scorecardresearch

युजवेंद्रची हॅटट्रिक ठरली मॅच टर्निंग! राजस्थानचा सात धावांनी विजय, केकेआरने शेवटपर्यंत दिला लढा

सलामीच्या जोस बटरलने शतकी खेळी करत केकेआरच्या गोलंदाजांना घाम फोडला. त्याने ६१ चेंडूंमध्ये ९ चौकार आणि ५ षटकार लगावत १०३ धावा केल्या.

RAJASTHAN ROYALS
राजस्थान रॉयल्सचा सात धावांनी विजय झाला (iplt20.com)

आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील ३० वा सामना चांगलाच अटीतटीचा झाला. या सामन्यात राजस्थान रॉयल्सने २१७ धावांचा डोंगर उभारूनही केकेआरने त्यांना चांगली टक्कर दिली. विजयासाठी २१८ धावा करण्यासाठी केकेआरने पूर्ण ताकतीने फलंदाजी केली. मात्र राजस्थानच्या युजवेंद्र चहलने हॅटट्रिकसह एकूण पाच बळी घेतल्यामुळे कोलकाता संघ खिळखिळा झाला. परिणामी राजस्थानचा सात धावांनी विजय झाला. जोस बटरलने १०३ धावांची शतकी खेळी केल्यामुळे राजस्थान २१७ धावा उभारू शकला. केकेआरला शेवटचा फलंदाज बाद होईपर्यंत २१० धावा करता आल्या.

हेही वाचा >> IPL 2022, RR vs KKR : हलक्यात घेणं पडलं महागात! हेटमायरच्या डायरेक्ट हीटमुळे पहिल्याच चेंडूवर नरेन धावबाद

राजस्थान आणि केकेआर यांच्यात अटीतटीची लढत झाली. राजस्थानने दिलेल्या २१८ धावांचे आव्हान गाठण्यासाठी फलंदाजीसाठी आलेल्या केकेआरची सुरुवात खराब झाली. पहिल्या षटकाच्या पहिल्याच चेंडूमध्ये सुनिल नरेन धावबाद झाला. गरज नसतानाही चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केल्यामुळे नरेनचा बळी गेला. त्यानंतर अरॉन फिंच आणि श्रेयस अय्यर या जोडीने मैदानावर जम बसवला. फिंचने अर्धशतकी खेळी करत २८ चेंडूंमध्ये ९ चौकार आणि २ षटकार लगावत ५८ धावा केल्या. मात्र नवव्या षटकात प्रसिद कृष्णाच्या चेंडूचा सामना करताना तो झेलबाद झाला.

हेही वाचा >> पॅट कमिन्स-शिवम मावी जोडी ठरली भारी ! दोघांनी मिळून टिपला अप्रतिम झेल, रियान परागला केलं ‘असं’ बाद

दुसऱ्या विकेटसाठी आलेल्या केकेआरचा कर्णधार श्रेयस अय्यरनेदेखील मोठी खेळी केली. त्याने अवघ्या ५१ चेंडूंमध्ये अर्धशतकी खेळी करत सात चौकार आणि चार षटकार लगावत ८५ धावा केल्या. श्रेयस अय्यरने १७ व्या षटकापर्यंत किल्ला लढवला. मात्र चहलच्या चेंडूचा सामना करताना तो झेलबद झाला. तिसऱ्या विकेटसाठी आलेला नितिश राणा चांगली खेळी करु शकला नाही. १८ धावा करुन तो झेलबाद झाला. त्यानंतर मात्र केकेआरचे सर्वच फलंदाज आश्चर्यकारित्या बाद होत गेले. १७ व्या षटकात युजवेंद्र चहलने केकेआरच्या फलंदाजांना पळता भुई थोडी केली. या षटकात चहलने एकापाठोपाठ तीन विकेट घेत हॅटट्रिक नोंदवली.

हेही वाचा >> दिल्लीच्या ताफ्यात तिघांना करोना, IPL पुन्हा रद्द होणार ? जाणून घ्या नवे नियम

चहलने टाकलेल्या १७ व्या षटकात श्रेयस अय्यर (८५), शिवम मावी (०), पॅट कमिन्स (०) हे गडी एकापाठोपाठ बाद झाले. त्यानंतर सामना केकेआरच्या हातातून गेल्याचे दिसत असताना शेवटच्या फळीतील उमेश यादवने सामन्याला कलाटणी दिली. त्याने १८ व्या षटकात दोन षटकार आणि एक चौकार लगावत सामना फिरवला. १६ चेंडूंमध्ये ३१ धावांची गरज असताना उमेशने धडाकेबाज फलंदाजी करत १३ चेंडूंमध्ये १८ धावा अशी स्थिती करून ठेवली. शेवटच्या सहा चेंडूमध्ये केकेआरला ११ धावांची गरज होती. मात्र दुसऱ्याच चेंडूवर शेल्डन जॅक्सन झेलबाद झाला आणि केकेआरची विजयाची आशा मावळली. केकेआरला शेवटचा गडी बाद होईपर्यंत २१० धावा करता आल्या.

