IPL 2023 Final, GT vs CSK Match Updates: मागील ५६ दिवसांपासून भारतातील बारा शहरांमध्ये खेळल्या गेलेल्या आयपीएल २०२३चा अंतिम सामना रविवारी (२८ मे) खेळला जाणार होता. मात्र सलग पाच तास झालेल्या मुसळधार पावसामुळे हा सामना राखीव दिवशी म्हणजे सोमवारी (२९ मे) खेळण्यात येईल. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना खेळला जाईल. रविवारी पावसामुळे नाणेफेक देखील न झाल्याने आता सोमवारी अहमदाबादचे वातावरण कसे असेल याकडे सर्वांची नजर लागली आहे. शुबमन गिल, मोहम्मद शमी, रवींद्र जडेजा आणि अजिंक्य रहाणे हे खेळाडू आजच्या सामन्याला मुकणार आहेत, अशा आशयाचं ट्वीट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारताचे मुख्य खेळाडू आयपीएलच्या अंतिम सामन्याला मुकणार का?

चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात आयपीएल २०२३चा अंतिम सामना राखीव दिवशी खेळला जाईल. हा सामना रविवारी होणार होता. मात्र आता सोमवारी खेळला जाणार आहे. दुसरीकडे, जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ७ जूनपासून हा सामना रंगणार आहे. यासाठी बहुतांश भारतीय खेळाडू लंडनला पोहोचले आहेत. पण शुबमन गिल, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी आणि अजिंक्य रहाणे पोहोचू शकले नाहीत. यामुळे टीम इंडियाचे काही नुकसान होणार आहे.

वास्तविक शुबमन, रहाणे, शमी आणि जडेजा यांची लंडनसाठी तिकिटे बुक झाली होती. पण आता ते योग्य वेळी निघू शकणार नाहीत. राखीव दिवसामुळे सामना आणखी एक पाऊल पुढे गेला आहे. त्यामुळे हे खेळाडू दोन दिवस उशिरा पोहोचण्याची शक्यता आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यासाठी टीम इंडियाच्या खेळाडूंनी सराव सुरू केला आहे. आयपीएल फायनलच्या प्रतीक्षेत असलेले हे खेळाडू कसोटी सामन्याच्या सरावातही वेळेवर पोहोचू शकणार नाहीत.

विशेष म्हणजे, गुजरात टायटन्सचे खेळाडू शुबमन गिल आणि मोहम्मद शमी यांनी आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. गिलने या मोसमात तीन शतके झळकावली आहेत. या मोसमात त्याने आतापर्यंत सर्वाधिक धावाही केल्या आहेत. तर शमीने सर्वाधिक विकेट घेतल्या आहेत. चेन्नई सुपर किंग्जसाठी रवींद्र जडेजा आणि अजिंक्य रहाणे यांची कामगिरी महत्त्वाची ठरली आहे.

हेही वाचा: WTC Final: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलपूर्वी टीम इंडियात मोठा बदल! आयपीएल गाजवणाऱ्या ‘या’ खेळाडूला संघात स्थान, ICCने विशेष अपडेट केले जारी

सोशल मीडियावरील फेक ट्वीट व्हायरल

गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स सह क्रिकेट चाहत्यांचं या सामन्याकडे लक्ष लागलं होतं, पण, सोमवारी त्यांच्या हिरमोड झाला. दरम्यान, आता बीसीसीआयचे सचिव जय शाह यांच्या नावाने एक ट्वीट व्हायरल होत आहे. जय शाह यांच्या नावाच्या पॅरोडी अकाऊंट म्हणजेच फेक अकाऊंटवरून केलेलं ट्वीट सध्या चर्चेत आहे. जय शाह यांच्या पॅरोडी अकाऊंटवरून केलेल्या ट्वीटमध्ये लिहिलं आहे की, “शुबमन गिल, मोहम्मद शमी, रवींद्र जडेजा आणि अजिंक्य रहाणे उद्या इंग्लंडला जाणार आहेत. त्यामुळे ते सोमवारी आयपीएल फायनल खेळू शकणार नाहीत.”

मराठीतील सर्व आयपीएल २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2023 final reserve day has increased the tension of team india this loss will be from the world test championship final avw
First published on: 29-05-2023 at 15:05 IST