IPL 2022 RCB vs GT Playing XI: आयपीएलचा पंधरावा हंगाम शेवटच्या टप्प्यात आहे. लखनऊ सुपर जायंट्स आणि केकेआर यासारख्या संघांचे १४ सामने पूर्ण झाले आहेत. तर काही संघांचे एक-एक सामने शिल्लक असल्यामुळे प्लेऑफपर्यंत पोहोचण्यासाठी चांगलीच चुरस लागली आहे. आज गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सायंकाळी ७.३० वाजता लढत होणार आहे. या सामन्यात बंगळुरु संघाला विजय अनिवार्य असल्यामुळे आजची लढत चांगलीच अटीतटीची होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा >> IPL 2022 : “तो हिरो बनू शकला असता पण…”; रिंकू सिंहबद्दल कर्णधार श्रेयस अय्यरने व्यक्त केले मत

गुणतालिकेत गुजरात टायटन्स हा संघ २० गुण मिळवून प्रथम स्थानी आहे. या संघाने आपले प्लेऑफमधील स्थान निश्चित केलेले आहे. त्यामुळे आजचा सामना गमावल्यानंतरही या संघाला काही फरक पडणार नाही. मात्र सध्या गुणतालिकेत १४ गुणांसह पाचव्या स्थानी असलेल्या बंगळुरु संघाला आजचा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकणे गरजेचे आहे. आजचा सामना जिंकल्यास बंगळुरु संघाच्या प्लेऑफपर्यंत पोहोचण्याच्या आशा कायम राहतील अन्यथा पराजित झाल्यास या संघाचे आव्हान संपुष्टात येईल. त्यामुळे आजच्या सामन्यात विजय मिळवण्यासाठी हा संघ पूर्ण ताकतीने प्रयत्न करणार आहे.

हेही वाचा >> LSG vs KKR : ९ मॅचनंतर संधी मिळालेल्या एव्हिन लुईसनचा झेल ठरला ‘टर्निंग पॉइंट’; केकेआरकडून सामना घेतला हिसकावून

आरसीबी संघाचे संभाव्य प्लेइंग इलेव्हन: विराट कोहली, फॅफ डू प्लेसिस (कर्णधार), रजत पाटीदार, महिपाल लोमरोर, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), शाहबाज अहमद, हर्षल पटेल, वानिंदू हसरंगा, मोहम्मद सिराज, जोश हेझलवूड.

हेही वाचा >> KKR vs LSG: शतकी खेळीमागचं कारण सांगत क्विंटन डी कॉक म्हणाला, “गेल्या काही सामन्यात…”

गुजरात टायटन्स संघाचे संभाव्य इलेव्हन: वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), शुभमन गिल, मॅथ्यू वेड, हार्दिक पांड्या, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, साई किशोर, अल्झारी जोसेफ, यश दयाल, मोहम्मद शमी.