आयपीएलच्या पंधराव्या हंगामात चाळीसव्या सामन्यात गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदरबाद यांच्यात अटीतटीची लढत झाली. एका षटकात २२ धावांची गरज असल्यामुळे शेवटच्या चेंडूपर्यंत संघर्ष पाहायला मिळाला. मात्र शेवटच्या क्षणी गुजरातच्या राहुल तेवतिया आणि राशिद खान या दिग्गज जोडीने मोठे षटकार लगावत विजय खेचून आणला. हैदराबादने गुजरातसमोर १९६ धावांचे लक्ष्य ठेवले होते. गुजरातने पाच गडी राखून हा विजय मिळवला आहे.

हेही वाचा >>> IPLच्या लिलावादरम्यान माझ्यासोबत फसवणूक आणि विश्वासघात झाला; हर्षल पटेलने सांगितली दुःखद आठवण

हैदरबादने दिलेल्या १९६ धावांचे लक्ष्य गाठण्याचा गुजरात टायटन्सने शेवटपर्यंत प्रयत्न केला. मात्र हैदरबाचा वेगवान गोलंदाज उमार मलिक याने गुजरातच्या फलंदाजांना पळता भुई थोडी करुन टाकली. त्याने वन मॅन आर्मीची भूमिका बजावत गुजरातच्या खेळाडूंना ठराविक अंतरावर तंबुत पाठवलं. गुजरात संघाकडून सलामीला आलेल्या वृद्धीमान साहा आणि शुभन गिल या जोडीने बहारदार खेळी केली. या जोडीने ६९ धावांची भागिदारी केली. वृद्धीमान साहाने अर्धशतकी खेळी करत ३८ चेंडूंमध्ये ६८ धावा केल्या. तर शुभमन गिलीने २२ धावा करत संघाला लक्ष्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा >>> ४, २, १, ६, ६, ६! हैदरबादचा शशांक तळपला, फक्त सहा चेंडूंमध्ये केल्या २५ धावा

या हंगामात चांगल्या फॉर्ममध्ये असलेला हार्दिक पांड्या मात्र मैदानावर जास्त काळ तग धरू शकला नाही. तो अवघ्या दहा चेंडूवर झेलबाद झाला. तर पुढे उमरान मलिक याने डेविड मिलर आणि अभिनव मनोहर यांना त्रिफळाचित केलं. डेविड मिलरने १७ धावा केल्या. तर मनोहर खातंदेखील खोलू शकला नाही. सोळाव्या षटकानंतर मात्र राहुल तेवतिया आणि राशिद खान या जोडीने सामना फिरवला. राशिद खानने शेटच्या षटकात तीन आणि तेवतिया याने एक षटकार लगावत गुजरातल विजय मिळवून दिला.

हेही वाचा >>> Video : मोहम्मद शमीच्या चेंडूवर हैदराबादचा कॅप्टन क्लीन बोल्ड, परफेक्ट गोलंदाजीचा व्हिडीओ पाहाच

याआधी नाणेफेक जिंकून गुजरात टायटन्सने सुरुवातीला गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या हैदराबादने गुजरातसमोर विजयासाठी १९६ धावांचे आव्हान उभे केले. हैदरबादकडून सलामीला आलेल्या अभिषेक शर्माने दिमाखदार खेळी केली. त्याने ४२ चेंडूंमध्ये सहा चौकार आणि तीन षटकार लगावत ६५ धावा केल्या. तर कर्णधार केन विल्यम्सन चांगली कामगिरी करु शकला नाही. तो फक्त पाच धावांवर त्रिफळाचित झाला.

हेही वाचा >>> राजस्थान रॉयल्स शेन वॉर्नला वाहणार श्रद्धांजली, आपल्या पहिल्या कॅप्टनसाठी सर्व खेळाडू परिधान करणार खास जर्सी

दुसऱ्या विकेटसाठी आलेला राहुल त्रिपाठी फक्त १६ धावा करु शकला. पाच षटकांमध्ये ४४ धावांवर दोन गडी बाद अशी स्थिती झाल्यामुळे हैदरबादवर दबाव वाढला. मात्र या दबावाला झुगारून तिसऱ्या विकेटसाठी आलेल्या मर्करामने अर्धशतकी खेळी केली. त्याने ४० चेंडूंमध्ये ५६ धावा केल्या. त्यानंतर मात्र हैदराबादचा एकही फलंदाज चांगली खेळी करु शकला नाही. निकोलस पूरन आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी तीन-तीन धावा केल्या. तर पदार्पणातच शशांक सिंग याने कमाल केली. त्याने षटकारांची हॅटट्रिक करत सहा चेंडूंमध्ये नाबाद २५ धावा केल्या. मार्को जानसेन यांने नाबाद आठ धावा केल्या.

हेही वाचा >>> भारताला विश्वचषक मिळवून देणारे गॅरी कस्टर्न आता इंग्लंडला देणार धडे, प्रशिक्षकाची जबाबदारी स्वीकारण्याची शक्यता

गोलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर हैदरबादचा वेगवान गोलंदाज उमरान मलिक याने एकट्याने लढत दिली. त्याने वृद्धीमान साहा, शुभमन गिल, डेविड मिलर याच्यासारखे एकूण पाच फलंदाज तंबूत पाठवून हैदराबादला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याच्या प्रयत्नांना यश आलं नाही. तर गुजरातचा मोहम्मद शामी यानेदेखील भेदक मारा करत हैदराबादच्या एकूण तीन गड्यांना बाद केलं. यश दयाल आणि अलझारी जोसेफ यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.