scorecardresearch

IPL 2022  RR vs DC : प्ले-ऑफच्या शर्यतीत टिकण्यासाठी दिल्ली कॅपिटल्सला विजय आवश्यक; जाणून घ्या प्लेईंग ११

Rajasthan Royals vs Delhi Capitals : दिल्लीचा संघ मागील सामन्यातील पराभव विसरून प्ले ऑफच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी मैदानात उतरेल

RR vs DC Playing XI

IPL 2022 RR vs DC Playing XI : आयपीएल २०२२ च्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा जिवंत ठेवण्यासाठी दिल्ली कॅपिटल्स बुधवारी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर राजस्थान रॉयल्स विरुद्ध लढणार आहे. दिल्लीसाठी, हा सामना ‘करा किंवा मरा’ असा आहे कारण संघाच्या खात्यात ११ सामन्यांत केवळ १० गुण आहेत. दिल्लीला अजून तीन सामने खेळायचे आहेत आणि प्लेऑफच्या शर्यतीत टिकण्यासाठी हे सामने जिंकावे लागतील.

दिल्लीचा संघ मागील सामन्यातील पराभव विसरून प्ले ऑफच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी मैदानात उतरेल. प्लेऑफच्या शर्यतीत राहण्यासाठी राजस्थान रॉयल्सला हरवण्याशिवाय दिल्लीकडे पर्याय नाही. सध्या दिल्लीचा नेट रन रेट +०.१५० आहे.

त्याचवेळी, राजस्थान ११ सामन्यांत ७ विजय आणि ४ पराभवानंतर १४ गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यांना पात्र होण्यासाठी फक्त दोन गुणांची गरज आहे. राजस्थानचा धावगती देखील +०.३२६ आहे. दोन्ही संघांमध्ये झालेल्या गेल्या पाच सामन्यांमध्ये रॉयल्सचा वरचष्मा राहिला आहे. यातील तीन सामने राजस्थानने तर दोन सामने दिल्लीने जिंकले आहेत. आयपीएल २०२२ च्या ३४ व्या सामन्यात राजस्थानने दिल्लीचा १५ धावांनी पराभव केला होता.

दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

राजस्थान रॉयल्स: जोस बटलर, यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन (क), देवदत्त पडिक्कल, रियान पराग, जिमी नीशम/रासी व्हॅन डर ड्युसेन, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, प्रशांत कृष्णा, युझवेंद्र चहल आणि कुलदीप सेन.

दिल्ली कॅपिटल्स: डेव्हिड वॉर्नर, केएस भरत, मिचेल मार्श, ऋषभ पंत (क), रोवमन पॉवेल, अक्षर पटेल, रिपल पटेल, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, खलील अहमद, अॅनरिक नॉर्टजे.

मराठीतील सर्व आयपीएल २०२२ ( Ipl ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ipl 2022 rr vs dc rajasthan royals predicted playing xi against delhi capitals match 58 abn

ताज्या बातम्या