आयपीएलच्या शेवटच्या साखळी सामन्यावर पंजाब किंग्जने आपले नाव कोरले. पंजाबने हैदराबादला पाच गडी राखून धूळ चारली. हैदराबादने विजयासाठी पंजाबसमोर १५८ धावांचे लक्ष्य ठेवले होते. लियाम लिव्हिंगस्टोन आणि शिखर धवन यांनी धमाकेदार फलंदाजी केल्यामुळे पंजाबने ही धावसंख्या पाच गडी राखून गाठली.

हेही वाचा >>> उमरान मलिकने टाकलेला चेंडू पोटाला लागला, दुखापतीमुळे मयंक अग्रवाल थेट जमिनीवरच झोपला

पंजाब किंग्ज आणि हैदराबाद हे दोन्ही संघ याआधीच प्लेऑफच्या बाहेर पडलेले आहेत. त्यामुळे आजचा सामना विशेष नसेल असे अंदाज बांधले जात होते. मात्र हा सामना चांगलाच अटीतटीचा ठरला. हैदराबादने दिलेल्या १५७ धावांचे लक्ष्य गाठताना पंजाबची खराब सुरुवात झाली. पंजाबचा पहिला गडी जॉनी बेअरस्टो २८ धावांवर बाद झाला. त्यानंतर सलामीला आलेल्या शिखर धवनने समाधानकारक ३९ धावांची खेळी केली. शाहरुख खान (१९) आणि जितेश शर्मा (१९, नाबाद) यांनीदेखील पंजाबच्या विजयासाठी हातभार लावला. तर दुसरीकडे लियाम लिव्हिंगस्टोनने अवघ्या २२ चेंडूंमध्ये ४९ धावा करत पंजाबला विजय मिळवून दिला.

हेही वाचा >>> लियाम लिव्हिंगस्टोनने केली कमाल, एका हाताने टीपला अभिषेक शर्माचा अफलातून झेल

याआधी नाणेफेक जिंकून हैदराबादने सुरुवातीला फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र हैदराबादचा हा निर्णय चुकीचा ठरला. अभिषेक शर्मा (४३) वगळता दुसऱ्या एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. राहुल त्रिपाठी (२०), ऐडन मर्कराम (२१), वॉशिंग्टन सुंदर (२५), रोमारिओ शेफर्ड (२६) यांनी समाधानकारक खेळी केली. ज्यामुळे हा संघ १५७ धावांपर्यंत पोहोचू शकला.

हेही वाचा >>> आगामी टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा, उमरान मलिक, दिनेश कार्तिकला संधी, विराटला विश्रांती

पंजाब किंग्जचे नाथन इलिस आणि हरप्रित ब्रार यांनी नेत्रदीपक कामगिरी केली. त्यांनी प्रत्येकी तीन गडी बाद केले. ज्यामुळे हैदराबाद संघ खिळखिळा झाला. परिणामी पंजाबने या संघावर पाच गडी राखून विजय मिळवला.