scorecardresearch

Premium

IPL 2023 Final: धोनीच्या गळ्यात हात टाकण्यावरून माजी दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावसकर हार्दिकवर भडकले; म्हणाले, “तुम्ही वडिलांच्या…”

CSK vs GT Final: हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्सने सलग दुसऱ्यांदा आयपीएलच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. संघाच्या या उत्तुंग यशात हार्दिकचा मोठा हात आहे. मात्र धोनीबाबतच्या हार्दिकच्या वागण्यावरून गावसकर संतापले.

IPL2023 Final: Do you put your hands around father's neck Gavaskar's angry reaction to Hardik's actions of Dhoni
गावसकर ,म्हणाले, "हार्दिकचे धोनीच्या गळ्यात हात टाकणे शोभत नाही." संग्रहित छायाचित्र (इंडियन एक्सप्रेस)

Sunil Gavaskar on Hardik Pandya CSK vs GT Final: आयपीएल २०२३चा अंतिम सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात आहे. हा सामना २८ मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार होता, मात्र पावसामुळे खेळ होऊ शकला नाही. आता आयपीएल २०२३चा विजेता राखीव दिवशी ठरवला जाईल. या सामन्याचा राखीव दिवस २९ मे आहे.

एम.एस. धोनीची ही शेवटची आयपीएल असू शकते, असे मानले जात आहे. अशा परिस्थितीत त्याच्या संघातील खेळाडू आणि सर्व चाहते त्याला विजयी निरोप देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. मात्र, तत्पूर्वी माजी दिग्गज खेळाडू सुनील गावसकर हे हार्दिक पांड्याच्या वर्तुणूकीवर नाराज झाले आहेत.

harideep singh nijjar
पार्किंगजवळ अडवली गाडी, झाडल्या ५० गोळ्या; हरदीपसिंग निज्जरच्या हत्येचा थरारक घटनाक्रम वाचा!
Parineeti troll
“ही तर हद्द झाली…,” लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी परिणीती चोप्रा ट्रोल, अभिनेत्रीबद्दल नाराजी व्यक्त करत नेटकरी म्हणाले…
amruta-fadanvis-daughters-day-post
“माझी मुलगीही ‘Awesome’ आहे, कारण…” जागतिक कन्या दिनानिमित्त अमृता फडणवीसांची खास पोस्ट
sharad pawar narendra modi (1)
“पंतप्रधान मोदींचं ‘ते’ विधान क्लेशदायक”, शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका; दिले १९९३ च्या घडामोडींचे दाखले!

हेही वाचा: IPL 2023 Final : ‘रिझर्व्ह डे’ला धोनी घेणार निवृत्ती? आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधूनही असाच घेतला होता निरोप, जाणून घ्या पाऊस अन् माहीचं नातं

गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स हा बहुप्रतीक्षित अंतिम सामना पावसामुळे लांबत असताना, गावसकर हे आयपीएलचे प्रसारण करणाऱ्या स्टार स्पोर्ट्स या वाहिनीशी बोलत होते. त्यावेळी हार्दिक व धोनी यांच्यातील काही क्षणचित्रे दाखवण्यात आली. यामध्ये हार्दिक धोनीच्या गळ्यात हात टाकलेला दिसून आला. त्यावर प्रतिक्रिया देताना गावसकर म्हणाले, “हार्दिक व माही यांच्यातील नाते चांगले आहे‌. मात्र, हार्दिकने थालाला थोडा सन्मान देणे गरजेचे आहे. धोनी खूप महान खेळाडू असून, हार्दिकचे त्याच्या गळ्यात हात टाकणे शोभत नाही. तुम्ही तुमच्या वडीलधारी असणाऱ्या वडिलांच्या काकांच्या गळ्यात असा हात टाकता का? मला ही बाब थोडीशी खटकते. आमच्या काळात या गोष्टी होत नसत. मात्र, आता खेळाडूंमधील ऋणानुबंध अगदी लवकर वृद्धिंगत होतात. त्यांची संभाषण करण्याची पद्धत बदलली आहे त्यामुळेच कदाचित एवढ सगळ पटकन होत असेल.”

लिटिल मास्टर गावसकर पुढे म्हणाले की, “गेल्या वर्षी जेव्हा तो प्रथमच कर्णधार होता तेव्हा कोणालाच कल्पना नव्हती की काय अपेक्षा करावी कारण तो आधीच इतका शांत क्रिकेटपटू शांत नव्हता. पण गेल्या वर्षभरात आपण पाहिलं आहे की तो संघात जो शांतता आणतो तो धोनीची आठवण करून देतो. सीएसके प्रमाणेच हा संघ आनंदी आहे. यासाठी हार्दिक श्रेयस पात्र आहे. मात्र त्याने मोठ्या व्यक्तींची आदमीने, योग्य तो सन्मान राखून बोलायला हवे. तुम्ही कितीही मोठे व्हा पण तुमच्यातील नम्रता कधीही कमी होऊ देऊ नका. हेच गुण तुम्हाला आयुष्यात पुढे नेतील.”

हेही वाचा: IPL 2023 Final: ‘रिझर्व्ह डे’मुळे टीम इंडियाचं वाढलंय टेन्शन! वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप पराभवाला आयपीएल फायनल ठरू शकते कारणीभूत

चाहत्यांच्या मते धोनीच्या शेवटच्या आयपीएल सामन्यातही पाऊस खलनायक ठरला आहे. आता सामन्याचा निकाल राखीव दिवशी येईल. जर निकाल चेन्नईच्या बाजूने गेला नाही तर पुन्हा धोनीला पराभव आणि निराशेने निवृत्तीची घोषणा करावी लागेल. चार वर्षांपूर्वी धावबाद झाल्यानंतर धोनी खूपच निराश झाला होता आणि परतताना तो असहाय्य दिसत होता. अहमदाबादमध्येही राखीव दिवशी पाऊस पडला आणि कोणताही खेळ खेळला गेला नाही, तर गुणतालिकेत अव्वल असलेल्या गुजरातला चॅम्पियन बनवले जाईल आणि धोनी पुन्हा अडकून पडेल.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व आयपीएल २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-05-2023 at 17:04 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×