scorecardresearch

जोस बटलर ते विराट सगळे फ्लॉप; राजस्थानचा २९ धावांनी रॉयल विजय, बंगळुरुचा दारुण पराभव

राजस्थानने दिलेल्या १४५ धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी बंगळुरु संघाकडून विराट कोहली फॅफ डू प्लेसिस ही जोडी सलामीला आली.

rajasthan royals
राजस्थान रॉयल्सचा विजय झाला. (फोटो- iplt20.com)

आयपीएलच्या पंधराव्या हंगमामातील ३९ व्या सामन्यात राजस्थान आणि बंगळुरु यांच्यात अटीतटीची लढत झाली. राजस्थानने दिलेले १४५ धावांचे लक्ष्य गाठताना बंगळुरुची दमछाक झाली. या सामन्यात बंगळुरुचा २९ धावांनी पराभव झाला. बंगळुरु संघ पूर्ण गडी बाद होईफर्यंत फक्त ११५ धावा करु शकला. बंगळुरुचे सलामीवीर विराट कोहली आणि जोस बटलर या जोडीने खराब कामगिरी केल्यामुळे बंगळुरुला पराभवाचा सामना करावा लागला. तर राजस्थानचा तरुण खेळाडू रियान परागने फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या दोन्ही विभागांत मोठी कामगिरी केली. ज्यामुळे राजस्थानचा विजय सोपा झाला.

हेही वाचा >> पुन्हा तेच! सलामीला येऊनही विराट कोहली फ्लॉप, दुसऱ्याच षटकात प्रसिध कृष्णाने तंबुत पाठवलं

राजस्थानने दिलेल्या १४५ धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी बंगळुरु संघाकडून विराट कोहली-फॅफ डू प्लेसिस ही जोडी सलामीला आली. मात्र विराट कोहलीने निराशा केली. त्याने दहा चेंडूंमध्ये फक्त ९ धावा केल्या. तर फॅफ डू प्लेसिसने २३ धाव करत संघाला लक्ष्यापर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. दोघेही चांगली कामगिरी करुन न शकल्यामुळे दुसऱ्या विकेटसाठी आलेल्या रजत पाटीदारकडून अपेक्षा होत्या मात्र मिळालेल्या संधीचं तो सोनं करु शकला नाही. १६ धावांवर असताना तो आर अश्विनच्या चेंडूवर त्रिफळाचित झाला. त्यानंतर तिसऱ्या विकेटसाठी आलेला ग्लेन मॅक्सवेल खातदेखील खोलू शकला नाही. तो कुलदीप सेनच्या चेंडूवर झेलबाद झाला. चौथ्या विकेटसाठी आलेल्या शाहबाज अहमदने १७ धावा केल्या. मात्र तोही झेलबाद झाला. सुयश प्रभुदेसाई फक्त दोन धावा करु शकला.

हेही वाचा >> RCB vs RR : फलंदाजी करताना संजू सॅमसन गोंधळला, वनिंदू हसरंगाच्या चेंडूवर राजस्थानचा कर्णधार ‘क्लीन बोल्ड’ !

तर सध्या फॉर्ममध्ये असलेला दिनेश कार्तिकदेखील खास कामगिरी करु शकला नाही. तो अवघ्या सहा धावांवर युजवेंद्र चहलच्या चेंडूवर धावबाद झाला. वनिंदू हसरंगानेही फक्त १८ धावा केल्या. दिनेश कार्तिक आणि वनिंदू हसरंगा बाद झाल्यानंतर मात्र बंगळुरुच्या विजयाचा आशा मावळल्या. सामन्याच्या शेवटी बंगळुरुसमोर १२ चेंडूंमध्ये ३२ धावांचे अशक्य लक्ष्य होते. अपेक्षेप्रमाणे बंगळुरुचे शेवटच्या फळीतील फलंदाज हे लक्ष्य गाठू शकले नाहीत. बंगळुरुचा २९ धावांनी पराभव झाला.

हेही वाचा >> RCB vs RR : बंगळुरुच्या ‘जोश’समोर राजस्थानच्या ‘जोस’ने टेकले हात, फूल फॉर्ममध्ये असताना बटलर ‘असा’ झाला बाद

याआधी बंगळुरुने नाणेफेक जिंकून सुरुवातीला गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या राजस्थान रॉयल्सची सुरुवात खराब झाली. सलामीला आलेले दोन्ही फलंदाजी स्वस्तात बाद झाले. जोस बटलरने आठ तर देवदत्त पडिक्कलने सात धावा केल्या. तिसऱ्या विकेटसाठी आलेल्या रविचंद्रन अश्विननेही खास कामगिरी केली नाही. सतरा धावांवर असताना मोहम्मद सिराजच्या चेंडवर तो पायचित झाला. त्यानंतर मात्र तिसऱ्या विकेटसाठी आलेल्या संजू सॅमसनने संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. त्याने २१ चेंडूंमध्ये २७ धावा केल्या. मात्र वनिंदू हसरंगाच्या चेंडूवर तो त्रिफळाचित झाला. त्यानंतर डॅरिल मिशेलने १६ धावा केल्या.

हेही वाचा >> कोल्हापूरकरांचा थाटच न्यारा! डोक्याला खास फेटा बांधून झळकले वानखेडे स्टेडियमवर, पोस्टरचीही होतेय विशेष चर्चा

राजस्थान संघामध्ये फलंदाजी विभागात रियान परागने दिमाखदार खेळ केला. पाचव्या विकेटसाठी आलेल्या परागने अर्धशतकी खेळी केली. त्याने ३१ चेंडूंमध्ये नाबाद ५६ धावा केल्या. त्यानंतर शेटवच्या फळीतील एकाही फलंदाजाला धावा करता आल्या नाहीत. शेमरॉन हेटमायर (३), ट्र्रेंट बोल्ट (५), प्रसिध कृष्णा (२) स्वस्तात बाद झाले. वीस षटके संपेपर्यंत राजस्थानने १४४ धावा केल्या.

हेही वाचा >> प्रीति झिंटाला बसला आश्चर्याचा धक्का, चेन्नई-पंजाब सामन्यामध्ये नेमकं काय घडलं?

गोलंदाजी विभागात राजस्थानने चांगली कामगिरी केली. बंगळुरुपुढे मोठे लक्ष्य नसल्यामुळे या सामन्यात राजस्थानची गोलंदाजांवर पूर्ण भिस्त होती. विशेष म्हणजे गोलंदाजांनी ही जबाबदारी चोख बजावली. कुलदीप सेनने चार षटकात फक्त २० धावा देत चार विकेट्स घेतल्या. तर रविचंद्रन अश्विनने धमाकेदार कामगिरी करत बंगळुरुच्या तीन गड्यांना तंबुत पाठवलं. प्रसिध कृष्णाने दोन गडी बाद करत राजस्थानसाठी विजय सुकर केला. याआधीच्या सामन्यात सर्वात चांगली गोलंदाजी करत फलंदाजांना सळो की पळो करुन सोडणारा युजवेंद्र चहल मात्र यावेळी चमकू शकला नाही. त्याला एकही विकेट मिळाली नाही.

मराठीतील सर्व आयपीएल २०२२ ( Ipl ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ipl 2022 rcb vs rr rajasthan royals won by 29 runs defeated royal challengers bangalore prd

ताज्या बातम्या