scorecardresearch

IPL 2023: ‘ई साला कप नहीं!’ भर कार्यक्रमात भलतच बोलून बसला फाफ डू प्लेसिस, कोहलीला हसू अनावर, Video व्हायरल

आयपीएल २०२३ला सुरुवात झाली असून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पहिला सामना आज मुंबई इंडियन्सशी होणार आहे. त्याआधी आरसीबीचा कर्णधार फाफ असं काही तरी बोलला की त्यावर कोहलीसह सर्वांनाच हसू अनावर झाले.

IPL 2023: E Saala Cup Nahin Faf du Plessis mispronounces RCB's slogan Virat Kohli's funny reaction seen in the video
सौजन्य- IPL २०२३ (ट्विटर)

आयपीएल २०२३ मधील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पहिल्या सामना रविवारी, २ एप्रिल रोजी मुंबई इंडियन्सशी सामना होणार आहे. हा सामना बेंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहे. मात्र, आयपीएलच्या इतिहासात आरसीबी संघाला आतापर्यंत एकही विजेतेपद मिळवता आलेले नाही. अशा स्थितीत १५ वर्षांचा ट्रॉफीचा दुष्काळ संपवण्याच्या इराद्याने बेंगळुरूचा संघ यंदाच्या मोसमात मैदानात उतरणार आहे. त्याचवेळी, या सामन्यापूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये संघाचा कर्णधार फाफ डू प्लेसिस मोठी चूक करताना दिसत आहे.

‘ई साला कप नाही’ – फाफ डू प्लेसिस

खरं तर, RCB कर्णधार फाफ डु प्लेसिस आणि संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली अलीकडेच एका पत्रकार कार्यक्रमात सहभागी झाले होते. जिथे डु प्लेसिसला आगामी हंगामासाठी संघाच्या लक्ष्याबाबत विचारण्यात आले. त्यावर प्रत्युत्तर देताना, डु प्लेसिसने आरसीबीच्या घोषणेचा चुकीचा उच्चार केला, ‘ई साला कप नामदे’ म्हणजे ‘यंदा कप आमचा आहे’. डू प्लेसिसने ई साला कप नम्दे म्हणण्याऐवजी ‘ई साला कप नाही’ म्हटले. यानंतर विराट कोहलीलाही हसू आवरता आले नाही. त्याचवेळी, आता हा मजेदार व्हिडिओ सोशल मीडियावर खूप वेगाने व्हायरल होत आहे. यावर चाहते सतत आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.

संघाचा विस्फोटक फलंदाज किंग कोहली हा देखील त्याच्या शेजारीच बसला होता. फाफने चुकीचा शब्दप्रयोग करताच त्यालाही हसू आवरले नाही. कोहली जोरजोरात हसू लागला. आता त्याचा यादरम्यानचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे, या व्हिडिओला आतापर्यंत ६० हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच, ६ हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत, तर ५०० हून अधिक लोकांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. उल्लेखनीय म्हणजे, आरसीबी संघाने गेल्या मोसमात चमकदार कामगिरी करत सलग तिसऱ्यांदा प्लेऑफमध्ये प्रवेश केला होता. मात्र, डु प्लेसिसच्या नेतृत्व्वाखाली आरसीबी संघाला दुसऱ्या क्वालिफायरमध्ये राजस्थान रॉयल्सकडून पराभव स्वीकारावा लागला आणि संघ स्पर्धेबाहेर पडला.

हेही वाचा: IPL 2023, LSG vs DC: मार्क वूडचे पंचक! लखनऊच्या नवाबांसमोर दिल्ली कॅपिटल्सचा धुव्वा, जायंट्सचा ५० धावांनी दणदणीत विजय

फाफ डू प्लेसिस याला आयपीएल २०२२ हंगामात आरसीबी संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले होते. या हंगामात आरसीबीने चांगली कामगिरी केली होती. संघ गुणतालिकेत १६ गुणांसह चौथ्या स्थानी विराजमान झाला होता. संघाने खेळलेल्या १४ सामन्यांपैकी ८ सामने जिंकले होते, तर ६ सामन्यात पराभवाचा धक्का सहन करावा लागला होता. तसेच, डू प्लेसिस याने स्पर्धेत खेळलेल्या १६ सामन्यात ४६८ धावा केल्या होत्या. आता आयपीएल २०२३ स्पर्धेत आरसीबी संघ आणि फाफ डू प्लेसिस कशी कामगिरी करतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

आयपीएल २०२३ साठी RCB संघ संघ: फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, सुयश प्रभुदेसाई, रजत पाटीदार, दिनेश कार्तिक, अनुज रावत, फिन ऍलन, ग्लेन मॅक्सवेल, वानिंदू हसरंगा, शाहबाज अहमद, हर्षल पटेल, डेव्हिड शर्मा, करवीर शर्मा, महिपाल लोमरोड, मोहम्मद सिराज, जोश हेझलवूड, सिद्धार्थ कौल, आकाश दीप, रीस टोपले, हिमांशू शर्मा, मायकेल ब्रेसवेल, मनोज भांडगे, राजन कुमार, अविनाश सिंग आणि सोनू यादव.

मराठीतील सर्व आयपीएल २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-04-2023 at 10:33 IST

संबंधित बातम्या