scorecardresearch

IPL 2022, RR vs DC : दिल्ली कॅपिटल्सचा राजस्थान रॉयल्सवर ८ गडी राखून पराभव

RR vs DC Match Updates : दिल्लीने बुधवारी राजस्थान रॉयल्सचा पराभव केल्याने प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत.

delhi capitals
(फोटो सौजन्य – IPL)

IPL 2022, RR vs DC Match Updates : आयपीएल २०२२ चा ५८ वा सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने राजस्थान रॉयल्सचा ८ गडी राखून पराभव केला. मुंबईतील डी.वाय. पाटील स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्सने २० षटकांत ६ बाद १६० धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सने १८.१ षटकांत २ बाद १६१ धावा करून सामना जिंकला.

मिचेल मार्श (८९) आणि डेव्हिड वॉर्नर (५२) यांनी बुधवारी राजस्थान रॉयल्सचा पराभव केल्याने प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. राजस्थानने दिल्लीला २० षटकांत १६१ धावांचे लक्ष्य दिले होते, जे दिल्लीच्या संघाने ११ चेंडू राखून पूर्ण केले. दिल्लीने डावाच्या दुसऱ्या चेंडूवर सलामीवीर श्रीकर भरत शून्यावर बाद झाला. असे असतानाही ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल मार्श यांनी दुसऱ्या विकेटसाठी १४४ धावांची भागीदारी करून संघाला विजय मिळवून दिला.

दिल्ली कॅपिटल्सकडून डेव्हिड वॉर्नरने ४१ चेंडूत ५ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने नाबाद ५२ धावा केल्या. मिचेल मार्श ६२ चेंडूत ५ चौकार आणि ७ षटकारांच्या मदतीने ८९ धावा काढून बाद झाला. राजस्थान रॉयल्सकडून ट्रेंट बोल्ट आणि युझवेंद्र चहलने प्रत्येकी एक विकेट घेतली. या विजयासह दिल्लीचे १२ गुण झाले असून राजस्थानचे १४ गुण आहेत. दोन्ही संघांनी गुणतालिकेतील आपले जुने स्थान कायम ठेवले आहे. आतापर्यंत केवळ हार्दिक पांड्याच्या गुजरात टायटन्सनेच प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे.

प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्सने २० षटकांत ६ बाद १६० धावा केल्या. राजस्थानची सुरुवात चांगली झाली नाही. फलंदाज जोस बटलर अवघ्या ७ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. जैस्वालने १९ चेंडूत २९ धावा केल्या. अश्विनने ३८ चेंडूत ५० धावा केल्या. कर्णधार संजू सॅमसनला केवळ ६ धावा करता आल्या. रियान पराग ९ धावा करून बाद झाला. देवदत्त पडिकल ३० चेंडूत ४८ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.

दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांनी चोख गोलंदाजी करत, वारंवार अंतराने विकेट्स घेत राजस्थान रॉयल्सला मोठी धावसंख्या उभारू दिली नाही. दिल्लीतर्फे एनरिक नोर्किया, मिचेल मार्श आणि चेतन साकारिया यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. फलंदाजीसाठी आमंत्रित केल्यानंतर, राजस्थान रॉयल्सची सुरुवात संथ झाली आणि नंतर तिसऱ्या षटकात त्यांचा स्टार फलंदाज जोस बटलर (७) याची विकेट गमावली. चेतन साकारियाने बटलरला शार्दुल ठाकूरच्या हाती झेल बाद करत पॅव्हेलियनमध्ये पाठवले.

मराठीतील सर्व आयपीएल २०२२ ( Ipl ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ipl 2022 rr vs dc match updates cricket score today 11 may 2022 abn

ताज्या बातम्या