हेही वाचा >> IPL 2022 : केविन पिटरसनला भारताची भुरळ, IPL मध्ये करणार समालोचन, हिंदीत खास ट्विट करत म्हणाला…

यापूर्वी कोलकाता नाईट रायडर्सने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतल्यामुळे राजस्थान रायल्सची जोस बटरल आणि देवदत्त पडिक्कल ही जोडी फलंदाजीसाठी मैदानात उतरली. बटरल आणि पडिक्कल या जोडीने सुरुवातीपासूनच मोठे फटके मारल्यामुळे केकेआरला पहिल्या विकेटसाठी चांगलंच झगडावं लागलं. राजस्थानच्या ९७ धावा झालेल्या असताना केकेआरला पडिक्कलच्या रुपात पहिली विकेट मिळाली. पडिक्कलने १८ चेंडूंमध्ये २४ धावा केल्या.

हेही वाचा >> IPL 2022 : दिल्ली कॅपिट्लसच्या ताफ्यात आणखी दोघांना करोनाची लागण, परदेशी खेळाडूची चाचणी पॉझिटिव्ह

तर सलामीच्या जोस बटरलने शतकी खेळी करत केकेआरच्या गोलंदाजांना घाम फोडला. त्याने ६१ चेंडूंमध्ये ९ चौकार आणि ५ षटकार लगावत तब्बल १०३ धावा केल्या. बटलरने केलेल्या या धावांचा राजस्थानला मोठा फायदा झाला. कर्णधार संजू सॅमसनने १९ चेंडूंमध्ये ३८ धावा केल्या. तर तिसऱ्या विकेटसाठी आलेल्या शिमरॉन हेटमायर शेवटच्या षटकापर्यंत मैदानावर टिकून राहिला. त्याने नाबाद २६ धावा केल्या. रियान पराग (५), करुण नायर (३) यांनी निराशा केली. तर आर अश्विन वीस षटके संपल्यामुळे दोन धावांवर नाबाद राहिला.

हेही वाचा >> अथियाने शेअर केले केएल राहुलसोबतचे फोटो; वडील सुनिल शेट्टींनीही केली ‘ही’ खास कमेंट

दुसरीकडे गोलंदाजाबाबत बोलायचं झालं तर कोलकाताच्या सुनिल नरेनने चार षटकांत २१ धावा देत पडिक्कल आणि रियान पराग यांना तंबुत पाठवलं. तर शिवम मावी, पॅट कमिन्स आणि आंद्रे रसेल यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. उमेश यादवेने एकही बळी न घेता चार षटकांत ४४ धावा दिल्यामुळे तो केकेआरला महगात पडला. तर पॅट कमिन्सनेदेखील चार षटकांत ५० धावा दिल्या.

हेही वाचा >> फॉरेव्हर IPL फिव्हर! पहिल्या सामन्यात खेळलेले ‘हे’ खेळाडू अजूनही आयपीएलमध्ये दाखवतायत कमाल!

राजस्थानच्या गोलंदाजांनी केकेआरच्या खेळाडूंना रोखून धरण्याचा प्रयत्न केला. मात्र केकेआरनेही अटीतटीची लढत दिल्यामुळे आजचा सामना चांगलाच रोमहर्षक ठऱला. या सामन्यात युजवेंद्र चाहलने पाच विकेट्स घेतल्या. विशेष म्हणजे चहलने एकापाठोपाठ तीन विकेट्स घेत हॅटट्रिक नोंदवली. एकट्या चहरने पाच विकेट्स घेतल्या. तर ओबेड मॅकॉयने दोन गडी बाद केले. प्रसिध कृष्णा, आर अश्विन या जोडीने प्रत्येकी एक विकेट घेतली.

मराठीतील सर्व आयपीएल २०२२ ( Ipl ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ipl 2022 rr vs kkr match rajasthan royals won by seven runs defeat kolkata knight riders prd

ताज्या बातम्या