MS Dhoni Chennai Super Kings Champion IPL 2023: चेन्नई सुपर किंग्जने गुजरात टायटन्सचा ५ विकेट्सने पराभव करून आयपीएल २०२३चे विजेतेपद पटकावले आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सोमवारी खेळला गेलेला पावसामुळे प्रभावित झालेल्या विजेतेपदाचा सामना अतिशय रोमांचक झाला. चेन्नईला विजयासाठी शेवटच्या दोन धावांवर १० धावांची गरज होती आणि सर जडेजा क्रीजवर होते. दुसरीकडे, पॅव्हेलियनमध्ये बसलेला कर्णधार एम.एस. धोनी डोळे मिटून विजयासाठी प्रार्थना करत होता.

जडेजाने ओव्हरच्या पाचव्या चेंडूवर लॉगवर षटकार ठोकला. आता शेवटच्या चेंडूवर चार धावा हव्या होत्या, चाहते मारत होते, कर्णधार धोनी डोळे बंद करून यास शेवटच्या चेंडूची वाट पाहत होता, जडेजाने या चेंडूवर चौकार मारून चेन्नईला पाचव्यांदा आयपीएलचे विजेतेपद मिळवून दिले. या शॉटनंतर जडेजा जेव्हा धोनीजवळ पोहोचला तेव्हा धोनीने त्याला उचलले आणि एकच जल्लोष केला.

Yuzvendra Chahal become third highest wicket taker for Rajasthan Royals
IPL 2024 : युजवेंद्र चहलने मोडला शेन वॉर्नचा विक्रम, राजस्थानसाठी ‘हा’ पराक्रम करणारा ठरला तिसरा गोलंदाज
Lucknow beat Gujarat by 33 runs in IPL 2024
LSG vs GT : लखनऊविरुद्धच्या पराभवानंतर शुबमन गिल संतापला; कोणावर फोडले खापर? घ्या जाणून
Big blow for Lucknow Supergiants
IPL 2024 : आरसीबीविरुद्धच्या विजयानंतर लखनऊला मोठा धक्का! स्टार वेगवान गोलंदाज आयपीएलमधून झाला बाहेर
Shikhar Virat Meet Video
IPL 2024 : पंजाबविरुद्धच्या विजयानंतर विराटने नाराज शिखरला मारली मिठी, VIDEO होतोय व्हायरल

जडेजाचा अफलातून विजयी चौकार

शेवटच्या षटकात चेन्नईला विजयासाठी १३ धावा करायच्या होत्या, मोहित शर्माच्या षटकातील पहिल्या चार चेंडूंवर केवळ दोन धावा झाल्या. शेवटच्या दोन चेंडूंवर विजयासाठी १० धावांची गरज होती. जडेजाने ओव्हरच्या पाचव्या चेंडूवर लॉगवर षटकार ठोकला. आता शेवटच्या चेंडूवर चार धावा हव्या होत्या, चाहते मारत होते, कर्णधार धोनी डोळे बंद करून या चेंडूची वाट पाहत होता, जडेजाने या चेंडूवर चौकार मारून चेन्नईला पाचव्यांदा आयपीएलचे विजेतेपद मिळवून दिले.

धोनीने जड्डूला उचलले

विजयाचा आनंद साजरा करत जडेजाने विजयी चौकार मारताच सीएसकेच्या पॅव्हेलियनकडे धाव घेतली आणि थेट धोनीकडे गेला. जडेजाला पाहताच धोनीने आनंदाने उडी मारली आणि त्याला उचलले. यादरम्यान धोनी खूप भावूक झाला आणि त्याने जडेजाला बराच वेळ घट्ट मिठी मारली. शेवटचा चेंडू टाकण्यापूर्वी धोनीने पॅव्हेलियनमध्ये बसून डोळे मिटले. तो मनातल्या मनात प्रार्थना करत होता. धोनीसोबतच सीएसकेचे अनेक चाहते स्टेडियममध्ये बसून चेन्नईच्या विजयासाठी प्रार्थना करत होते. जडेजाने विजयी शॉट मारताच सर्व चाहते आणि CSKच्या खेळाडूंनी जल्लोष केला. पण धोनी अजूनही शांत बसला होता. यानंतर सपोर्ट स्टाफ आणि बाकीचे खेळाडू त्याच्याकडे आले, त्याला सांगितले की जिंकलो आणि मग त्याने सहकारी खेळाडूंना मिठी मारली.

हेही वाचा: IPL 2023 Final: मोहित शर्माचा तो चेंडू अन् आऊट झाल्यानंतर कॅप्टन कूल माहीची ‘ती’ रिअ‍ॅक्शन व्हायरल, पाहा Video

चेन्नईच्या विजयानंतर धोनी-जडेजासह बाकीचे खेळाडूही जल्लोषाच्या वातावरणात हरवून गेले. आयपीएलने जडेजा आणि धोनीचा व्हिडिओ ट्विट केला आहे. ही बातमी लिहेपर्यंत सुमारे ४० हजार लोकांनी त्याला लाईक केले होते. तर शेकडो लोकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. धोनीने जडेजाला आपल्या उचलणे हा चाहत्यांसाठी भावनिक क्षण होता. सोशल मीडियावर चाहत्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. विशेष म्हणजे अंतिम सामन्यात चेन्नईसाठी डेव्हॉन कॉनवेने २५ चेंडूत ४७ धावा केल्या. शिवम दुबेने २१ चेंडूत नाबाद ३२ धावा केल्या. जडेजाने ६ चेंडूत नाबाद १५ धावा केल्या. अंबाती रायुडूने १९ धावांचे योगदान दिले. तर अजिंक्य रहाणेने २७ धावांची खेळी केली.