लखनऊ सुपर जायंट्सने कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध दुसऱ्या डावात धडाकेबाज सुरुवात केली आहे. या सामन्यात आयपीएलमधले दुसरे शतक ठोकत क्लिंटन डी कॉकने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. तसेच कर्णधार केएल राहुल आणि डी कॉकने नाबाद २१० धावांची भागीदारी करत आयपीएलमध्ये इतिहास रचला आहे. आतापर्यंत आयपीएलमध्ये कोणत्याही सलामीविरांना असा विक्रम करताना आलेला नाही. डी कॉकने फलंदाजीत तर कमाल केलीच पण क्षेत्ररक्षणातही कमाल केली आहे. डीवाय पाटील स्टेडियमवर व्यंकटेश अय्यरला बाद करण्यासाठी यष्टिरक्षक क्विंटन डी कॉकने शानदार झेल घेतला आहे.

व्यंटकेश अय्यरने पदार्पण करणाऱ्या अभिजीत तोमरसह डावाची सुरुवात केली. २११ धावांचा पाठलाग करताना आपल्या संघाला चांगली सुरुवात करून देण्याची त्याला आशा होती. मात्र, व्यंकटेश चार चेंडूंपेक्षा जास्त वेळ क्रीजवर राहू शकला नाही. दुसऱ्या डावात चेंडू टाकून खेळाला सुरुवात करणाऱ्या मोहसीन खानने अय्यरला परत पॅव्हेलियनमध्ये पाठवले.

मोहसीनने चांगल्या लेन्थवर चेंडू टाकला, ज्यामुळे व्यंकटेश अय्यरला धक्का बसला. अय्यर चेंडू खेळायला पुढे गेला, पण त्याऐवजी तो बॅटला लागून कीपरकडे गेला. डी कॉकने उजवीकडे उडी मारत एका हाताने शानदार झेल घेण्यासाठी पूर्ण लांबीचा डायव्ह टाकला. त्यामुळे व्यंकटेशला परत फिरावे लागले.

क्विंटन डी कॉक कदाचित पहिल्यांदाच त्याच्या आयुष्यातील रोमांचित सामना खेळत आहे. त्याआधी, त्याने पहिल्या डावात शतक झळकावून लखनऊल सुपर जायंट्सला २० षटकांत २१० पर्यंत नेले. क्विंटनने डावाची सुरुवात केली आणि ७० चेंडूत नाबाद १४० धावा केल्या. तो २०० च्या स्ट्राईक रेटने खेळला, त्यात दहा चौकार आणि तब्बल १० षटकार लगावले.