scorecardresearch

IPL : मोहम्मद शमीसाठी अमेरिकन पॉर्नस्टारची पोस्ट; थेट शमीला टॅग करत म्हणाली…

गुजरात टायटन्स संघाकडून खेळताना शमीने दमदार कामगिरी केल्यानंतर ही पोस्ट चर्चेत आलीय.

IPL : मोहम्मद शमीसाठी अमेरिकन पॉर्नस्टारची पोस्ट; थेट शमीला टॅग करत म्हणाली…
शमीने या सामन्यात तीन विकेट्स घेतल्या (फोटो ट्विटरवरुन साभार)

आयपीएलच्या पंधाराव्या हंगामध्ये पहिल्यांदाच दहा संघ खेळत असून नव्याने सहभागी झालेल्या गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंट्सदरम्यानचा सामना सोमवारी वानखेडेवर पार पडला. या सामन्यामध्ये गुजरातच्या संघाने विजय मिळवला. मात्र या विजयामध्ये मोलाचा वाटा उचलला तो मोहम्मद शमीने.

नक्की वाचा >> IPL 2022: …अन् सामना सुरु असतानाच चहलने पत्नी धनश्रीला दिला Flying Kiss

मोहम्मद शमीने नवीन संघाकडून खेळताना पाहिल्याच सामन्यात आमच्या गोलंदाजीची कमाल दाखवली. शमीने तीन महत्वाच्या विकेट्स घेत दणक्यात यंदाच्या पर्वाचा श्रीगणेशा केला. आतापर्यंत शमीला कधीच इंडियन प्रिमिअर लिग म्हणजेच आयपीएलमध्ये पर्पल कॅपचा म्हणजेच सर्वाधिक विकेट्स घेण्याचा सन्मान मिळालेला नाही. मात्र यंदाच्या पर्वामधील पहिल्याच सामन्यातील कामगिरी पाहता तो यावर्षी पर्पल कॅपच्या शर्यतीत असेल याबद्दल दुमत नाही. शमीच्या या कामगिरीवर त्याचे चाहतेच नाही तर एक खास व्यक्तीही फिदा झालीय.

शमीने लखनऊचा कर्णधार के. एल. राहुलची पहिल्याच चेंडूवर विकेट काढली. त्यानंतर क्विंटन डी कॉक आणि मनीष पांडेचा अडथळाही शमीने दूर केला. त्याची ही भन्नाट कामगिरी पाहून एका अनेपक्षित व्यक्तीने त्याचं अभिनंदन केलंय. ही व्यक्ती म्हणजे हॉलिवूड तसेच अडल्ट फिल्म इंडस्ट्रीमधील पॉर्नस्टार किंद्रा लस्ट. शमीच्या कामगिरीनंतर किंद्राने ट्विटरवरुन त्याला टॅग करत एक ट्विट केलंय. यामध्ये तिने शमीचं अभिनंदन केलं आहे. विशेष म्हणजे किंद्रा ही क्रिकेटची चाहती आहे आणि ती क्रिकेट फॉलो करते हे अनेकांना ठाऊक नव्हतं. मात्र ती केवळ क्रिकेटची चाहतीच नाही तर मोहम्मद शमीचीही चाहती असल्याचं तिच्या ट्विटवरुन स्पष्ट झालंय.

“मोहम्मद शमीने अगदीच छान कामगिरी केलीय,” असं क्रिंद्राने ट्विट केलंय. यामध्ये तिने इमोन्जी सुद्धा वापरले असून शमीला टॅग केलं आहे. क्रिंदाचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे.

हा सामना गुजरातच्या संघाने पाच गडी राखून जिंकला. या विजयासहीत गुजरातने आपल्या नावावर दोन गुणांची नोंद केलीय.

मराठीतील सर्व आयपीएल २०२२ ( Ipl ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.