LSG vs KKR : डी कॉक आणि केएल राहुलने आयपीएलमध्ये रचला इतिहास; २१० धावांची भागेदारी करत केला विक्रम

या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सच्या सलामीवीरांनी अप्रतिम खेळी करत विक्रम केला.

lucknow super giants opener
(फोटो सौजन्य – IPL)

आयपीएल २०२२ सह स्पर्धेत पदार्पण करणाऱ्या लखनऊ सुपर जायंट्सने बुधवारी शानदार खेळ दाखवला आहे. आयपीएलच्या १५व्या हंगामातील गुणतालिकेत लखनऊचा संघ सुरुवातीपासूनच अव्वल ४ मध्ये आहे. त्याचवेळी, आता संघ प्लेऑफमध्ये आपले स्थान पक्के करण्यासाठी कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध खेळत आहे. या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सच्या सलामीवीरांनी अप्रतिम खेळी करत विक्रम केला.

मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या आयपीएल २०२२ च्या ६६ व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सने प्रथम खेळून २० षटकात एकही विकेट न गमावता २१० धावा केल्या. लखनऊकडून क्विंटन डी कॉक १४० आणि कर्णधार केएल राहुल ६८ धावांवर नाबाद माघारी परतले. डी कॉकने मोसमातील पहिले शतक झळकावले. त्याने ७० चेंडूत १० चौकार आणि १० षटकारांच्या मदतीने नाबाद १४० धावा केल्या. आयपीएलमधील डि कॉकची ही सर्वोच्च धावसंख्या आहे. त्याचवेळी कर्णधार केएल राहुलने ५१ चेंडूत नाबाद ६८ धावांची खेळी केली. यादरम्यान त्याच्या बॅटमधून ३ चौकार आणि ४ षटकार मारले. दोघांनी २१० धावांची सलामी भागीदारी केली. आयपीएलच्या इतिहासातील ही सर्वात मोठी सलामीची भागीदारी आहे.

प्रथम फलंदाजी करताना लखनऊने १९ षटकांत एकही विकेट न गमावता २१० धावा केल्या. डी कॉकने आयपीएलमधील आपले दुसरे शतक झळकावले. या सामन्यात डिकॅकने ७० चेंडूत १४० धावा करून नाबाद राहिला. कर्णधार केएल राहुलने ५१ चेंडूत ६१ धावा केल्या आहेत. त्यामुळे आता कोलकाताच्या संघापुढे २११ धावांचे लक्ष्य आहे.

दरम्यान, सुरुवातीला लखनऊ सुपर जायंट्सच्या दोन्ही सलामीवीरांनी अर्धशतके झळकावली. क्विंटन डी कॉकने ३६ चेंडूत ४ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने अर्धशतक पूर्ण केले. त्याचवेळी केएल राहुलने ४१ चेंडूत २ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ५० धावा केल्या. यानंतरही या फलंदाजांची बॅट थांबली नाही.

मराठीतील सर्व आयपीएल २०२२ ( Ipl ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ipl 2022 quinton de kock and kl rahul highest ever opening partnership in ipl history abn

Next Story
IPL 2022 : फिर हेरी फेरीच्या गाण्यावर राजस्थानच्या खेळाडूंचा ऑर्केस्ट्रा; पहा व्हिडिओ
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी