Chennai Super Kings vs Gujarat Titans Playing 11 Team Prediction: अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामन्याने आयपीएल २०२३ ची सुरुवात होईल. या सामन्यात महेंद्रसिंग धोनीसमोर हार्दिक पांड्याच्या कर्णधारपदाची कसोटी लागणार आहे. या सामन्याला संध्याकाळी साडेसातला सुरुवात होणार आहे. तत्पुर्वी आयपीएल २०२३ चा उद्घाटन सोहळ पार पडेल. या सोहळ्यात अनेक बॉलीवूड सेलिब्रेटी परफॉर्म करताना दिसणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हार्दिक पांड्याने त्याच्या नेतृत्वाखाली गेल्या मोसमात गुजरात संघाला चॅम्पियन बनवले होते, तर सीएसकेची अवस्था वाईट होती. ज्यामुळे हा संघ नवव्या क्रमांकावर होता. गेल्या मोसमातील काही सामन्यांमध्ये सीएसके नेतृत्व रवींद्र जडेजाच्या हाती असले तरी धोनी आला तोपर्यंत खूप उशीर झाला होता. अशा स्थितीत धोनीचे या मोसमात विजयाने सुरुवात करण्याकडे लक्ष असेल, तर गुजरात संघालाही विजयाने सुरुवात करायला आवडेल.

पहिल्या सामन्यासाठी सीएसके संघाची रचना –

चेन्नई संघाला त्यांची भूतकाळातील कामगिरी विसरून या वेळी नवीन सुरुवात करायला आवडेल. जरी संघाचे दोन प्रमुख वेगवान गोलंदाज आधीच बाहेर पडले असले, तरी एमएस धोनीकडे उत्कृष्ट खेळाडूंची फौज आहे. गुजरातविरुद्ध, चेन्नई संघ उत्कृष्ट प्लेइंग इलेव्हनसह मैदानात उतरू इच्छितो, ज्यामध्ये डेव्हॉन कॉनवे ऋतुराज गायकवाडसह डावाची सुरुवात करू शकतो.

हेही वाचा – Virat Kohli Marksheet: विराट कोहलीने आयपीएलपूर्वी शेअर केली इयत्ता दहावीची मार्कशीट; जाणून घ्या कोणत्या विषयात होता कच्चा

मोईन अली तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येऊ शकतो, तर बेन स्टोक्स चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येऊ शकतो. दोघेही अष्टपैलू आणि उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाज आहेत. अंबाती रायुडू पाचव्या क्रमांकावर खेळताना दिसण्याची शक्यता आहे, तर रवींद्र जडेजा सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतो. तसेच कर्णधार एमएस धोनी स्वत: सातव्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतो.

यानंतर, वेगवान गोलंदाजी अष्टपैलू ड्वेन प्रिटोरियसचा धमाका पाहायला मिळू शकतो. दीपक चहर जो वेगवान गोलंदाजी करण्याबरोबर खालच्या फळीतही चांगली फलंदाजी करण्यात माहीर आहे. त्याचबरोबर सिमरजीत सिंगसह तुषार देशपांडे देखील प्लेइंग इलेव्हनचा भाग होऊ शकतो.

गुजरात टायटन्सची संघ रचना –

गुजरात टायटन्सने आयपीएल 2022 चा अंतिम सामना जिंकला होता.आता या संघाला आपला पहिला सामना जिंकून चांगली सुरुवात करायची आहे, परंतु यासाठी संघाला आपल्या सर्वोत्तम प्लेइंग इलेव्हनसह जावे लागेल. या संघाकडून शुबमन गिल आणि वृद्धिमान साहा सलामीला येऊ शकतात, तर केन विल्यमसन तिसऱ्या क्रमांकावर असू शकतो. कर्णधार हार्दिक पांड्या चौथ्या क्रमांकावर तर मॅथ्यू वेड पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतो.

हेही वाचा – IPL 2023 CSK vs GT: एमएस धोनी पहिल्या सामन्यात खेळणार नाही? मग कोण सांभाळणार सीएकेचे धुरा, जाणून घ्या

राहुल तेवतिया सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला येऊ शकतो तर गोलंदाजीत अष्टपैलू रशीद खान सातव्या क्रमांकावर येऊ शकतो. यानंतर आर साई किशोर आणि यश दयाल संघात असू शकतात. संघातील वेगवान गोलंदाजीचा भाग यश दयाल, अल्झारी जोसेफ आणि मोहम्मद शमी असू शकतात. त्याच वेळी, साई किशोर आणि राशिद खान फिरकीपटूंच्या बाजूने संघाचा भाग असतील.

दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन –

सीएसके: ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, मोईन अली, बेन स्टोक्स, अंबाती रायुडू, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (कर्णधार), ड्वेन प्रिटोरियस, दीपक चहर, सिमरजीत सिंग आणि तुषार देशपांडे.

जीटी: शुबमन गिल, ऋद्धिमान साहा, केन विल्यमसन, हार्दिक पंड्या (कर्णधार), मॅथ्यू वेड, राहुल तेवतिया, रशीद खान, आर साई किशोर, यश दयाल, अल्झारी जोसेफ, मोहम्मद शमी.

मराठीतील सर्व आयपीएल २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2023 csk vs gt possible playing xi of both the teams in 1st match vbm
First published on: 31-03-2023 at 10:50 IST