात त्याच्या ४ चौकार आणि २ षटकारांचा समावेश आहे. त्याला जितेश शर्माने झेलबाद केलं. दीपक हुड्डाने १ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने २८ चेंडूत ३४ धावांची खेळी केली. तो जॉनी बेयरस्टोच्या गोलंदाजीवर धावबाद झाला. याशिवाय दुष्मंथा चमीराने १० चेंडूत १७ धावा, मोहसिन खानने ६ चेंडूत नाबाद १३ धावा आणि जेसन होल्डरने ८ चेंडूत ११ धावा केल्या.

पंजाबकडून कगिसो रबाडाने सर्वाधिक भेदक गोलंदाजी केली. त्याने ४ षटकात ३८ धावा देत ४ विकेट घेतल्या. याशिवाय राहुल चहरने २ विकेट, तर संदीप शर्माने १ विकेट घेतली.

पंजाब किंग्सची इनिंग

पंजाबकडून फलंदाजीत जॉनी बेयरस्टोने २८ चेंडूत ३२ धावा केल्या. यात त्याच्या ५ चौकारांचा समावेश आहे. कर्णधार मयांक अग्रवालने २ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने १७ चेंडूत २५ धावा केल्या. ऋषी धवनने २२ चेंडूत नाबाद २१ धावा केल्या. त्याने ३ चौकार आणि १ षटकार लगावला. लियाम लिविंगस्टोनने १६ चेंडूत १८ धावा केल्या. यात त्याच्या २ षटकारांचा समावेश आहे.

गोलंदाजीत लखनऊकडून मोहसिन खानने ४ षटकात २४ धाव देत ३ विकेट घेतल्या. चमीरा आणि कृणाल पांड्याने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.

आयपीएल गुणतालिकेत लखनऊ आणि पंजाबचं स्थान काय?

पंजाबने आतापर्यंत आयपीएल २०२२ च्या १५ व्या हंगामात ९ सामने खेळले. यापैकी पंजाबने ४ सामने जिंकले, तर ५ सामन्यांमध्ये पराभव पत्करला. सध्या गुणतालिकेत पंजाब ८ गुणांसह सातव्या स्थानावर आहे. दुसरीकडे लखनऊने आतापर्यंत ९ पैकी ६ सामने जिंकले आहेत, तर ३ सामन्यांमध्ये पराभव स्वीकारला. लखनऊ गुणतालिकेत १२ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे.

विशेष म्हणजे हे दोन्ही संघ पहिल्यांदाच आमनेसामने आले आहेत. पंजाब किंग्जने मागील सामन्यात चेन्नई सुपर किंग्जला पराभूत केलं होतं. लखनऊ सुपर जायंट्सने मागील सामन्यात मुंबई इंडियन्सला पराभूत केलं होतं.

पंजाब किंग्स प्लेइंग इलेवन

मयंक अग्रवाल (कर्णदार), शिखर धवन, भानुका राजपक्षे, जॉनी बेयरस्टो, लियाम लिविंगस्टोन, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), ऋषी धवन, कगिसो रबाडा, राहुल चहर, संदीप शर्मा, अर्शदीप सिंह

लखनऊ सुपर जायंट्स प्लेइंग इलेवन

केएल राहुल (कर्णधार), क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), दीपक हुड्डा, मार्कस स्टोयनिस, आयुष बडोनी, क्रुणाल पांड्या, जेसन होल्डर, दुष्मंथा चमीरा, रवि बिश्नोई, अवेश खान, मोहसिन खान