IPL 2022, PBKS vs RCB Highlights : आयपीएलच्या पंधराव्या हंगामाला सुरुवात झाली असून या हंगामातील तिसरा सामना पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात खेळवला जातोय. दोन्ही संघ हंगामतील पहिलाच सामना खेळत असल्यामुळे विजयी सुरुवात करण्याचा दोघांचाही प्रयत्न आहे. पंजाब किंग्जचे नेतृत्व मयंक अग्रवाल करत असून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचे नेतृत्व फाफ डू प्लेसिसकडे आहे.

Gujarat Titans vs Punjab Kings Match Highlights in Marathi
PBKS vs GT : गुजरात टायटन्सचा पंजाब किंग्जवर ३ विकेट्सनी विजय, राहुल तेवतिया-साई किशोरचे शानदार प्रदर्शन
IPL 2024 Lucknow Super Giants vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
IPL 2024: राहुल-क्विंटन चेन्नईला पडले भारी, लखनौचा दणदणीत विजय
Shubman Gill fined 12 lakhs
IPL 2024 : गुजरात टायटन्सला पराभवानंतर आणखी एक धक्का, कर्णधार शुबमन गिलला ‘या’ कारणासाठी ठोठावला दंड
IPL 2024 Chennai Super Kings vs Gujarat Titans Match Updates in Marathi
IPL 2024 CSK vs GT Highlights: चेन्नईचा गुजरातवर एकतर्फी विजय, सांघिक कामगिरीच्या बळावर ६३ धावांनी केली मात
Live Updates
23:11 (IST) 27 Mar 2022
पंजाबला १७ चेंडूंमध्ये २९ धावांची गरज

पंजाब आणि बंगळुरु यांच्यात अटीतटीची लढत होत असून सध्या पंजाबला १७ चेंडूंमध्ये २९ धावांची गरज आहे.

22:55 (IST) 27 Mar 2022
राज बावा शून्यावर बाद

पंजाबला चौथा मोठा झटका बसला आहे. राज बावा शून्यावर बाद झाला आहे.

22:42 (IST) 27 Mar 2022
पंजाबला तिसरा मोठा झटका, राजपक्षे ४३ धावांवर बाद

पंजाबला भानुका राजपक्षेच्या रुपाने तिसरा मोठा झटका बसला आहे. तो ४३ धावांवर बाद झालाय. त्याने ही धावसंख्या २२ चेंडूंमध्ये ४ षटकार आणि दोन चौकारांच्या मदतीने उभारली आहे.

22:34 (IST) 27 Mar 2022
पंजाबला दुसरा मोठा झटका, शिखर धवन तंबुत परतला

पंजाबला शिखर धवनच्या रुपात दुसरा मोठा झटका बसला आहे. त्याने २९ चेंडूंमध्ये एक षटकार आणि पाच चौकारांच्या मदतीने ४२ धावा केल्या आहेत.

22:12 (IST) 27 Mar 2022
पंजाबला पहिला झटका, मयंक अग्रवाल ३२ धावांवर बाद

पंजाबला मयंक अग्रवालच्या रुपात पहिला झटका बसला आहे. त्याने २४ चेंडूंमध्ये ३२ धावा केल्या आहेत.

21:40 (IST) 27 Mar 2022
पंजाबच्या तीन षटकांमध्ये २८ धावा

पंजाबच्या तीन षटकांत २८ धावा झाल्या आहेत. सध्या धवन आणि मयंक अग्रवाल फलंदाजी करत आहेत.

21:39 (IST) 27 Mar 2022
मयंक अग्रवाल आणि शिखर धवन फलंदाजीसाठी उतरले

पंजाब किंग्जकडून मयंक अग्रवाल आणि शिखर धवन फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरले आहेत.

21:16 (IST) 27 Mar 2022
पंजाबमोर २०६ धावांचे आव्हान

बंगळुरू संघाने पूर्ण वीस षटके खेळून पंजाबसमोर २०६ धावांचे आव्हान उभे केले आहे. यामध्ये डू प्लेसिसने ८८ धावा केल्या तर विराट कोहलीने २९ चेंडूंमद्ये ४१ धावा करत पंजाबच्या गोलंदाजांना सळो की पळो करुन सोडले.

21:01 (IST) 27 Mar 2022
डू प्लेसिस बाद, ५७ चेंडूंमध्ये केल्या ८८ धावा

डू प्लेसिस अखेर ८८ धावांवर बाद झाला आहे. षटकारांचा अक्षरश: पाऊस पाडून त्याने बंगळुरुला मोठी धावसंख्या करण्यासाठी योगदान दिलं आहे. त्याने ५७ चेंडूंमध्ये ८८ धावा केल्या आहेत.

20:52 (IST) 27 Mar 2022
फाफ डू प्लेसिसने गोलंदाजांना फोडला घाम

फाफ डू प्लेसिसने पंजाबच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडले आहे. अजूनही तो मैदानावर पाय रोवून उभा असून आतापर्यंत त्यांना सात षटकार लागवले आहेत. तसेच सात षटकार आणि तीन चौकारांच्या जोरावर त्याने आतापर्यत ८७ धावा केल्या आहेत.

20:49 (IST) 27 Mar 2022
बंगळुरु मोठी धावसंख्या उभी करण्याची शक्यता

सध्या बंगळुरुच्या १५८ धावा झाल्या असून अजूनही तीन षटके बाकी आहेत. त्यामुळे बंगळुरु पंजाबसमोर मोठी धावसंख्या उभी करण्याची शक्यता आहे.

20:48 (IST) 27 Mar 2022
डू प्लेसिस-विराट कोहली जोडी खेळपट्टीवर सेट

सध्या बंगळुरुची डू प्लेसिस आणि विराट कोहली ही जोडी खेळपट्टीवर सेट झाली आहे. विराट सध्या ३३ धावांवर खेळतोय.

20:45 (IST) 27 Mar 2022
डू प्लेसिसने रोवले पाय, बंगळुरुचा फक्त एक गडी बाद

फाफ डु प्लेसिसने मैदानात चांगल्या प्रकारे पाय रोवले आहेत. तो सध्या ६९ धावांवर खेळत असून आतापर्यंत बंगळुरु संघाचा फक्त एक गडी बाद झालेला आहे.

19:47 (IST) 27 Mar 2022
पंजाबचा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय, डू प्लेसिस, रावत फलंदाजीसाठी मैदानात

पंजाब किंग्जने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या बंगळुरुचे फाफ डू प्लेसिस आणि अंजू रावत फलंदाजीसाठी मैदानात उतरले आहेत.