यंदाच्या आयपीएलमध्ये महेंद्रसिंग धोनीने चेन्नईच्या कर्णधारपदाचा कारभार रविंद्र जाडेजाकडे दिला. कर्णधारपद नसल्यामुळे धोनी आयपीएलमध्ये उत्स्फूर्तपणे खेळेल असा अंदाज बांधला जात होता. हा अंदाज चेन्नईच्या पहिल्याच सामन्यात खरा ठरवलं होता. संघ संकटात असताना धोनीने धडाकेबाज कामगिरी करत ३८ चेंडूंमध्ये अर्धशतकी खेळ केला. यासोबतच धोनी आयपीएलच्या इतिहासात अर्धशतक करणारा सर्वात जास्त वय असणारा भारतीय खेळाडू ठरला.

नुकत्याच झालेल्या दिल्ली विरुद्ध चेन्नई सामन्यात कॅप्टन कुलने ८ चेंडूत २१ धावांची नाबाद खेळी खेळली आणि चेन्नईने दिल्लीवर ९१ धावांच्या फरकाने मोठा विजय मिळवला. या सामन्यात तो आपली बॅट खाताना दिसला. एमएस धोनी अनेकदा बॅटिंगला जाण्यापूर्वी बॅट खाताना दिसतो. तो असे का करतो? भारताचा माजी संघसहकारी आणि अनुभवी लेगस्पिनर अमित मिश्रा याने याबाबत एक रोचक खुलासा केला आहे.

“कॅमेरामध्येच घुसून राहू का?” सततच्या व्हिडीओ शूटिंगला कंटाळलेल्या मुलाने वडिलांनाच धरलं धारेवर

Photo : Twitter/@MishiAmit

मिश्रा म्हणाला की, भारताला दोनदा विश्वचषक जिंकून देणारा धोनी आपली बॅट स्वच्छ ठेवण्यासाठी असे करतो. फलंदाजी करताना त्याच्या बॅटवर एकही टेप किंवा धागा दिसणार नाही. धोनीला स्वच्छ बॅट आवडते.

Viral Video : स्कुटी आणि बाईकची झाली टक्कर, नंतर तरुणाने मुलीसोबत जे केले ते पाहून तुम्हालाही येईल राग

ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत अमित मिश्रा म्हणाला की, जर तुम्ही विचार करत असाल की धोनी अनेकदा त्याची बॅट का खातो. तर, तो त्याच्या बॅटमधून टेप काढण्यासाठी असे करतो, कारण त्याला त्याची बॅट स्वच्छ ठेवायला आवडते. त्याच्या बॅटमधून एकही टेप किंवा धागा निघताना आपल्याला दिसणार नाही.

आयपीएल २०२२ मेगा लिलावात अमित मिश्राला एकही खरेदीदार मिळाला नाही. त्याचवेळी आयपीएलच्या या मोसमात धोनी आपल्या जुन्या स्टाईलमध्ये दिसत आहे. आयपीएलचा हा मोसम सुरू होण्यापूर्वी धोनीने रवींद्र जडेजाकडे कर्णधारपद सोपवले होते, मात्र संघाच्या खराब कामगिरीनंतर सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यापूर्वी जडेजाने पुन्हा सीएसकेचे कर्णधारपद धोनीकडे सोपवले.