scorecardresearch

IPL 2022, RCB s LSG : विराटला नेमकं काय झालंय ? पहिल्याच चेंडूवर शून्यावर झेलबाद

आयपीएलच्या पंधराव्या हंगामात पहिल्या सामन्यात कोहलीने नाबाद ४१ धावा केल्या होत्या. मात्र त्यानंतर कोहलीने एकाही सामन्यात चांगली खेळी केलेली नाही.

virat kohli
विराट कोहली अशा प्रकारे बाद झाला (फोटो-iplt20.com)

आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील ३१ वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात खेळवला जातोय. सुरुवातीला फलंदाजीसाठी आलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची सुरुवात खूपच खराब झाली. विशेष म्हणजे बंगळुरुचा स्टार फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहली हादेखील पहिल्याच षटकात बाद झाला. कोणत्याही क्षणी सामन्याला कलाटणी देणारा विराट कोहली एकही धाव न करता बाद झाल्यामुळे त्याच्या खेळावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातोय.

हेही वाचा >>> वेगवान गोलंदाज उमरान मलिकचा टीम इंडियामध्ये समावेश होण्याची शक्यता, बीसीसीआयची निवड समिती करतेय गंभीर विचार

आयपीएलच्या पंधराव्या हंगामात पहिल्या सामन्यात कोहलीने नाबाद ४१ धावा केल्या होत्या. मात्र त्यानंतर कोहलीने एकाही सामन्यात चांगली खेळी केलेली नाही. कोलकाताविरुद्धच्या सामन्यात विराटने फक्त १२ धावा केल्या होत्या. तर आयपीएलच्या १३ व्या सामन्यात राजस्थानविरोधात खेळताना कोहली अवघ्या पाच धावांवर धावबाद झाला होता. २२ व्या सामन्यात चेन्नईविरोधात खेळताना कोहलीने फक्त एक धाव तर दिल्लीविरोधात अवघ्या १२ धावा केल्या. कोहली आपल्या खेळात आजच्या सामन्यात सुधारणा करेल अशी अपेक्षा होती. मात्र आजच्या सामन्यातही कोहली पहिल्याच चेंडूवर शून्यावर झेलबाद झाला.

हेही वाचा >>> Shreyas Iyer : केकेआरच्या श्रेयस अय्यरवर तरुणी फिदा, हातात पोस्टर घेत विचारले लग्न करशील का ?

विराट कोहलीने टी-२० क्रिकेटमध्ये याआधी अनेकवेळा धडाकेबाज खेळी केलेल्या आहेत. या क्रिकेट फॉरमॅटमध्ये कोहलीने शतकेदेखील झळकावले आहेत. मात्र या हंगामात कोहलीने अद्यापत चांगली फलंदाजी केलेली नाही. दरम्यान, सुरुवातीला फलंदाजीसाठी आलेल्या बंगळुरुने सहा गडी गमवत वीस षटकांमध्ये १८१ धावा केल्या. कर्णधार फॅफ डू प्लेसीसने ९६ धावांची तुफानी फलंदाजी केली.

मराठीतील सर्व आयपीएल २०२२ ( Ipl ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ipl 2022 rcb vs lsg match virat kohli falls for golden ducks prd

ताज्या बातम्या