इंडियन प्रीमियर लीग २०२२ आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. स्पर्धेला अवघा एक आठवडा शिल्लक असताना प्लेऑफसाठी प्रत्येक सामना महत्त्वाचा ठरत आहे. मुंबई इंडियन्सचा खेळ सर्वात लक्षणीय आहे, जे स्वतः प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत परंतु त्यांच्या हातात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचे भवितव्य आहे.

मुंबई इंडियन्सचा संघ शेवटचा साखळी सामना हरला तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला प्लेऑफमध्ये पोहोचणे कठीण होईल. मुंबई इंडियन्सचा शेवटचा सामना २१ मे रोजी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध होणार आहे. मात्र या सामन्यापूर्वी रोहित शर्माने असे काही बोलला की रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे चाहते संतापले.

सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यादरम्यान रोहित शर्मा म्हणाला, “आम्हाला खेळाच्या विशिष्ट परिस्थितीत दबावाखाली गोलंदाजी करण्यासाठी आम्हाला काही खेळाडू वापरून पाहायचे होते. आमच्यासाठी हे खूप सोपे होईल. आम्हाला सर्वच क्षेत्रात चांगली कामगिरी करायची आहे. शक्य असल्यास, मोहिमेचा विजयी शेवट करण्याचा आम्ही प्रयत्न करु. तसेच, शेवटच्या सामन्यात आम्ही काही नवीन खेळाडूंना संधी देऊ इच्छितो जेणेकरुन पुढील हंगामाची तयारी सुरू करता येईल.”

रोहित शर्माचे हे विधान रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या चाहत्यांना आवडले नाही. अनेक चाहत्यांनी सोशल मीडियावर असे म्हटले आहे की, हे जाणूनबुजून केले जात आहे, त्यामुळे मुंबई इंडियन्सचा शेवटच्या सामन्यात पराभव होईल आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची प्लेऑफमध्ये पोहोचण्याची शक्यता संपुष्टात येईल.

सोशल मीडियावर युजर्सनी लिहिले की, रोहित शर्मावर पंजाब, बंगळुरू आणि कोलकाताच्यांची नजर आहेत. मुंबई इंडियन्सचे चाहतेही आगामी सामन्याचा आनंद लुटत असताना आरसीबी प्लेऑफमध्ये पोहोचू नये म्हणून मुंबईने पुढचा सामना गमावावा, असे म्हणत आहेत.

दरम्यान, मुंबई इंडियन्सने या मोसमात त्यांचे १० सामने गमावले आहेत आणि ही त्यांची आयपीएल इतिहासातील सर्वात खराब कामगिरी आहे. दुसरीकडे, जर आपण आरसीबीबद्दल बोललो, तर संघाने आतापर्यंत ७ सामने जिंकले आहेत. जर आरसीबीने गुजरातला हरवले आणि त्यानंतर मुंबईने दिल्लीला पराभूत केले तर बेंगळुरु प्लेऑफमध्ये पोहोचण्याची शक्यता आहे.