scorecardresearch

Virat Kohli: किंग कोहलीचा स्वॅगचं न्यारा! सात-आठ टाके पडूनही झळकावले होते धडाकेबाज शतक, RCBच्या प्रशिक्षकाने दिला आठवणींना उजाळा

बांगरने आयपीएलमधील विराटच्या संस्मरणीय शतकाची आठवण करून देताना कोहलीची खेळाबद्दलची आवड अधोरेखित केली.

Virat Kohli: King Kohli's style of swag the brilliant century was scored even after seven-eight stitches the RCB coach rewinds the memory
संग्रहित छायाचित्र (ट्विटर)

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) फ्रँचायझी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) प्रशिक्षक संजय बांगर यांनी ३१ मार्चपासून सुरू होणाऱ्या आगामी १६व्या हंगामापूर्वी आयपीएलमधील विराट कोहलीच्या महान खेळींपैकी एकाची आठवण केली. माहितीसाठी, विराट कोहली २०११ सालच्या आयपीएलपासून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) कडून खेळत आहे आणि यादरम्यान तो एका तरुण खेळाडूतून अनुभवी फलंदाज बनला आणि नंतर संघाचा कर्णधार बनला.

संजय बांगरने कोहलीशी निगडित खास क्षण आठवला

जरी, माजी भारतीय कर्णधार आरसीबीसाठी आयपीएल ट्रॉफी जिंकू शकला नाही, परंतु तो चांगल्या आणि वाईट काळात फ्रँचायझीसोबत राहिला आहे. कोहलीचा RCB सोबतचा सर्वोत्कृष्ट हंगाम २०१६ हा होता, या स्टार फलंदाजाने केवळ ऑरेंज कॅप जिंकली नाही तर आयपीएलच्या इतिहासात कोणत्याही फलंदाजाने सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही केला. त्याने IPL २०१६ साली १६ सामन्यांमध्ये ८१च्या सरासरीने ९७३ धावा केल्या आणि ४ शतके झळकावली, जी एका मोसमातील सर्वाधिक संयुक्त धावसंख्या आहे.

हेही वाचा: IPL 2023: “टीम इंडियाला आता…” पृथ्वी शॉ भारतीय संघाकडून खेळण्यासाठी सज्ज, सौरव गांगुलीचे सूचक वक्तव्य

दरम्यान, आयपीएलचे अधिकृत प्रसारक स्टार स्पोर्ट्सने अलीकडेच विराट कोहलीला RCB सोबत १५ वर्षे पूर्ण केल्याचा आनंद साजरा केला. यूट्यूबवर स्टार स्पोर्ट्सने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये अनेक माजी क्रिकेटपटूंनी किंग कोहलीशी निगडित काही खास क्षण आठवले. या व्हिडिओमध्ये, भारताचे माजी फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर कोहलीच्या दृढनिश्चयाबद्दल बोलतात आणि एक प्रसंग आठवणीना उजाळा देत सांगतात. “जेव्हा आरसीबीचा माजी कर्णधार हाताला टाके असताना फलंदाजीसाठी आला होता आणि दुखापत असूनही त्याने शानदार शतक ठोकले होते, त्यात त्याने उत्तुंग असे ७-८ षटकार मारले होते.” हा किस्सा सांगताना बांगर आयपीएलच्या आठव्या हंगामाचा संदर्भ देत होते.

स्टार स्पोर्ट्सने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये संजय बांगर म्हणाले, “मला एक सामना आठवतो, बहुधा किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध, जिथे विराट कोहली हाताला टाके असताना खेळला होता आणि १५ षटकांच्या सामन्यात शतक ठोकले होते. ही एक विलक्षण खेळी होती.”

कोहली उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे

विराट कोहली बऱ्याच कालावधीनंतर फॉर्ममध्ये परतला आहे. गेल्या वर्षी अफगाणिस्तानविरुद्धच्या टी२० सामन्यात त्याने शतक झळकावले होते. यानंतर, त्याने टी२० विश्वचषकात शानदार फलंदाजी केली आणि फॉर्ममध्ये परतल्याची घोषणा केली. विराटने वनडे आणि कसोटीतील शतकांचा दुष्काळही संपवला आहे. कोहलीने अलीकडेच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटीत उत्कृष्ट शतक झळकावले. आता त्याच्याकडून आयपीएलमध्येही शतक झळकावण्याची अपेक्षा आहे.

हेही वाचा: Sarfaraz Khan: “मी रोज सकाळी पाच वाजता…”, सुनील गावसकर यांच्या फिटनेसबाबतच्या वक्तव्यावर सरफराज खानने व्यक्त केली नाराजी

कोहलीने आयपीएलमध्ये पाच शतके झळकावली आहेत. यातील चार शतके २०६ च्या मोसमात झाली. त्याला पुन्हा एकदा याच लयीत फलंदाजी करायला आवडेल. आयपीएलच्या गेल्या मोसमात तो पूर्णपणे फ्लॉप ठरला होता, मात्र या मोसमात त्याच्याकडून चांगली कामगिरी अपेक्षित आहे. कोहलीशिवाय सर्व मोठे खेळाडू आरसीबीमध्ये सामील झाले आहेत. यामध्ये ग्लेन मॅक्सवेल आणि एबी डिव्हिलियर्स यांचाही समावेश आहे. मात्र, डिव्हिलियर्स क्रीडा सपोर्ट स्टाफचा भाग असेन.

मराठीतील सर्व आयपीएल २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-03-2023 at 19:18 IST

संबंधित बातम्या