आयपीएल २०२२ चा ४६व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने सनरायझर्स हैदराबादचा १३ धावांनी पराभव केला. हा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळवला गेला. हा सामना चेन्नई सुपर किंग्जने जिंकला. चेन्नईने हैदराबाद संघाचा १३ धावांनी पराभव करत स्पर्धेतील तिसरा सामना जिंकला.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्जने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध २०२ धावा केल्या. अशा स्थितीत २०३ धावांच्या प्रत्युत्तरात हैदराबादला २० षटकात सहा गडी गमावून १८९ धावा करता आल्या आणि त्यांनी सामना १३ धावांनी गमावला. सनरायझर्स हैदराबादला पहिला झटका अभिषेक शर्माच्या रूपाने बसला. अभिषेक शर्मा २४ चेंडूत ३९ धावा करून बाद झाला. राहुल त्रिपाठीला खातेही उघडता आले नाही. तर एडन मार्क्रम १७ धावा करून बाद झाला. कर्णधार केन विल्यमसन ४७ धावा करून बाद झाला. शशांक सिंग १५ आणि वॉशिंग्टन सुंदरने दोन धावा करून बाद झाले. निकोलस पूरन ६४ धावांवर नाबाद परतला.

नाणेफेक गमावल्यानंतर फलंदाजीचा निर्णय घेत ऋतुराज गायकवाडने ९९ धावा केल्या आणि कॉनवेने नाबाद ८५ धावा केल्या. गायकवाडचे मोसमातील पहिले शतक एका धावेने हुकले आणि टी नटराजनने त्याला बाद केले. चेन्नईला दुसरा धक्काही धोनीच्या रूपाने नटराजनने दिला. चेन्नईने २० षटकांत दोन गडी गमावून २०२ धावा केल्या.