चेन्नई सुपर किंग्जचा संघ पाचव्यांदा चॅम्पियन बनला आहे. अंतिम फेरीत त्यांनी डकवर्थ लुईस पद्धतीने गुजरात टायटन्सचा पाच गडी राखून पराभव केला. सामना संपल्यानंतर चेन्नईच्या डगआऊटमध्ये भावनिक क्षण आले. या सामन्यात सीएसकेला विजय मिळवून देणाऱ्या रवींद्र जडेजाने पत्नी रिवाबाला मिठी मारली आणि बराच वेळ दोघेही खूप भावनिक झाले होते. त्याचवेळी सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीनेही पत्नी साक्षी आणि झिवा यांना मिठी मारली. फॅमिली इमोशनचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

चेन्नई जिंकल्यानंतर धोनीने डगआऊटच्या दिशेने धावणाऱ्या जडेजाला उचलून धरले. यानंतर मैदानावर कौटुंबिक क्षण पाहायला मिळाले. चेन्नई सुपर किंग्समधील खेळाडूंच्या कुटुंबीयांनी मैदानावर येऊन एकमेकांना शुभेच्छा दिल्या. यादरम्यान धोनी सँटनरच्या गोंडस बाळाला मिठी मारताना दिसला. प्रेझेंटेशन शोपूर्वी धोनीने हार्दिक आणि त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविक, क्रुणाल पांड्या आणि त्याची पत्नी पंखुरी यांचीही भेट घेतली. तसेच मथिशा पाथिरानाच्या कुटुंबीयांचीही भेट घेतली.

Kane Williamson being run out Video Viral
NZ vs AUS : केन विल्यमसन सहकारी खेळाडूला धडकला, अन् १२ वर्षात पहिल्यांदाच घडलं ‘असं’, VIDEO होतोय व्हायरल
Sourav Ganguly Reacts After Sunil Gavaskar Called Dhruv Jurel The Second Rising MS Dhoni
Sourav Ganguly : ‘माही’भाईशी जुरेलची तुलना होताच ‘दादा’ची रोखठोक प्रतिक्रिया; म्हणाला, “धोनीला धोनी बनण्यासाठी…”
Irfan Pathan raise question on BCCI about Hardik Pandya
Team India : ‘हे सर्वांना लागू होत नसेल, तर…’, इरफान पठाणकडून बीसीसीआयच्या केंद्रीय करारावर प्रश्न उपस्थित
santhan rajiv gandhi case convict
राजीव गांधी हत्या प्रकरणातील दोषीचा सुटकेनंतर दोन वर्षांनी मृत्यू; आरोपी संथन कोण होता?

यानंतर चेन्नई संघाला ट्रॉफी मिळाल्यावर खेळाडूंनी ट्रॉफी झिवा, रहाणेची मुलगी आर्या आणि जडेजाची मुलगी निध्याना यांच्या हातात दिली. त्याचे फोटोही समोर आले आहेत. सामना संपल्यानंतर धोनी खूपच भावूक दिसत होता. याआधी त्याला असे सेलिब्रेशन करताना पाहिले नव्हते. आयपीएलचा शेवटचा सामना खेळणाऱ्या अंबाती रायुडू आणि जडेजासोबत धोनीचा बराच वेळ वाद झाला. त्यानंतर इतर खेळाडूंना सोडून त्याने अहमदाबादच्या ग्राउंड स्टाफसोबत फोटो काढले.

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात गुजरातने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ४ गडी गमावून २१४ धावा केल्या. त्यानंतर पावसाने हस्तक्षेप करून अडीच तासांचा खेळ वाया घालवला. सामना १२.१० वाजता पुन्हा सुरू झाला. डकवर्थ लुईस नियमानुसार चेन्नईला १५ षटकांत १७१ धावांचे लक्ष्य मिळाले. चेन्नईने शेवटच्या चेंडूवर पाच विकेट्स गमावून हे यश मिळवले.

हेही वाचा: IPL 2023 Champion CSK: २ चेंडू १० धावा! सामना जिंकताच धोनीने जड्डूला उचलले; थालाचे डोळे पाणावले, विजयानंतरच्या भावनिक क्षणांचा Video व्हायरल

या विजयासह चेन्नईने पाच वेळा विजेतेपद पटकावण्याच्या मुंबईच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. गुजरातकडून साई सुदर्शनने शानदार खेळी केली. त्याचे शतक हुकले आणि तो ४७ चेंडूत आठ चौकार आणि सहा षटकारांच्या मदतीने ९६ धावा काढून बाद झाला. यानंतर चेन्नईकडून डेव्हॉन कॉनवेने २५ चेंडूत सर्वाधिक ४७ धावा केल्या.