scorecardresearch

IPL 2022, SRH vs RCB Playing 11 : आज हैदराबाद-बंगळुरु आमनेसामने, कोण ठरणार सरस? जाणून घ्या प्लेइंग इलेव्हन

हैदराबाद संघाला गोलंदाजी तसेच फलंदाजी अशा दोन्ही विभागाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. कर्णधार केन विल्यम्सनला अद्याप चांगला सूर गवसलेला नाही.

IPL 2022, SRH VS RCB Playing 11
IPL 2022, SRH VS RCB Playing 11

IPL 2022, SRH vs RCB : आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील ५४ वी लढत सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या दोन संघांमध्ये होणार आहे. आज दुपारी ३.३० वाजता या सामन्याला सुरुवात होणार असून मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर हा सामना खेळवला जाईल.

गुणतालिकेचा विचार करायचा झाला तर बंगळुरु संघ हैदराबादपेक्षा मजबूत स्थितीत आहे. बंगळुरु संघाने आतापर्यंत एकूण ११ सामने खेळले असून सात सामन्यांत विजय तर पाच सामन्यात या संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. तरीदेखील हा संघ गुणतालिकेत टॉप चार संघांमध्ये आहे. तर दुसरीकडे सनरायझर्स हैदराबाद संघाने आतापर्यंत दहा सामने खेळले असून या संघाला पाच सामन्यांत विजय तर पाच सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागलेला आहे. त्यामुळे प्लेऑफपर्यंत मजल मारायची असेल तर हैदरबादला पुढील सामन्यातं विजय नोंदवावा लागेल.

हेही वाचा >> स्टार फलंदाज ख्रिस गेलने सांगितलं IPL 2022 मध्ये न खेळण्याचं कारण; म्हणाला, “मला योग्य सन्मान…”

हैदराबाद संघाला गोलंदाजी तसेच फलंदाजी अशा दोन्ही विभागाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. कर्णधार केन विल्यम्सनला अद्याप चांगला सूर गवसलेला नाही. परिणामी त्याचा खेळ हैदराबादसाठी चिंतेचा विषय ठरतोय. त्यामुळे हा संघ सध्या फॉर्ममध्ये असलेल्या राहुल त्रिपाठीला सलामीला येण्याची संधी देणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. तर दुसरीकडे मधल्या फळीतील निकोलस पूरन आणि ऐडन मर्कराम ही जोडीसुद्धा चांगली फलंदाजी करताना दिसतेय. त्यामुळे आजच्या सामन्यात ही जोडी काही कमाल दाखवणार का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. गोलंदाजी विभागात हैदराबादकडे सध्या उमरान मलिक हा सर्वत्र चर्चेत असलेला वेगवान गोलंदाज आहे. त्यामुळे गोलंदाजी विभागात हा संघ काही प्रमाणात सरस ठरतोय. तसेच उमरान मलिकला भुवनेश्वर कुमार हा गोलंदाजीत मदत करु शकतो.

हेही वाचा >> गोलंदाजांनी केलं चोख काम! लखनऊचा ७५ धावांनी दणदणीत विजय, कोलकाताचा लाजिरवाणा पराभव

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने याआधी चेन्नई सुपर किंग्जला पराभूत केलंय. त्यामुळे या संघाचा आत्मविश्वास वाढलेला आहे. विराट कोहलीचा फॉर्म परत येत आहे. त्यामुळे हा संघ पुन्हा एकदा मजबूत स्थितीत पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोहलीने फॅफ डू प्लेसिस ला साथ देणे गरजेचे आहे. सध्या दिनेश कार्तिकही चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात तो धडाकेबाज फलंदाजी करण्याची शक्यता आहे. कार्तिक वगळता मधल्या फळीतील एकही फलंदाज सध्या चांगली कामगिरी करुन दाखवू शकलेला नाही. त्यामुळे संघासाठी ही चिंतेची बाब ठरू शकते.

हेही वाचा >> ज्या जर्सीवर भारताविरोधात १० विकेट्स घेतल्या तिलाच काढलं विकायला; न्यूझीलंडच्या दिग्गज खेळाडूचा मोठा निर्णय

सनरायझर्स हैदराबाद संघाचा संभाव्य प्लेइंग इलेव्हन:

अभिषेक शर्मा, केन विल्यमसन (कर्णधार), राहुल त्रिपाठी, ऐडन मर्कराम, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), शशांक सिंग, सीन अॅबॉट, श्रेयस गोपाल, भुवनेश्वर कुमार, कार्तिक त्यागी, उमरान मलिक

हेही वाचा >>> कॅप्टन विरुद्ध कॅप्टन! श्रेयस अय्यरच्या डायरेक्ट हीटमुळे लखनऊला मोठा झटका, केएल राहुल शून्यावर बाद

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचा संभाव्य प्लेइंग इलेव्हन

फॅफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, शाहबाज अहमद, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), महिपाल लोमरोर, वानिंदू हसरंगा, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, जोश हेझलवूड

मराठीतील सर्व आयपीएल २०२२ ( Ipl ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ipl 2022 srh vs rcb playing 11 match prediction know who will win prd