रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने लखनऊ सुपर जायंट्सला चोख प्रत्युत्तर देत बुधवारी नवी मुंबईतील डॉ डी वाय पाटील स्पोर्ट्स अकादमीवर १८ धावांनी विजय मिळवला. लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुलने आरसीबीला प्रथम फलंदाजी करण्यास सांगितले. आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिसच्या ९६ धावांच्या दमदार खेळीच्या जोरावर आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना लखनऊसमोर १८२ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या धावसंख्येसमोर लखनऊला २० षटकांत आठ गडी गमावून १६३ धावाच करता आल्या. बंगळुरूकडून जोश हेझलवूडने आयपीएलमधील कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी करत चार विकेट घेतल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मात्र या सामन्यापूर्वी संध्याकाळी ७.२२ वाजता लखनऊ सुपर जायंट्सच्या ट्विटर पेजवर त्यांच्या प्लेइंग इलेव्हनची माहिती देत आरसीबीला आव्हान देण्याचा प्रयत्न केला. लखनऊ सुपर जायंट्सच्या अधिकृत सोशल मीडिया पेजवरुन रॉयल चॅलेंजर्स आरसीबी विरुद्धच्या प्लेइंग इलेव्हनबद्दल पोस्ट करताना, लखनऊने प्रसिद्ध ‘गँग्स ऑफ वासेपूर’ मधील वाक्याचा उपयोग केला होता. पेश है आज की प्लेइंग इलेव्हन. आरसीबी बेटा, तुमसे ना हो पाएगा, असे त्या पोस्टमध्ये म्हटले होते. सामन्यानंतर सोशल मीडियावरुन ही पोस्ट हटवण्यात आली आहे.

पण दिवसाच्या अखेरीस त्यांचे ट्विट पूर्णपणे उलटले. जेव्हा डीवाय पाटील क्रिकेट स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने लखनऊ सुपर जायंट्सचा १८ धावांनी पराभव केला. या सामन्यात बंगळुरूच्या संघाचे वर्चस्व असताना लखनऊला त्यांच्या ट्विटर हँडलवरून केजीएफ स्टार यशच्या छायाचित्रासह उत्तर देण्यात आले. आरसीबीने सोशल मीडिया पेजवरून ‘If you think you are bad, I am your dad,’ असे म्हटले आहे.

लखनऊच्या या ट्विटवर आरसीबीच्या चाहत्यांनी लखनऊच्या ट्विटर हँडलवर जोरदार टीका केली आणि घेराव घातला आणि त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली. मात्र, अनेक आरसीबी चाहत्यांनी असेही म्हटले की, अशा गोष्टींना क्रिकेटपासून दूर ठेवावे.

दरम्यान,आरसीबी आणि लखनऊ यांच्यात झालेल्या सामन्यात लखनऊचा कर्णधार केएल राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बंगळुरूचा संघ प्रथम फलंदाजीला उतरला आणि त्यांनी १८१ धावा ठोकल्या. बंगळुरूकडून कर्णधार फाफ डू प्लेसिसने ६४ चेंडूत ९६ धावा केल्या. त्यांच्याशिवाय मॅक्सवेलने २३ धावांची जलद, तर शाहबाज अहमदने २६ धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली.

आरसीबीकडून १८२ धावांचा पाठलाग करताना लखनऊच्या संघाला पॉवरप्लेमध्येच दोन मोठे धक्के बसले. प्रथम क्विंटन डी कॉक आणि नंतर मनीष पांडे यांची विकेट गेली. कर्णधार केएल राहुल सुरुवातीला सावध खेळताना दिसला. पण त्याने आपली विकेट हर्षल पटेलला दिली.

मराठीतील सर्व आयपीएल २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2022 rcb vs lsg rcb responde a lucknow beta tumse na ho payega tweet abn
First published on: 20-04-2022 at 17:01 IST