आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील १२ वा सामन्यातील लढत चांगलीच अटीतटीची ठरली. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या फलंदाजांनी ऐनवेळी बहारदार फलंदाजी करत संघाला विजय मिळवून दिला. राजस्थान रॉयल्सने दिलेले १६९ धावांचे लक्ष्य बंगळुरुने चार गडी आणि पाच चेंडू राखनू गाठले. शाहबाज अहमद, दिनेश कार्तिक यांनी विजयासाठी मोठी मेहनत घेतली. राजस्थानच्या जॉस बटलरने संघासाठी ७० धावा करुनही त्याचा फायदा झाला नाही. राजस्थानला पराभवाचा सामना करावा लागला.

सुरुवातीला फलंदाजीसाठी उतरलेल्या राजस्थान रॉयल्सने १६९ धावा केल्या. १७० धावांचे लक्ष्य गाठताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची सुरुवात चांगली झाली. बंगळुरुचा पहिला फलंदाज ५५ धावांवर बाद झाला. सलामीला आलेल्या फाफ डू प्लेलीसने २० चेंडूमध्ये पाच चौकार यांच्या मदतीने २९ धावा केल्या. त्यानंतर मात्र बंगळुरुचे फलंदाज ठराविक अंतरावर बाद होत गेले. बंगळुरु संघ ६१ धावांवर असताना फलंदाजीसाठी आलेला अनुर रावत २५ चेंडूंमध्ये २६ धावा करु शकला.

त्यानंतर तिसऱ्या विकेटसाठी आलेला विराट कोहली विचित्र पद्धतीने धावबाद झाला. चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात असताना संजू सॅमसनने युजवेंद्र चहलने चेंडू फेकला. त्यामुळे विरोट अवघ्या पाच धावा करुन तंबुत परतला. त्यानंतर पुढच्याच चेंडूमध्ये युजवेंद्र चहलने डेविड वेल्लीला शून्यावर बाद केलं.

हेही वाचा >>> IPL 2022, RR vs RCB : युजवेंद्र चहल बल्ले बल्ले ! विराट कोहलीला केलं विचित्र पद्धतीने बाद, चेंडू फेकताच…

डेविड वेल्ली शून्यावर बाद झाल्यानंतर शेरफेन रुदरफोर्डदेखील मैदानावर जास्त वेळ तग धरु शकला नाही. रुदरफोर्डने दहा चेंडू खेळून फक्त पाच धावा केल्या. ट्रेंट बोल्टच्या चेंडूवर रुदरफोर्ड झेलबाद झाला. त्यानंतर मात्र शाहबाज अहमद आणि दिनेश कार्तिक यांनी संघाला चांगल्या प्रकारे सावरलं. दोघांनीही संधी मिळताच चौकर आणि षटकार लगावले.

शेवटी १३ चेंडूंमध्ये १६ धावांची गरज असताना शाहबाजचा ट्रेंट बोल्टच्या चेंडूवर त्रिफळा उडाला. शाहबाजने २६ चेंडूंमध्ये चार चौकार आणि तीन षटकार यांच्या मदतीने ४५ धावा केल्या. शाहबाज बाद झाल्यानंतर फलंदाजीसाठी आलेला हर्षल पटेल दिनेश कार्तिकला संधी देत गेला. शेवटी सहा चेंडूंमध्ये तीन धावा अशी सोपी परिस्थिती बंगळुरुसमोर आली. दरम्यान शेवटच्या षटकात पहिल्याच चेंडूवर हर्षल पटेलने षटकार लगावत सामना बंगळुरुच्या खिशात घातला.

हेही वाचा >>> IPL 2022 : पुण्याच्या वाटेवर सचिनचे मराठीवरील प्रेम आले समोर, तेंडुलकरने कारमध्ये…

तत्पूर्वी नाणेफेक जिंकल्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर राजस्थानकडून जोस बटलर आणि यशस्वी जैसवाल सलामीला आहे. जोस बटलरने (नाबाद) सुरुवातीपासून धडाकेबाज खेळ करत ४७ चेंडूंमध्ये सहा षटकार लगावत ७० धावा केल्या. यशस्वी जैसवाल मात्र मैदानावर जास्त काळ टिकू शकला नाही. जैसवाल अवघ्या चार धावा करु शकला. जैसवाल बाद झाल्यानंतर दुसऱ्या विकेटसाठी देवदत्त पडिक्कल फलंदाजीसाठी आला.

पडिक्कल आणि बटलर या जोडीने मैदानावर चांगला जम बसवला होता. मात्र हर्षल पटेलने ही जोडी दहाव्या षटकावर तोडली. राजस्थान संघ ७६ धावांवर असताना पडिक्कलचा झेल विराट कोहलीने टिपला. पडिक्कलने २९ चेंडूमंध्ये दोन चौकार आणि दोन षटकार यांच्या मदतीने ३७ धावा केल्या. पडिक्कल बाद झाल्यानंतर तिसऱ्या विकेटसाठी राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन मैदानात आला. मात्र सॅमसन चांगली कामगिरी करु शकला नाही. तो अवघ्या आठ धावा करुन बाद झाला. सॅमसननंतर बटलर आणि हेटमायर ही जोडी मैदानावर शेवटपर्यंत तग धरून राहिली. वीस षटके होईपर्यंत हेटमायरने (नाबाद) ३१ चेंडूंमध्ये चार चौकार आणि दोन षटकार यांच्या मदतीने ४२ धावा केल्या.

हेही वाचा >>> IPL 2022 RR vs RCB : विराटने टिपला झेल, पण पंचांनी घेतला आक्षेप, बंगळुरु-राजस्थान सामन्यात मैदानावरच ड्रामा

तर दुसरीकडे गोलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचे गोलंदाज आपली जादू दाखवू शकले नाहीत. पूर्ण डावात राजस्थानचे फक्त तीन फलंदाज बाद झाले. विल्ले, आकाश, वानिंदू हासरंगा आणि हर्षल पटेल यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. विल्लेने जैसवालचा तर हर्षल पटेलने पडिक्कलली आणि हसरंगाने सॅमसनला बाद केलं. सिराजने चार षटकांत ४३ धावा दिल्या. आकाश दीपने चार षटकांत ४४ धावा दिल्या.

हेही वाचा >>> लखनऊच्या केएल राहुलने रचला ‘हा’ नवा विक्रम; विराट कोहली, रोहित शर्माच्या पंक्तीत मिळवलं स्थान

राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांनी बंगळुरुच्या फलंदाजांना रोखण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. बंगळुरु ५५ धावांवर असताना फाफ डू प्लेसिसच्या रुपात राजस्थानला पहिला बळी मिळला. त्यानंत ठराविक अंतरावार बगंळुरुचे फलंदाज बाद होत गेले. युजवेंद्र चहलने विराट कोहली आणि डेविड वेल्ली यांना बाद करून आपलं काम चोख पद्धतीने केलं. ट्रेंट बोल्टनेदेखील ४ षटकांत ३४ धावा देत दोन फलंदाजांना बाद खेलं. नवदीप सैनीने तीन षटकांमध्ये ३६ धावा देत एका फलंदाजाला बाद केलं.